एज्युकेशनल स्पूनिंग/रेडीमेड गोष्टी पुरवणे/(चमच्याने खाऊ घालने)

एज्युकेशनल स्पूनिंग.. 

(चमच्याने खाऊ घालने)


 स्पूनिंग ही संकल्पना डॉ. मॉन्टेसरी यांनी तीन वर्षाच्या मुलाला हाताला वळण लागण्यासाठी किंवा त्याचे हात लिहिण्यासाठी तयार होण्यासाठी काही चमच्याने करायच्या कृती यासाठी वापरलेली आहे परंतु अर्थातच आपण येथे स्पूनिंग हा शब्द त्या अर्थाने वापरणार नसून स्पूनिंग(spooning) म्हणजे चमच्याने खाऊ घालने किंवा रेडीमेड गोष्टी पुरवणे या अर्थाने वापरणार आहोत. आई आपल्या छोट्या बाळास चमच्याने भरवते म्हणजेच स्पूनिंग करते. आता त्याला त्यावेळी त्याच्या हाताने जेवता येत नाही म्हणून अगदी छोटे असल्यामुळे आई त्याला खाऊ घालते. परंतु असे करत असताना आईच्या मनात किंवा बाळाच्या ही मनात असे नसते की नेहमीच आई त्याला चमच्याने खाऊ घातलेल्या किंवा ते बाळ नेहमीच आईच्या हाताने चमच्याने त्याचे जेवण करेल. जोपर्यंत बाळाला स्वतःच्या हाताने खाता येत नाही तोपर्यंतच आई त्याला चमच्याने किंवा तिच्या हाताने भरवते. या भरवण्याला आपण स्पूनिंग असं म्हणू या.

आता आपण म्हणाल मग या स्पूनिंग चा शिक्षणाशी काय संबंध? तर तो कसा आहे हे आपण समजून घेऊया आई जेव्हा मुलाला किंवा बाळाला तिच्या हाताने भरवते त्यावेळी तिची अशी अपेक्षा असते की बाळ लहान आहे तोपर्यंत ते तिच्या हाताने किंवा चमच्याने खाईल त्यानंतर ते मोठे झाल्यावर त्याच्या स्वतःच्या हाताने जेवण करेल. म्हणजेच त्याच्यामध्ये क्षमता प्राप्त झाल्या नंतर ते स्वतःचे जेवण स्वतः करेल. म्हणजे जोपर्यंत बाळ स्वतःचे जेवण स्वतः करत नाही तोपर्यंत आईला त्याला खाऊ घालावे लागते म्हणजेच त्याला खाने शिकवावे लागते. असे आपण समजू या. परंतु जेव्हा त्याला स्वतःच्या हाताने खाता येते तेव्हा फक्त अपवादात्मक परिस्थिती वगळता ते स्वतःच्या हाताने आपले जेवण जेवते.

मग शिकविताना जेव्हा विद्यार्थी लहान असतो त्याच्यामध्ये लिहिण्याच्या वाचण्याच्या क्षमता प्राप्त झालेल्या नसतात अशावेळी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत त्यांना शैक्षणिक स्पूनिंग करावे लागते जसे की त्याचा हात धरून लिहायला शिकवणे, काही उच्चार शिक्षकाच्या पाठीमागे उच्चारून घेणे, जे लिहून दिले ते तसेच्या तसे लिहून घेणे इत्यादी आणि या सर्व गोष्टी आपण जाणीवपूर्वक विद्यार्थ्याला त्या अवगत व्हाव्या म्हणून करतो परंतु एकदा का त्याला लिहायला यायला लागले की मग आपण त्याचा हात धरून लिहून दाखवत नाही किंबहुना त्याची गरजही पडत नाही. आणि ही गोष्ट इथपर्यंत अगदी योग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने अपरिहार्य आहे. यापुढे जाऊनही जर तिसरा चौथा वर्गापर्यंत ही त्याला व्यवस्थित वळणदार लिहिता येत नसेल तरीदेखील या पद्धतीचे मार्गदर्शन किंवा हात धरून लिहिण्याचा सराव काही वेळा पुरता आपण अपवादात्मक विद्यार्थ्यांना देऊ शकतो.

आता काही महत्वाचे सांगायचे आहे. ते काय आहे हे जरा काळजीपूर्वक समजून घ्यावे लागेल.

 आपण वरील उल्लेख केलेल्या परिस्थितीतच स्पूनिंग वापरतो का? 

विद्यार्थ्याला आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तयार करून देतो का? 

आपण तयार करून दिलेली उत्तरे त्याला नेहमी पाठ करायला सांगतो का? 

एखादा निबंध/ भाषण/ संवाद लिहून देऊन तो जसाचा तसा पाठ करून त्याला परीक्षेत लिहायला  लावतो का? 

बाजारातील रेडीमेड उत्तरे असलेल्या गाईड विद्यार्थ्याला घेऊन देऊन त्यातील प्रश्नांची उत्तरे तो शिक्षकांनी सांगितलेल्या स्वाध्यायात लिहितो का? 

शिकवण्याच्या थोड्या प्रयत्ना नंतर लगेच आपण विद्यार्थ्यांना रेडीमेड उत्तरे पुरवतो का? 

गाईड मधूनच तो गणिते देखील सोडवतो का? 

एखादा प्रश्न विद्यार्थी समजून घेण्यासाठी आपल्यापर्यंत आला तर त्याला आपण त्या प्रश्नांचे उत्तर सांगून मोकळे होतो का? 

प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर जेव्हा विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतो अशावेळी आपल्याला किंवा त्याला आवडीच्या अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्यामुळे आपण जास्तीचे डोनेशन देऊन त्याला त्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन देतो का? 

जर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तर मग आपण विद्यार्थ्यांना स्पूनिंग करत आहोत की नाही? 

ज्याप्रमाणे बाजारातील वेगवेगळ्या रेडीमेड गोष्टी आपण पूर्ण अन्न म्हणून खात नाही किंवा रोज त्याचं जेवण करत नाही त्याच प्रमाणे विद्यार्थ्याला प्रत्येक वेळी रेडीमेड गोष्टी पुरवणे म्हणजेच स्पूनिंग नव्हे काय? 

डॉक्टर मॉन्टेसरी यांनी तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हात बळकट करण्यासाठी स्पूनिंग पद्धती वापरली. परंतु पुंनिंग या शब्दाचा ज्या अर्थाने आपण वापर करत आहोत त्या अर्थाने त्याचा विचार केल्यास स्पूनिंग मुळे आपण त्याला दुबळे तर करत नाही ना? 

वरील स्पूनिंग मुळे अर्थातच आपले तात्पुरते ते काम भागून जाते परंतु विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची प्रतिभाशक्ती वापरण्याची संधी आपण हिरावून घेत आहोत का? हा खरा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्ती हा एकमेव अद्वितीय आहे असे आपण मान्य करतो मग दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये प्रत्येक मुलाचे मलाची किंवा विद्यार्थ्याची वाक्यरचना सारखी असेल का तर नाही कारण तो वेगळ्या पद्धतीने विचार करेल आणि तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल जर त्याला रेडीमेड उत्तर पुरवले नाही तरच ही गोष्ट घडेल पण आपण त्याला नेहमी रेडीमेड उत्तरे आणि रेडीमेड गोष्टी पुरवत राहिलो तर त्याची स्वतःची क्षमता कधी विकसित होईल? याचा आपण कधी विचार केला आहे का? 

जर आपण प्रत्येक वेळा रेडीमेड गोष्टी पुरवल्या तर शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल का? समजा आपण विद्यार्थ्याला त्याचे व्यवसायिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत असे स्पूनिंग केले तर तो शिकून बाहेर पडल्यानंतर त्याच्या स्वतःच्या क्षमता वापरून नोकरी-व्यवसाय करू शकेल काय? 

अर्थातच जशी जशी माणसाकडे सुबत्ता येत चालली आहे तसे तसे आपण आपल्या पाल्यांना आणि विद्यार्थ्यांना बऱ्याच शा रेडिमेड गोष्टी वापरण्या ची सवय लावतो आहे या गोष्टीकडे मला आपण सर्वांचे लक्ष वेधायचे आहे यासाठी वरील सर्व प्रश्न आपणास विचारले गेले आहे.

ज्यावेळी आपण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्यांना असे रेडीमेड गोष्टी पुरवतो, तेव्हा त्या गोष्टी समजून न घेता फक्त लक्षात ठेवून किंवा पाठ करून त्या गोष्टी परीक्षे पुरत्या त्यांच्या लक्षात राहतत. परंतु व्यवहारी जगात नंतर शिक्षणाचा आणि जीवनाचा संबंध जोडण्यास विद्यार्थी अपयशी ठरतात याचे कारण म्हणजेच हे स्पूनिंग म्हणावे लागेल. अर्थातच मला असे म्हणायचे नाही की विद्यार्थ्यांना कुठलीही गोष्ट देऊ नका किंवा समजावून सांगू नका परंतु हे करत असताना त्यांना देखील बोलते करा, त्यांचा विचार देखील त्यामध्ये घ्या आणि त्यांच्या सक्रिय सहभागाने काही प्रश्नांची उत्तरे त्यांना देखील समजून घेऊ द्या आणि स्वतः काही प्रश्न सोडू द्या.

जेव्हा आपण आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा ती गोष्ट शिकवतांना मागील गोष्टींशी म्हणजे अगोदर शिकवलेल्या गोष्टींशी त्यांचा संबंध जोडून त्यांना नवीन गोष्ट शिकवावी लागेल आणि या शिकवलेल्या गोष्टी गोष्टीचा संबंध नंतर जिथे कुठे त्याच्या जीवनात येईल ती गोष्ट त्या परिस्थितीशी जुळेल आणि त्या शिकवलेल्या गोष्टीचा त्याला जीवनात उपयोग होईल या पद्धतीने तो ती कशी शिकेल असा प्रयत्न करावा लागेल. म्हणजेच शिक्षण हे ओपन एनडेड असावे. अगोदर घेतलेले ज्ञान त्या पुढील ज्ञानाशी जुळावे आणि पुढील ज्ञान घेण्यासाठी पायाभूत ठरावे अशा पद्धतीने ते विद्यार्थ्या पर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था असायला हवी.

एज्युकेशनल स्पूनिंग हे जसे प्राथमिक स्तरावर आवश्यक आहे. तसे ती जसजशी विद्यार्थी समोरच्या वर्गात जातील तसतसे घातक ठरणारी देखील कसे ठरू शकते हे आपण समजून घेतले. कारण आपल्याला भावी नागरिक हा कुणावर विसंबून असणारा नागरिक बनवायचा नाही तर स्वतंत्र विचाराचा, सर्जनशील, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि स्वावलंबी नागरिक म्हणून तो त्याचे जीवन जगू शकला पाहिजे त्याने त्याची नोकरी व्यवसाय स्वतंत्रपणे अधिक कार्यक्षमपणे केला पाहिजे यासाठी अनावश्यक एज्युकेशनल स्पूनिंग आपण टाळावी असा आमचा सर्व पालकांना आणि सर्व स्तरातील शिक्षकांना विनम्र सल्ला राहील.

आतापर्यंत एज्युकेशनल स्पूनिंग म्हणजे काय? हे आपल्या लक्षात आले असेलच. जर आपल्याला वरील विचारांमध्ये अजून काही जोडायचे असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.