छत्रपती शिवाजी महाराज - एक प्रगल्भ, संयमी, धाडसी व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व..

छत्रपती शिवाजी महाराज - 

एक प्रगल्भ, संयमी, धाडसी व दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व.. 


छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला लाभलेले एक उत्तुंग असे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व होय ज्यांची प्रगल्भता, संयमी वृत्ती, धाडसीपणा आणि दूरदृष्टी आपल्याला त्यांच्या जीवन पटावरून पदोपदी जाणवते.

 ते एक आदर्श मातृभक्त होते. शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊ यांनी त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांनी आयुष्य भराची शिदोरी म्हणून वापरले आणि त्यावर मार्ग  क्रमण करून स्वतःचे, आपल्या माता-पित्याचे, पीडित आणि शोषित महाराष्ट्राच्या जनतेचे आयुष्य बदलण्याचे काम त्यांनी स्वराज्य स्थापनेतून केले.

त्यावेळेस स्वराज्य ही संकल्पना मनात कल्पना करणे देखील एक मोठे धाडस होते ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. मुठ भर मावळ्यांना सोबत घेऊन आदिलशाही मुघल सत्ता यांच्यासोबत लढाई करणे हे देखील एक मोठे धाडसी काम होते आणि यशस्वीरित्या करून दाखवण्याचे धाडस शिवरायांनी दाखवलं.

शिवरायांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांना आजही आपण भेट दिली तर पदोपदी तेथील वस्तू आणि वास्तू पाहून आपल्या लक्षात येईल की शिवरायांकडे किती दूरदृष्टी होती ते. राज्यकारभार करताना शिवरायांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते कि ज्या गोष्टी मुघल आदिलशहा करत होता आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत होता अशा सर्व प्रथा बदलू त्यांनी नवीन पायंडा पाडला ज्यामध्ये सरदारांना किंवा सैनिकांना पगार देणे असो ज्या ऐवजी अगोदर वतने दिली जायची की मग सैन्य या मार्गाने मार्गी मार्गक्रमण करत असेल त्या मार्गात कोणत्याही शेतातून ज्या शेतात पीक आहे अशा शेतातून सैन्य मार्गक्रमण करणार नाही सैन्य स्वतःची शिदोरी स्वतः सोबत ठेवेल त्यासाठी कोणत्याही गावावर अथवा व्यक्तींवर सैन्य अवलंबून राहणार नाही त्यांना कोणत्याही वस्तूसाठी त्रास देणार नाही असा नियमच शिवरायांनी सैन्यासाठी घालून दिला होता जो याअगोदर नव्हता आदिलशाही मुघल सैन्य कोणत्याही शेतातून भर फिका पिकातून सैन्य जात होते आणि पिकाचा नासाडी करत होते जग गावाशेजारी सैन्याची राहुटी पडत होती त्या त्यांच्या सैन्याची खाण्यापिण्याची सोय करावी लागायची आणि यामुळे त्या गावांतील लोकांवर नहा कसा भुर दंड पडायचा. अशा सर्व बारीकसारीक गोष्टींमधून त्यांची आपल्याला दूरदृष्टी लक्षात येते.

शाहिस्तेखानाने पुण्यात केलेला मुक्काम आणि त्यानंतर त्याला त्याच्या वर छापा टाकून पुण्यातून पळवून लावणे या शाहिस्तेखानाच्या फजिती वरून शिवाजी महाराजांची संयमी वृत्ती आपल्या लक्षात येते कारण शाहिस्तेखानावर जर उघडउघड स्वारी केली असती तर मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन त्याच्या अफाट संख्या सैन्यासोबत लढाई करणे शक्य नव्हते त्यामुळे जेव्हा शाहिस्तेखान पुण्यातील वाड्यात वस्तीत येऊन राहिला त्याच्यावर स्वारी करण्यासाठी शिवरायांनी संयम बाळगला त्याला गाफील होऊ दिले आणि अगदी नियोजनबद्ध पद्धतीने शाहिस्तेखान रात्री झोपलेला असताना त्याच्यावर छापा टाकून त्याची बोटे कापली आणि त्याला पुण्यातून पळवून लावले.

जेव्हा मराठी सैन्याने शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी वेगवेगळ्या बाजारपेठ असणाऱ्या गावांवर स्वारी करून त्या गावांची लूट करून आणली आणि त्यामध्ये एका सरदाराची सुंदर सून पळवून आणून शिवरायांना देऊ केली त्यावेळी त्या स्त्रीला आई समान वागणूक देऊन तिला सन्मानपूर्वक तिच्या घरी पाठवले. या प्रसंगा मधून आपल्याला एक प्रगल्भ नैतिक दृष्टिकोण असलेला जाणता राजा शिवराय मध्ये ठळकपणे दिसून पडतो.

शिवरायांच्या सैन्यामधील कोणती व्यक्ती ती कोणते काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकते हे शिवरायांना उत्तम प्रकारे समजत होते त्यामुळे ते योग्य त्या कामासाठी योग्य त्या व्यक्तीची नियुक्ती करून ते काम तडीस नेत होते म्हणून छत्रपती शिवराय हे माणसांची पारख असलेले एक महान व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या सभोवती असलेल्या लोकांच्या बद्दल त्यांना पुरेपूर माहिती आणि त्यांच्याबद्दल आपुलकी देखील होती त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती नेहा त्यांच्या अतिशय विश्वासातील होत्या आणि शिवरायांसाठी एका क्षणाचा विलंब न करता स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे लोक त्यांच्या अवतीभोवती होते ज्यामध्ये तानाजी, जीवा महाल अशी अनेक नावे आपल्याला घेता येतील.

शिवरायांनी मध्ये अत्यंत अद्भुत असे नेतृत्व गुण होते या नेतृत्व गुणांच्या जोरावर त्यांनी जनतेचा राजा असलेलं हिंदवी स्वराज्य स्वकर्तृत्वावर स्थापन केलं आणि पीडित शोषित दिन दुबळ्या जनतेला सुराज्य काय असते रामराज्य काय असते याची पुन्हा अनुभूती मिळवून दिली. 

शिवाजी महाराज हे इतिहासातील असे एकमेव राजे आहेत की ज्यांनी आपले स्वतःचे राज्य निर्माण केले आणि त्यानंतर ते राजे झाले. ज्यांची पुर्वज राजे होते आणि वारसाहक्काने झालेले राजे आपल्याला इतिहासात अनेक मिळतील.. 


अशा या जाणत्या राजाला मानाचा मुजरा! 


धन्यवाद! 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.