25% RTE प्रवेश अर्ज मोबाईल वरून कसा भरायचा? प्रवेश अर्ज भरणे सुरू..

25% RTE प्रवेश अर्ज मोबाईल वरून कसा भरायचा? प्रवेश अर्ज भरणे सुरू.. 

(How to fill rte online application admission form for 2022-23 by mobile phone?) 

दिनांक 17 फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून 25% आरटी प्रवेश अर्ज भरणे सुरू झाले आहे. हा अर्ज ऑनलाईन भरावा लागतो तो सहज आपल्या मोबाईल वरुन कसा भरावा हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया.

त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील गुगल एप्लीकेशन ओपन करा व त्यामध्ये student.maharashtra.gov.in ही साईट ओपन करा.. 

खालील ओपन झालेल्या विंडोमध्ये असलेल्या Online Application या टॅबवर क्लिक करा.. 

त्यानंतर खालील प्रमाणे ओपन होणाऱ्या विंडो मधील निळ्या रंगाच्या अक्षरांमधील New Registration वर क्लिक करा.. 
त्यानंतर ओपन झालेल्या विंडो मधील उजव्या बाजूच्या लाल रंगाच्या चौकटी मधून संपूर्ण माहिती अचूक भरा व त्याखाली आलेल्या Register वर क्लिक करा तुम्हाला तुम्ही भरलेल्या मोबाईल नंबर वर एक टेक्स्ट मेसेज प्राप्त होईल. त्यामध्ये यूजर name व तात्पुरता पासवर्ड आलेला असेल तो वापरून उजव्या बाजूला दिलेल्या यूजर लोगिन फोर 2022-23 खालील मध्ये युजरनेम व आलेला पासपोर्ट टाका त्या खालील कॅपच्या कोड भरा व Login बटन वर क्लिक करा.. 

त्या नंतर त्या विंडो वरच नवीन विंडो open होते त्यामध्ये युजर नेम अगोदरच आलेले असत मेसेज मध्ये आलेला पासवर्ड टाका नंतर नवीन पासवर्ड जो तुम्हाला तयार करायचा आहे आहे. असा ज्यामधून इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षरे स्मॉल वर्णाक्षर असेल @ किंवा # सारखं स्पेशल कॅरेक्टर असेल आणि काही नंबर असतील असा पासवर्ड तुम्ही स्वतः तयार करा. तो कन्फर्मेशन साठी परत पुन्हा  टाका submit बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील मेसेज दिसेल म्हणते तुझी यशस्वीरीत्या पासवर्ड चेंज केला.. 


खालील विंडोमध्ये मेसेज मध्ये आलेला युजर आयडी आणि तुम्ही या अगोदर तयार केला होता तो पासवर्ड टाकून त्यानंतर कॅपटचा कोड टाकून Login बटन वर क्लिक करा.. 

Login झाल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे विंडो ओपन झाली दिसते या विंडोमध्ये आईचे पूर्ण नाव वडिलांचे पूर्ण नाव प रेंटल स्टेटस तुमचा पत्ता मुलाचे, वडिलांचे, आईचे मराठी मध्ये नाव ही सर्व माहिती भरून त्याखाली दिलेल्या Save बटन वर क्लिक करा व त्यानंतर चाईल्ड इन्फर्मेशन च्या बाजूचा एप्लीकेशन या टॅबवर क्लिक करा.. 


एप्लीकेशन या tab मधील सिलेक्ट स्टॅंडर्ड सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॅटेगिरी व दिलेली खालील माहिती भरा अन्यथा योग्य त्या पर्यायावर क्लिक करा आणि सर्वात खाली असलेल्या Save या बटन वर क्लिक करा त्यानंतर मेन्यू मधील स्कूल सिलेक्शन या बटन वर क्लिक करा.. 
खालील प्रमाणे आलेल्या विंडोमध्ये एक किलोमीटरच्या आतील शाळा वर क्लिक करून उपलब्ध शाळेत पैकी जी तुम्हाला योग्य वाटेल अशा किंवा ज्या शाळेत तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा प्रवेश घ्यायचा आहे. ती शाळा किंवा त्या शाळा क्रमवार निवडा जर एक किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध नसेल, तर दोन किलोमीटर अंतरावरील शाळा निवडा दोन किलोमीटर अंतरावर ही शाळा नसेल तर तीन पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावरील ज्या शाळेत तुम्ही तुमच्या मुलाला टाकू इच्छिता अशी शाळा निवडा तुम्ही एकापेक्षा अधिक शाळादेखील निवडू शकता. पाहिजे तेवढ्या शाळा निवडल्यानंतर स्कूल सिलेक्शन च्या बाजूला असलेली फॉर्म सबमिशन या टॅबवर क्लिक करा


फॉर्म सबमिशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला परत दिसेल ती माहिती अचूक असल्याची संपूर्ण माहिती खरी असल्याची आणि योग्य असल्याची खात्री करा, खाली हिरव्या रंगत दिलेल्या माहितीच्या सुरुवातीला दिलेल्या डब्यावर टिक करा किंवा त्यानंतर खाली Confirm and Submit या बटन वर क्लिक करा तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जर चुकीने अर्ज परत करण्यात आला असेल तर एक अर्ज डिलीट करावा लागेल त्यासाठी उजव्या बाजूला लाल रंगाचं डिलीट एप्लीकेशन असे ऑप्शन आहे. त्याचा आपण वापर करू शकतोवरील प्रमाणे टप्प्याटप्प्याने RTE 25% अंतर्गत प्रवेशासाठी खाजगी शाळेमध्ये पहिल्या वर्गात प्रवेशासाठी आपल्या मोबाईल वरुन आपण अर्ज करू शकतो यासाठी संपूर्ण माहिती आपणास अचूक भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जन्मतारीख चा दाखला आणि तुमचा स्वत घरचा पत्ता लिहिलेला जवळ असू द्या. कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, अशा क्रमवार पाच शाळा यांची यादी तयार ठेवा म्हणजे अर्ज करणे सोपे जाईल.. 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.