वर्तनातील सुयोग्य कायम बदल म्हणजे शिक्षण - The appropriate stable change in behaviour is Education

नमस्कार मित्रांनो,

आज अगदी आनंदाचा दिवस आहे, कारणही तसेच आहे की जवळपास दोन वर्षापासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या.


 मला असं वाटतं की बरीचशी मुले शाळा आणि शिक्षणापासून दूर होते आणि त्यांच्या शिक्षणाचे झालेलं नुकसान हे न भरून काढण्यासारखे आहे. त्यासाठी उपाय आपण करणारच आहोत. परंतू मला याआगोदर एकदा सर्व पालक, शिक्षक, समाज, विद्यार्थी आणि जे जे शिक्षण क्षेत्रात काम करतात त्यांना सर्वांना पुन्हा शिक्षण म्हणजे काय? हे परत आठवण करून देण्याची गरज वाटते कारण पदोपदी जाणवते की, अजूनही नेमके शिक्षण म्हणजे काय हे समाजातील बऱ्याचशा लोकांना समजले नाही, असा माझा तरी समज आहे.

चला तर पाहूया की शिक्षणाची सर्वमान्य एक व्याख्या तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो ती अशी...

"वर्तनातील बदल म्हणजे शिक्षण".

"Change in behaviour is Education."

यापुढे जाऊन मी असं म्हणेन की,

"वर्तनातील सुयोग्य व कायम बदल म्हणजे शिक्षण."

"The appropriate & stable change in behaviour is Education."

पहिल्या शिक्षणाच्या व्याख्येतून आपणास असे लक्षात येईल की आपल्या वर्तनात बदल घडवून आण्यासाठी आपण शिक्षण घेतो शिक्षणाचा मुख्य उद्देश हे ज्ञान मिळवणे, लेखन - वाचन, गणिती क्रिया करणे, काही व्यावसायिक कौशल्य प्राप्त करणे हे तर आहेच परंतू या सर्वांसोबत अध्यायानार्थ्याच्या वर्तनात बदल घडवून आणणे हा देखील आहे.

पण या लॉक्डाऊन च्या काळात जर माझा एक विद्यार्थी त्याच्या मित्राच्या सहवसात आला आणि तो तंबाखू खाऊ लागला म्हणजेच त्याच्या वर्तनात बदल झाला. "तो तंबाखू खात नव्हता पण आता मात्र खाऊ लागला." मग आता त्याचे शिक्षण झाले का? तर माझ्या मते तरी नाही. हे वर्तन समाजात गैरवर्तन या प्रकारात मोडते. म्हणून आपण याला शिक्षण म्हणू शकणार नाही.

त्यानंतर शाळेत विद्यार्थ्याला आपण स्वच्छतेच्या सवयी शिकवल्या आणि विद्यार्थ्यांनी त्या पाठ करून परीक्षेत लिहिल्या आणि तो उत्तम गुणांनी उत्तीर्ण देखील झाला. मग त्याचे शिक्षण झाले का? आता यापुढे जाऊन त्याने काही दिवस त्या स्वच्छतेच्या सवयी पाळल्या देखील परंतु नंतर तो विसरला आणि आगोदर जसा वागायचा तसाच अस्वच्छ राहू लागला तरी देखील त्याचे शिक्षण झाले असे म्हणता येणार नाही. जेव्हां तो त्या स्वच्छतेच्या सवयी कायम अंगी बाळगेल तेव्हा कुठे त्याचे सुयोग्य शिक्षण झालं असं आपण ठामपणे म्हणू.

जर काही दिवस शाळेतून बाहेर राहून त्याच्या सवयी बदलत असेल तर आपण आपल्या शिक्षण देण्याच्या पद्धती आणि आपली एकूणच शिक्षण व्यवस्था याविषयी पुन्हा एकदा विचार करण्याची नक्कीच गरज आहे असे मला वाटते.

म्हणून मी शिक्षणाची व्याख्या अशी करतो की,


"वर्तनातील सुयोग्य व कायम बदल म्हणजे शिक्षण."

"The appropriate & stable change in behaviour is Education."


मग चला तर यावर विचार करून आपण एक पाऊल पुढे टाकूया...

धन्यवाद !


आपलाच


प्रदिप गणपत जाधव

(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक)

Post a Comment

8 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.