चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत - Tenses - Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत - Tenses  Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)

नेहमी घडणाऱ्या क्रीया सांगण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो तसेच सवयीच्या गोष्टी सांगण्यासाठी देखील साधा वर्तमान काळ वापरला जातो. रोजच्या दैनदिन क्रीया सांगण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरला.

उदा.

सूर्य पश्चिमेला उगवतो.

The sun rises in the East.

मी दररोज शाळेत जातो.

I go to the school everyday.

शितल रोज व्यायाम करते.

Shital exercises everyday.

शाळेतील विद्यार्थी रोज राष्ट्रगीत म्हणतात.

The students in the school sing the national anthem.

वरील सर्व वाक्याचा विचार केला असता असे लक्षात येते की simple present tense मधे वाक्यांचे सूत्र पुढीप्रमाणे असते.

S + V+s/es/ies + ID + DO + C + .

वाक्याची सुरवात कर्त्याने होते त्यानंतर क्रियापद कर्म पूरक वाक्य आणि पूर्ण विराम.

साध्या वर्तमान काळात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला s/es/ies प्रत्यय लागतो..

खालील प्रमाणे पुरूषवाचक नामे आहेत..

प्रथम पुरुषी कर्ते - I आणि We

द्वितीय पुरुषी कर्ते - You, You

तृतीय पुरुषी कर्ते - He, She, It, They 

एकवचनी नामे (boy, girl etc.) अनेकवचनी नामे (boys, girls etc.)


वरील पैकी फक्त तृतिय पुरुषी एकवचनी कर्त्यांसमोरच साध्या वर्तमान काळात क्रियापदाच्या मूळ रुपास s/es/ies प्रत्यय लागतात.

वर दिलेल्या उदाहरणापैकी

सूर्य पश्चिमेला उगवतो.

The sun rises in the East.

शितल रोज व्यायाम करते.

Shital exercises everyday.

या दोन वाक्यात the sun व shital हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत त्यामुळे त्यांचे समोरील क्रियापदांना अनुक्रमे rise ला s प्रत्यय लागून त्याचे rises झाले आहे तर exercise ला देखील s प्रत्यय लागून त्याचे exercises झाले आहे.

अधिक उदाहरणे पुढीप्रमाणे.

श्रावण कबड्डी खेळतो.

Shravan plays Kabaddi.

शेतकरी शेतात काम करतो.

A farmer works in farm.

मनीष चित्र काढतो.

Manish draws a picture.

वरील उदाहरणात तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आलेले आहेत त्यामूळे क्रियापदाला s प्रत्यय लागला आहे.

(सर्वसाधारणपणे क्रियापदांना s हा प्रत्यय लावला जातो.)

विजय रोज दात घासतो.

Vijay brushes teeth everyday.

आई माझे कपडे धुते.

Mother washes my clothes.

वरील उदाहरणात कर्ते तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे त्यांचे समोरील क्रियापदांना es हा प्रत्यय लागला आहे.

(जेंव्हा क्रियापदाचा शेवट s/sh/ch ने होतो अशा क्रियापदांना es प्रत्यय लागतो.)

तो व्यक्ती नेहमी पाण्याची बाटली जवळ बाळगतो.

The man carries water bottle with him always.

आई नेहमी आपल्या मुलाची काळजी करते.

Mother worries her child always.


वरील उदाहरणात कर्ते तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे त्यांचे समोरील क्रियापदांना ies प्रत्यय लागला आहे.

(क्रियापदांना ies प्रत्यय लगतांना क्रियापदातील y चा लोप पावून त्याला ies प्रत्यय लागतो. उदा. Carry - carries, Worry - worries etc.)



वरील तक्त्यात दिलेली वाक्य देखील सध्या वर्तमान काळात आहेत.

नकारार्थी/प्रश्नार्थक साध्या वर्तमान काळात वाक्य तयार करतांना Do किंवा does या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो.

वाक्यात जर तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असेल तर does चा वापर केला जातो तर इतर कर्त्यांसोबत do चा वापर केला जातो.

उदा.

मला दूध प्यायला आवडत नाही.

I do not like to drink milk.

मला दूध प्यायला आवडते का?

Do l like to drink milk?

तो व्यक्ती नेहमी पाण्याची बाटली जवळ बाळगत नाही.

The man does not carry water bottle with him always.

तो व्यक्ती नेहमी आपल्या जवळ पाण्याची बाटली ठेवतो का?

Does the man carry water bottle with him always.


वरीप्रमाणे साध्या वर्तमान काळात वाक्य तयार करता येतात..

वाक्य तयार करतांना काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा..

विद्यार्थ्यांसाठी सूचना..

वरीलप्रमाणे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.

अधिक माहितीसाठी नियमीत भेट दया pradipjadhao.com ला.. किंवा Google search करा pradipjadhao.com  


धन्यवाद!


Post a Comment

6 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.