शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५-२ मे २०२५ च्या शुद्धिपत्रकानुसार बी. एड. Appeared असणाऱ्या उमेदवारांनी बी. एड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक msce.tait2025@gmail.com या मेलवर विहित मुदतीत पाठवावेत. विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी..
टेटचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात!
राज्य परीक्षा -परिषदेने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल.
२४ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत झालेल्या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८८० उमेदवारांनी नोंदणी केली तर २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली. टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येत असल्याने टेट परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा, अशी मागणी होत होती.
डीएड अभ्यासक्रमास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही टेट परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी झाल्याने त्यांनाही अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती. अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन टेट परीक्षा दिली. मात्र, संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किंवा नाही, याची खात्री केल्यानंतरच त्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिलेले विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे.
Tait 2025 Result link..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन दि. २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. तथापि, ११०७ उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी/उमेदवारांची डी.एल.एड परीक्षा व TAIT परीक्षा एकाच दिवशी येत आहे. तेव्हा डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ठ होणारे जे विद्यार्थी TAIT-२०२५ या परीक्षेसाठी सुध्दा प्रविष्ट झाले असतील अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०३ जून २०२५ ऐवजी दिनांक ३० मे २०२५ रोजी नियोजित आहे. तरी विद्यार्थी/उमेदवारांनी उपरोक्त बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे. त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहिल याची नोंद घ्यावी.
ठिकाणः पुणे
दिनांकः २९/०५/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०४
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा - २०२५
प्रसिद्धी निवेदन
महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.९२/टिएनटी-१, दि.२८/०२/२०२५ व मा. आयुक्त (शिक्षण), यांचे जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/टेट-३/वेप/२०२५/११९१, दि. १९/०३/२०२५ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दि. १०/०५/२०२५ होती परंतु B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या विध्यार्थी/उमेदवारांच्या मागणीनुसार संधी देण्याविषयी शासनाकडून निर्देश प्राप्त होते. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी त्यांना दि. १४/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सदर परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी/उमेदवार प्रविष्ठ झाले आहेत.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षा घेण्याचे आयोजन दि. २४/०५/२०२५ ते दि. ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये प्रस्तावित होते. त्याअनुषंगाने B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी / उमेदवारांचा परीक्षा कालावधी, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025Info.aspx या लिंकद्वारे भरणेबाबत सूचित केले होते. सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत १४/०५/२०२५ होती तथापि सदर मुदत दि. १४/०५/२०२५ ऐवजी दि. २१/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती व तसे प्रसिद्धी निवेदन देण्यात आले होते. सदर भरलेली माहिती खालील तक्त्यामध्ये नमूद केलेली आहे.
अशा एकूण ५८९१ उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेस दि. २१/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०६:५० वा. ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे.. त्यानंतर परीक्षा परिषदेच्या msce.tait2025@gmail.com ईमेल वर दि. २२/०५/२०२५ रोजी सकाळी ११:१५ पर्यंत प्राप्त झालेल्या एकूण १८ परीक्षार्थी उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेस दि. २२/०५/२०२५ रोजी सकाळी ११: ३० वा. ई. मेलद्वारे देण्यात आली. या माहितीपैकी ज्या उमेदवारांनी परिपूर्ण व अचूक माहिती दिलेली आहे त्यांची माहिती विचारात घेऊन शक्य तेवढे बदल संबंधित संस्थेकडून करण्यात आलेले आहेत.
तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल असेही कळविण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षा घेण्याचे नियोजन दि. २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक २४/०५/२०२५ रोजी उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
(अनुराधा ओक)
आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०४
ठिकाण : पुणे
दिनांक : २५/०५/२०२५
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments