भारतात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा

  बहुभाषिक अध्ययन अध्यापन याविषयी सर्वसामान्य समज पाहत असतांना आपल्यासमोर काही मुद्दे पुढे आले आहेत त्यापैकी पहिला मुद्दा.
*भारतात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा.
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. व भारतात एकेरी नागरिकत्व असल्यामुळे कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही राज्यात(जम्मू काश्मीर वगळता) स्तलंतरीत होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यातील लोक आपापल्या भाषेसगट महाराष्ट्रात वास्तव्यास आलेले आहेत ती कुटुंब घरात त्यांची भाषा बोलतात व त्यांच्या पाल्यांना उपलब्ध असलेल्या माध्यमाच्या शाळेत दाखल करतात. उदा. पंजाबी कुटुंब महाराष्ट्रात वास्तव्यास आल्यास त्यांना पंजाबी माध्यमाची शाळा उपलब्ध होणार नाही. आता पंजाबी कुटुंबातील मुलाला जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले तरी शिकवणारा शिक्षक हा वेगळी मातृभाषा असलेला
असेल यावेळी जर त्या पंजाबी कुटुंबातील मुलाला योग्य ती भाषिक वागणूक मिळाली नाही तर त्याचे मन शाळेत रमणार नाही. अर्थातच त्याची शिक्षणाची गाडी योग्यरीत्या पुढे जाणार नाही.
      भारतात या भाषा व बोलीभाषा ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत की केंद्र किंवा राज्य सरकारला या प्रत्येक भाषेच्या शाळा व पुस्तके काढणे शक्य नाही. पण त्यावर उपाय तर शोधावा लागेल कारण RTE 2009 नुसार प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण हे द्यायचेच आहे. आणि म्हणून गरज आहे ती बहुभाषिक अध्ययन अध्यापन याविषयी सर्व स्तरावर विचार होण्याची..


क्रमशः..

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.