प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळा स्तरावर माहे एप्रिल, २०२६ अखेर शिल्लक तांदुळ व धान्यादी मालाची नोंद करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दि १/७/२०२६ रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळा स्तरावर माहे एप्रिल, २०२६ अखेर शिल्लक तांदुळ व धान्यादी मालाची नोंद करणेबाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांना प्रत्येक दोन महिन्याच्या कार्यदिवसाच्या मागणीनुसार तांदुळ व धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो. सद्यस्थितीमध्ये पुरवठा करण्यात येत असलेल्या तांदुळ व धान्यादी मालाची नोंद शाळा स्तरावर योजनेचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षकांमार्फत नोंदवहीमध्ये करुन घेण्यात येते. योजनेंतर्गत जिल्हा स्तरावरुन निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार शाळा स्तरावर देण्यात येणाऱ्या दैनंदिन लाभाची तसेच लाभार्थी संख्येनुसार दैनंदिन खर्च व शिल्लक याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावरुन घेण्यात येतात. शाळा स्तरावरील नोंदविण्यात येणाऱ्या नोंदीच्या कामकाजासाठी शिक्षकांचा अधिकचा वेळ सदर कामकाजामध्ये निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रस्तुत बाबीच्या अनुषंगाने शाळा स्तरावरील तांदूळ व धान्यादी माल खर्च/शिल्लक व मासिक एकत्रित गोषवारा याबाबतची ऑनलाईन सुविधा लातुर जिल्ह्यातील शाळांना देऊन पथदर्शी अभ्यास करण्यात आला आता राज्यातील सर्व शाळांना सदर सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
अ. शाळा स्तरावरुन करावयाची कार्यवाहीः-
१. योजनेस पात्र सर्व शाळांनी शाळा स्तरावरील दि.३० एप्रिल, २०२६ अखेर किंवा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील आहारवाटप केलेला जो अखेरचा दिवस असेल त्या दिवसाचा शिल्लक तांदुळ व धान्यादी मालाची नोंद एमडीएम पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या Opening Balance टॅब अंतर्गत करावयाची आहे.
२. शाळा स्तरावरील शिल्लक तांदुळ व धान्यादी मालाची नोंद कि. ग्रॅममध्ये करावयाची असून सदरची नोंद इ.१ ली ते ५ वी व इ. ६ वी ते ८ वी अशी नोंदविण्यात यावी.
३. सदरच्या शिल्लक तांदूळाची व धान्यादी मालाची नोंद पुर्ण झाल्यानंतर माहितीची पडताळणी करुन Save & Finailize करण्यात यावी.
४. सदची माहिती भरण्याबाबत शाळा स्तरावरुन करावयाच्या कार्यवाहीबाबतची माहिती पुस्तिका (Manual) यासोबत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शाळा स्तरावरील शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची माहिती भरल्यानंतर जिल्हा स्तरावरुन निश्चित करुन दिलेल्या पाककृतीनुसार शाळा स्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची दैनंदिन लाभार्थ्यांची माहिती एमडीएम पोर्टलवर नोंदविण्यात यावी. सदर माहिती Web Portal/App/SMS द्वारे असे ३ प्रकारे नोंदविता येईल.
५. शाळांच्या मागणीनुसार पुरवठादार संस्थेकडून शाळेस प्राप्त होणारा तांदूळ व इतर धान्यादी मालाची नोंद, सदरचे धान्य शाळांना प्राप्त झाल्यानंतर शाळा लॉगिनवर उपलब्ध असलेल्या Opening Balance या टॅब अंतर्गत शाळा स्तरावरुन नोंदविण्यात यावी. उक्त प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची नोंद एमडीएम पोर्टलवर शाळा स्तरावरुन नोंदविले नसल्यास सदर शाळेची महिना अखेरीची खर्च/शिल्लक मालामध्ये तफावत आढळून येईल. त्यामुळे सर्व शाळांनी यापुढील कालावधीत शाळेस प्राप्त तांदूळ व धान्यादी मालाची नोंद विहित कालावधीमध्ये एमडीएम पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक राहील. (सोबत मॅन्युअल दिले आहे)
६. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस सर्व शाळांना तांदुळ व धान्यादी माल याचा खर्च/शिल्लक अहवाल एकत्रितपणे Opening Balance या टॅब अंतर्गत PDF स्वरूपात उपलब्ध होणार आहे. सदर PDF प्रिंट करून जतन करावी त्यामुळे यानंतर नोंदवहीमध्ये नोंदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्व शाळांनी दैनंदिन उपस्थिती आणि प्राप्त धान्य यांची नोंद अचूकपणे विहित कालमर्यादेत एमडीएम पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे.
७. जिल्हा स्तरावरुन निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार सदरचा मेनू मोबाईल अॅपमध्ये दिसून येत असल्याची खात्री योजनेंतर्गत पात्र सर्व शाळांनी करावी. सदरची पाककृती अॅपमध्ये दिसून येत नसल्यास मोबाईल मधील सध्याचा App डिलीट करून MDM Portal वरून नव्याने App Install करावा त्याबाबतचे मॅन्युअल सोबत दिले आहे.
आ. तालुका स्तरावरुन करावयाची कार्यवाही :-
१. शाळांनी नोंदविलेल्या माहितीनुसार शाळा स्तरावर शिल्लक तांदूळ व धान्यादी मालाची नोंद एमडीएम पोर्टलवर झाल्याची खातरजमा गटशिक्षणाधिकारी व अधीक्षक, पीएम पोषण यांच्या स्तरावरुन करण्यात यावी.
२. दैनंदिन माहिती तसेच शाळा स्तरावर प्राप्त होणारा तांदूळ व धान्यादी माल याची माहिती नोंदविण्याकरीता शाळांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण तात्काळ तालुका स्तरावरुन करण्यात यावे.
३. शाळा स्तरावर प्राप्त होणारा तांदूळ व धान्यादी माल याच्या नोंदी शाळा नियमितपणे शाळेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या टॅबमध्ये घेतील याची दक्षता घेणे तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सनियंत्रण करणे.
४. तालुका स्तरावरुन योजनेस पात्र शाळांपैकी केंद्रनिहाय दैनंदिन माहिती नोंदविलेल्या शाळांचा आढावा दररोज घेण्यात यावा
इ. जिल्हा स्तरावरुन करावयाची कार्यवाही :-
१. जिल्हा स्तरावरुन प्रस्तुत उपक्रमांतर्गत अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयांशी समन्वय ठेऊन जिल्ह्यातील सर्व शाळा दैनंदिन व शाळा स्तरावर प्राप्त होणात्या तांदूळ आणि धान्यादी मालाची माहिती एमडीएम पोर्टलवर नोंदवतील याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांच्या स्तरावरुन घेण्यात यावी.
२. केंद्र शासनाने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दैनंदिन लाभाच्या माहितीचा तपशील नोंदविण्याकरीता विकसित केलेल्या Automated Monitoring System (AMS Portal) वरील नोंदी तसेच शाळा स्तरावरील खर्च/शिल्लक साहित्याच्या नोंदीबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांच्या स्तरावरुन नियमित आढावा घेण्यात यावा.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांच्या स्तरावरुन विहित कालमर्यादेमध्ये सर्व शाळांची दैनंदिन माहिती एमडीएम पोर्टल/मोबाईल अॅपवर नोंदवली जाईल क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन संबंधितांना योजनेचे प्रभावी सनियंत्रण करण्याबाबत आदेशित करण्यात यावे.
वरीलप्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार सर्व शाळांनी कामकाज पूर्ण करावयाचे आहे व याकरीता जिल्हास्तरावरुन आवश्यक ते लेखी निर्देश क्षेत्रिय कार्यालय, शाळा/मुख्याध्यापक यांना देण्यात यावेत.
सोबत-
१. Opening Balance Manual (माहिती पुस्तिका)
२. Stock Inward Manual (माहिती पुस्तिका)
३. Mobile App Install Manual (माहिती पुस्तिका)
४. Daily Attedence Manual (माहिती पुस्तिका)
Digitally signed by
Sharad Shankargiri Gosavi Date: 01-07-2026 13:48:32
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments