केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे Portal साठी आपल्या अधिनस्त राज्यातील शाळांची विहित नमुन्यातील माहिती मिळणेबाबत शिक्षण संचालनालय प्राथमिक महाराष्ट्र राज्य कार्यालयातून दिनांक 16 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
स्मरणपत्र क्र. १ अतितातडीचे..
जा.क्र. प्राशिसं/ NCPCR /२०२६/७०१/१९६१२३४
दिनांक-१६/०६/२०२६
प्रति,
(१) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व,
(२) शिक्षणधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक/ माध्यमिक) सर्व,
(३) शिक्षण निरिक्षक सर्व.
विषय- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे Portal साठी आपल्या अधिनस्त राज्यातील शाळांची विहित नमुन्यातील माहिती मिळणेबाबत...
संदर्भ- या कार्यालयाचे पत्र क्र. प्राशिसं/NCPCR/२०२६/७०१/१८९९०२२०, दिनांक- ११/५/२०२६
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशानुसार सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात त्यांचेकडून माहिती मागविण्यात आलेली आहे.
उपरोक्त विषयाच्या संदर्भिय पत्र क्र. १ च्या अनुषंगाने आपले विभाग/जिल्हयाच्या अधिनस्त सर्व शाळांची सोबत जोडलेल्या विहित Table-SEDU15 नमुन्यात, RTE तक्रारी व त्यांच्या निवारणाबाबतची माहिती मागविण्यात आली होती. परंतु अद्याप माहिती संचालनालयास अप्राप्त आहे. सदर माहिती केंद्र शासनास अत्यंत तातडीने आवश्यक असल्याने त्यांचेकडून या संचालनालयास सारखा पाठपुरावा सुरू आहे.
तरी आपल्या अधिनस्त सर्व शाळांची एकत्रीत माहिती सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात या संचालनालयास विनाविलंब उपलब्ध करून द्यावी.
सहपत्रे विहित (Table- SEDU15)
(रमाकांत काठमोरे)
शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव (१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
(२) मा. अध्यक्ष, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, यांचे स्वीय सहाय्यक नवी दिल्ली.
(३) मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
Table- (SEDU15)
RTE Act- २००९ अंतर्गत बाल हक्काशी संबधित तक्रारी व त्यांचे निवारणाबाबतची माहिती
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.




0 Comments