निवडणुक वा अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी संयुक्तपणे दिनांक 13 मे 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
क्र.प्रशिसं/संकीर्ण -८०२/निकाप्रनि/२०२६/
दिनांक- १३/०५/२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर, दक्षिण, पश्चिम) बृहमुंबई
४. प्रशासन अधिकारी/शिक्षण प्रमुख/शिक्षणाधिकारी, मनपा/नपा/नप (सर्व)
विषय : निवडणुक वा अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत
संदर्भ-
१) शासन पत्र क्र संकीर्ण २०२६/प्र.क्र. १७६/ टीएनटी-१, दि.३० मार्च, २०२६
२) या कार्यालयाचे दि.०६/०४/२०२६ चे पत्र
३) शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१७६/टोएनटी-१, दि.०८ एप्रिल, २०२६
४) या कार्यालयाचे दिनांक २७.०४.२०२६ चे पत्र
५) दिनांक ०९.०५.२०२६ रोजीच्या बैठकीतील निर्देश
उपरोक्त संदर्भ क्र १ व ३ च्या पत्रास अनुसरुन या कार्यालयाने संदर्भ क्र २ अन्वये सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडून शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत, अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते.
सर्व संबंधीत क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त माहिती शासनास संदर्भ क्र ४ च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र ५ नुसार झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधीत शिक्षकांना (स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणा-या) त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करावी.
तसेच आपल्या जिल्हयाकडून या कार्यालयास सादर केलेल्या माहितीमधील सर्व शिक्षक त्याचे मूळ आस्थापनेवर रुजू होतील असे पहावे. या कार्यालयास सादर केलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क करुन त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावेत.
सर्व संबंधीतांना कार्यमुक्त केल्याचे आदेशानंतरही शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर, त्या शिक्षकांचे माहे मे, २६ पेड इन माहे जून २६ पासूनचे वेतन अदा होणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यावी. याबाबत संबंधीत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना आपल्या स्तरावरुन आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत.
तसेच शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत होते व किती शिक्षक हे मूळ आस्थापनेवर रुजू झालेले आहेत. याचा एकत्रित अहवाल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत या कार्यालयास सादर करावा. जेणेकरुन एकत्रित अहवाल सत्वर शासनास सादर करणे शक्य होईल.
Digitally signed by
Mahesh Madhukar Palkar
Date: 13-05-2026
(डॉ महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य)
महाराष्ट्र राज्य, पुणे
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 13-05-2026 11:52:44
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
माहितीसाठी सविनय सादर-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments