संच मान्यता 2025 26 बाबत.
अत्यंत महत्त्वाचे.
जिल्हा परिषद शाळांच्या सन २०२५- २६ च्या संच मान्यतांचे ड्राफ्ट शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध झालेले आहेत.
१. सद्यस्थितीत सदर ड्राफ्ट गटशिक्षणाधिकारी किंवा जबाबदार शिक्षण विस्तार अधिकारी आणि संबंधित तालुक्याचे डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा संचमान्यतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून जिल्हास्तरावर तपासून घेतले जात आहेत.
2. ज्या शाळांच्या संच मान्यता विद्यार्थी संख्येनुसार बरोबर आहेत त्याच शाळांच्या संच मान्यता फायनल केल्या जात आहेत.
3. ज्या शाळांच्या संच मान्यता विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात झालेल्या नाहीत किंवा त्रुटी आहेत अशा संचा मान्यतांच्या बाबतीत संबंधित तालुक्याच्या व्यवस्थापनामार्फत प्रस्ताव प्राप्त करून घेऊन उचित दुरुस्तीसाठी माननीय शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठवायचे आहेत.
4. प्राप्त झालेले ड्राफ्ट हे अंतिम नाहीत.
5. याबाबत कोणीही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.
6. आवश्यक दुरुस्ती असल्यास तात्काळ आपल्या गटशिक्षणाधिकारी महोदयांना कळवावे.
किंवा आपणास काही अडचण असल्यास आपले तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा.
शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालतून निर्गमित दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी च्या परिपत्रकानुसार सन 2025 26 संचालन मान्यता बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
संदर्भ :-
1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसएन-2015/(प्र.क्र.16/15)/टीएनटी-2, दि.15.03.2024, दि. 19.09.2025 व दि.09.10.2025
2. शासन पत्र दि.21.02.2025 व दि. 26.03,2025
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये निर्गमित संच मान्यता सुधारित निकष तसेच शासन पत्र दि.21.02.2025 व दि.26.03.2025 मधील निर्देशानुसार दि.20.10.2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राहय धरुन सन 2025-26 च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
सोबत जोडलेल्या वापरकर्ता पुस्तिका (यूजर मॅन्युअल) नुसार तपासणी करून योग्य असणाऱ्या संचमान्यता डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) करुन शाळांना उपलब्ध करुन दयाव्यात. ज्या शाळांची पायाभूत पदांबाबत (Base Post) अडचणी असतील त्या बाबत तात्काळ प्रतिसाद दयावा.
तसेच सर्व संचमान्यता दि. 15.01.2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यावयाच्या असल्यामुळे त्रटी असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी आपणास यापूर्वी उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याची पडताळणी करून तात्काळ संबंधित शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. व आपल्या जिल्हयातील सर्व शाळांची संचमान्यता दि. 15.01.2026 पर्यंत निर्गमित होईल या दृष्टीने आवश्यकती कार्यवाही करावी.
विहित केलेल्या कालमर्यादनंतर जिल्हयातील सन 2025-26 च्या संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांचे वेतन अदा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी.
Digitally signed by Shriram Mahadu Panzade Date: 30-12-2025 18:1
( श्रीराम पानझाडे)
शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत माहितीस्तव
1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 2. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
सन 2024-25 ची संच मान्यता स्टेटस मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध झालेली आहे.
सरल वेबसाईट मध्ये संच मान्यता मध्ये जाऊन मुख्याध्यापक लॉगिन करून आपण आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या संवर्गाची किती पदे 2024 25 च्या संच मान्यतेनुसार मंजूर आहेत हे पाहू शकता.
त्यासाठी अधिकृत लिंक पुढील प्रमाणे.
वेबसाईट 👇
https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला वरील स्क्रीन ओपन होईल वरील स्क्रीन मध्ये आपल्या शाळेचा यु डायस नंबर म्हणजेच युजर आयडी व आपण सेट केलेला पासवर्ड व कॅपच्या कोड टाकून आपण लॉगिन केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
पुढील विंडो मधील सूचना काळजीपूर्वक वाचून त्याच्या खाली दिलेल्या OK बटन वर क्लिक करा म्हणजे ती सूचना स्क्रीन वरून निघून जाईल.
खाली दिलेल्या विंडोमध्ये Sanction Posts वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेमध्ये मंजूर असलेल्या पदांचा तपशील मिळेल.
वरील प्रमाणे आपण आपल्या शाळेची फायनलाईज झालेली सन सन 2024 25 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता पाहू शकता व पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून त्याची प्रिंट करून आपल्याजवळ ठेवू शकता.
मागील वर्षीची म्हणजेच 2021-22 ची संचमान्यता देखील आपण याच पद्धतीने पोर्टलवर पाहू शकता.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.






0 Comments