दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देणेबाबत शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
जा.क्र. प्राशिसं/उन्हाळी सुटटी /८०२/ दि. २७.०४.२०२६
प्रति,
१. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
विषय :- दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देणेबाबत...
संदर्भ :- १. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एसडी-४, दि. २०-०४-२०२३
२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२६/उन्हाळी सुटटी/एस-१/१७७६३११, दि. २८-०३-२०२६
उपरोक्त संदर्भ क्र १ च्या परिपत्रकास अनुसरुन संदर्भ क्रमांक २ अन्वये संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यापूर्वी दिनांक १ मे २०२६ रोजी निकाल जाहीर करावयाचा आहे
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पुढीलप्रमाणे नमूद आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्टपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे -शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणे.
उपरोक्त बार्बीचा विचार करता राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणाव्यात.
उत्तरपत्रिका पालकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिल्यास पुढील प्रमाणे फायदे होतील -
> उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता व कौशल्यांचे अचूक निदान करता येईल.
> विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करण्यास सुलभ होईल.
> तसेच वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील.
> गुणांपेक्षा कौशल्य व समज यांवर आधारित प्रगतीचे मोजमाप करणे शक्य होईल.
> विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील.
> अध्ययनातील उणिवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पार पाडली जाईल.
> विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवयी (अभ्यासाची वेळ, वाचन, लेखन) विकसित करण्यासाठी पालक सक्रिय भूमिका बजावतील.
> शाळा-घर या दोन्ही स्तरांवर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण करता येईल.
> शिक्षक-पालक यांच्यात सतत संवाद होईल.
> विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येतो.
> मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास दृढ होतो.
> विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येते.
> आत्मपरीक्षणातून सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते.
> शैक्षणिक तसेच वर्तनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रीत होईल.
वरील प्रमाणे दिलेल्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाच्या सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना निदर्शनास आणून त्याप्रमाणे अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी.
Digitally signed by
SACHINDRA PRATAP SINGH Date: 27-04-2026 21:00:27
(सचिन्द्र प्रताप सिंह) (भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
प्रत - पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी
१. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
२. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments