बदली अपडेट 2026 - जनगणना २०२६ च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत ग्राम विकास विभागाच्या सूचना

 जनगणना २०२६ च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

सदर आदेशामुळे यावर्षी मधल्या होणार की नाही या चर्चेला पूर्णविराम लागला आहे! 


महाराष्ट्र शासन

ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई- ४००००१.

दूरध्वनी क्र.०२२-२२०१७१०३

E-Mail-est१४-rdd@mah.gov.in

क्रमांक. संकीर्ण-१५२६/प्र.क्र.८३/आस्था-१४

दिनांक :- १७ एप्रिल, २०२६


प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

विषय :- जनगणना २०२६ च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना.

संदर्भः गृह सचिव, भारत सरकार यांचे अर्धशासकीय पत्र क्र. D.O.N०.९/१२/२०२६-CD (Cen), दि.११ मार्च, २०२६.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत गृह सचिव, भारत सरकार यांनी संदर्भाधिन अर्धशासकीय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जनगणना अधिनियम, १९४८ आणि जनगणना नियम, १९९० अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरीता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट-क व गट-ड संवर्गातील (जिल्हा परिषदांमधील सर्व शिक्षकांसह) कर्मचाऱ्यांची सन २०२६ ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.


आपली, 

(वैशाली डिगे)

 उप सचिव, महाराष्ट्र शासन


प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीकरीता अग्रेषित,

१) संचालक, जनगणना संचालनालय व नागरिक नोंदणी, महाराष्ट्र, जनगणना संचालनालय, द्वितीय मजला, एक्सचेंज बिल्डिंग, सर एस. राम गुलाम मार्ग, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र- ४००००१.

२) विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय (पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती/छत्रपती संभाजीनगर)

३) निवडनस्ती (आस्था-१४).


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.