महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत शासन आदेश

 महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त सन २०२७ हे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत करणेबाबत महाराष्ट्र  शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक दहा एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 

शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२६/प्र.क्र.५२/एस.डी.-४ 

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक :- १० एप्रिल, २०२६.

वाचा :- सामान्य प्रशासन विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक: शताब्दी-२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-२, दिनांक १० मार्च, २०२६

प्रस्तावना :-

महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व मानवीमूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी १९ व्या शतकात जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि शिक्षणावरील बंदी याविरोधात निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि मानवमुक्तीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला.

त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. वंचित, शोषित समाजासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळेच महात्मा फुले यांचे विचार आजही संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात.

महात्मा फुले यांच्या जयंतीला सन २०२७ मध्ये २०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमीत्ताने मा. मुख्यमंत्री महोदयांनी महात्मा जोतीराव फुले यांचे सन २०२७ हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासंदर्भात सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे. यानुसार सन २०२७ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमासाठी शासन निर्णय दि. १० मार्च, २०२६ अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत महात्मा जोतीराव फुले यांचे दि. ११ एप्रिल, २०२६ ते दि. १० एप्रिल, २०२७ या कालावधीत विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रकः-

महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक समता, स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण व सामाजिक न्याय या क्षेत्रांत केलेले कार्य अद्वितीय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्याधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, त्यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्यात यावेत.

१. दि. ११ एप्रिल, २०२६ रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात व सर्व व्यस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे.

२. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक यांनी त्यांच्या कार्याविषयी नियमित पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. त्यासाठी शाळांना पुस्तके पुरवून वाचनालये ही ज्ञानकेंद्रे म्हणून स्थापन करावीत.

३. महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करावे.

४. ऑनलाइन वेबिनार आयोजित करून स्त्री शिक्षणाचे महत्व, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांचे स्फूर्तिदायी लेखन व विचार यावर परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावीत.

५. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने महात्मा जोतीराव फुले यांचे स्री-शिक्षण आणि सामाजिक न्याय योगदानावर राज्यस्तरीय परिसंवाद, चर्चासत्रे, शैक्षणिक प्रबंध सादरीकरण कार्यशाळा आयोजित करावी.

६. महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनातील घडलेल्या विविध घटनांवर आधारित पथनाट्य, एकपात्री नाटक यांचे शालेय स्तरावर आयोजन करावे.

७. राज्यातील शाळांमध्ये, "महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह" साजरा करणे.

८. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी पुढील दिलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन #Phule २०० अभियान या HASHTAG चा उपयोग करून साजरे केलेल्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ व साहित्य अपलोड करण्यात यावे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालये यांनी आपल्या अधिनस्त राज्यातील सर्व शाळांमध्ये सदर उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल या दृष्टीने नियोजन व सनियंत्रण करावे.

९. 'आनंददायी शनिवार' या उपक्रमांतर्गत, उपरोक्त नमूद कृती कार्यक्रम/घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील. परंतु, आयोजित करण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रम/घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थ्यांकरिता ऐच्छिक राहील.

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने उपक्रम, कार्यक्रम साजरा करावयाचा कृती आराखडा


महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने उपक्रम, कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आपल्या अधिनस्त राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांचा दरमहा आढावा घ्यावा. या दृष्टीने नियोजन व सनियंत्रण करावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६०४१०१८२९१३६४२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

TUSHAR VASANT MAHAJAN

(तुषार महाजन) 

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,

२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,

३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.

४. सर्व मा. मंत्री / मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,

५. मा. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,

६. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई,

७. सर्व मंत्रालयीन विभाग,

८. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व कार्यासने,

९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (प्रसिद्धी देण्यासाठी)

१०. सर्व विभागीय आयुक्त,

११. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

१२. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

१३. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

१४. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

१५. सर्व जिल्हाधिकारी,

१६. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

१७. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

१८. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)

१९. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक / योजना), जिल्हा परिषद (सर्व)

२०. आयुक्त, सर्व महानगरपालिका,

२१. निवड नस्ती (कार्या.एस.डी.४)

वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.