अनुदानित शाळेच्या माहे मार्च/एप्रिल २०२६ च्या वेतन संबंधित येणाऱ्या अडचणी बाबत संचालक आदेश

 अनुदानित शाळेच्या माहे मार्च/ एप्रिल २०२६ च्या वेतन संबंधित वंणाऱ्या अडचणी बाबत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य कार्यालयातून निर्गमित दि. २३/०४/२०२६ रोजी च्या आदेशा नुसार पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


क्र.शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी

दिनांक :- २३/०४/२०२६

प्रति

१) विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, माध्यमिक उच्च माध्यमिक, विभागीय मंडळ, सर्व

२) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

३) शिक्षणाधिकारी मनपा, सर्व

४) प्रशासन अधिकारी मनपा, सर्व

५) शिक्षण निरीक्षक (मंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम)

६) शिक्षणाधिकारी (माध्यमिक प्राथमिक) सर्व

विषयः अनुदानित शाळेच्या माहे मार्च/ एप्रिल २०२६ च्या वेतन संबंधित वंणाऱ्या अडचणी बाबत

संदर्भ:- १) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.१६.०७.२०२५/१३२८५३२

२) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.२२.०१.२०२६./१६८५२९६

३) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६वी.दि.०४.०३.२०२६०/१७५७८५७

४) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी. दि.०५.०३.२०२६०/१६८५२९६

५) संचालनालवाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि. २७.०३.२०२६०/१८१३४८०.

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने माहे मार्च एप्रिल २०२६ च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) शाळेमधील प्रत्यक्ष संचमान्यते नुसार मान्य पदे व कार्यरत पदे यामध्ये कार्यरत पदे मंजूर संचमान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक/माध्यमिक शाळांच्या बाबतीत एकस्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी तपासणी करून त्यांचे login मधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही करावी. तसेच उच्च माध्यमिक शाळांबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या login मधून उपरोक्त प्रक्रिया पार पाडावी. माहे मार्च एप्रिल २०२६ च्या वेतना करीता शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे हयापुढे सदर सुविधा उपलब्ध असणार नाही.

२) ज्या शाळांच्या बाबत एक युडायस क्रमांक दोन शाळांना देण्यात आलेला आहे, अशा परिस्थितीत आवश्यक ती दुरुस्ती मुख्याध्यापक तथा DDO-1 व अधिक्षक (वेतन पथक) तथा D.D.O-2 यांच्या login मधून संबंधित U-Dise क्रमांकाचे अद्यावतीकरण करण्यात यावे. तसेच एका U-Dise क्रमांकावर दोन शाळांचे D.D.O-कोड तयार झाले असल्यास एक D.D.O-कोड अधिक्षक वेतन पचक यांच्या login मधून अकार्यान्वित करण्यात यावा.

३) शालार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडसर येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.

उपसंचालक यांनी प्रथम निवक्ती दिनांक व जन्म दिनांक याबाबतची पडताळणी करुन कागदपत्रांच्या आधारे प्रथम नियक्ती दिनांक जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करावा.. अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करावा. तसेच संबंधितांना आदेशासह कळवावे.

उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करुन माहे मार्च/एप्रिल २०२६ मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावी.


(डॉ महेश पालकर) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पणे-१

प्रत आवश्यक कार्यवाहीस्तव

२) श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, (शालार्थ सिस्टीम) महाआयटी, मुंबई. यांना देऊन कळविण्यात येते की उपरोक्त सूचनांच्या अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर आवश्यक तो तांत्रिक बदल करण्यात यावा.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.