'पॅट' पेपरफुटीप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेची तक्रार!
सुप्रसिद्ध वृत्तपत्र छापून आलेल्या बातमीनुसार..
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) परीक्षेची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांत प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात समाज माध्यमांतील सहा चॅनेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या डॉ. मनीषा ताठे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता, गणित, इंग्रजी, मराठी विषयातील कल जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) परीक्षा घेण्यात येते. खासगी पुण्यातील एका मुद्रणालयातून प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. या प्रश्नपत्रिका छापल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वितरित करण्यात येतात. ही प्रक्रिया गोपनीय असते. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच सहा चॅनेलवर मराठी, इंग्रजी, गणित या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे उघडकीस आले.
यापूर्वीही प्रकार
याआधीही परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांत प्रसारित झाल्याचे प्रकार दोनदा उघडकीस झाले. याप्रकरणी एका शिक्षकासह अल्पवयीनाविरुद्ध कारवाई करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ, तसेच अन्य परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांस प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ५, ६ अन्वये आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत. 'परीक्षा होण्यापूर्वीच ही प्रश्नपत्रिका कशी प्रसारित झाली, त्यात पैसे स्वीकारण्यात आले का, या प्रकरणात आणखी कोणी सामील आहेत का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे,' असे घोडके यांनी नमूद केले.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments