परीक्षा केंद्रावरील CCTV कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग जतन करून ठेवणेबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी सर्व विभागीय सचिव सर्व विभागीय मंडळे यांना पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
संदर्भ:
२. शासन पत्र क्रमांकः परीक्षा-१६२५/प्र.क्र.१३/एसडी-२ दि. ०३ डिसेंबर, २०२५
३. राज्यमंडळ कार्यालयाचे कमांक.रा.मं./ परीक्षा-५/४१३२ दि.०५/१२/२०२५ रोजीचे पत्र.
४. शासन निर्णय क्र. परीक्षा १६२५/प्र.क्र.२२१/एस.डी. २ दि.०९.०१.२०२६
५. शासन पत्र क्रमांकः- परीक्षा-१६२५/प्र.क्र.१३ एसडी-२ दि. ३० जानेवारी, २०२६. ६. राज्यमंडळ कार्यालयाचे क.रा.मं./ परीक्षा-५/४३७ दि.३०/०१/२०२६ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, शिस्त च गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत विभागीय मंडळांनी केंद्रसंचालक बैठकीमध्ये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दिनांक १० फेब्रु., २०२६ ते दिनांक १८ मार्च, २०२६ तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दिनांक २० फेब्रु.. २०२६ ते दिनांक १८ मार्च, २०२६ या कालावधीत होत आहेत. उपरोक्त कालावधीतील परीक्षा केंद्र परीसरातील व परीक्षेशी संबंधित वर्गखोल्या तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) / सामान्यज्ञान (GK) विषयांच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान संगणक प्रयोगशाळेतील CCTV कैमेन्यांचे फुटेज जतन करुन ठेवणं अनिवार्य असून त्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. रेकॉर्डिंग व संचयन (Storage) व्यवस्था:
१. परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा कक्षातील कॅमेऱ्यांचे किमान ३० मिनिटे व परीक्षा संपल्यानंतर (दिव्यांग विद्यार्थी असलेस त्या कालावधीचा विचार करून) रेकॉडिंग सुरू ठेवणे चंधनकारक राहील. परीक्षा केंद्रावरील DVR/NVR मधील प्रत्येक पेपर दिवशीचे रेकॉडींग स्वतंत्र पेनड्राईव्ह / संगणकावर जतन करुन ठेवावे, फुटेज साईज (Data) अधिक असल्यास हार्डडिस्कमध्ये ते जतन करुन ठेवाये. रेकॉडींग जतन करत असताना आयटी शिक्षक किंवा तंत्रस्नेही शिक्षकाची मदत घ्यावी.
२. सर्व कैमेरे सतत Continuous Recording Mode वर ठेवावेत. Motion Recording टाळाचे.
3. DVR/NVR मध्ये पुरेशी हार्डडिस्क क्षमता किमान १ TB किंवा आवश्यकतेनुसार अधिक असावी. क्षमता कमी असल्यास DATA वगळला जाण्यापूर्वीच वेळोवेळी Hard Disk किंवा संगणकामध्ये त्या दिवसापर्यंतचा डाटा साठवून घ्यावा.
४. केंद्रावरील सर्व पेपरच्या दिवशीचे uncdited स्कॉडिंग पेनड्राईव्ह अथया संगणकावर, तसच आवश्यकतनुगाः हार्डडिस्कमध्ये पुढील आदेशापर्यंत जतन करुन ठेवावे. विभागीय मंडळ अथवा जिल्ला दक्षता समितीने महागण केल्यास तात्काळ ने उपलब्ध करुन द्याचे.
५. आवश्यकतेनुसार बैंकअप External Hard Disk / Cloud Storage ठेवणे बंधनकारक राहील.
६. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावरीन CCTV चे live access जिल्हा दक्षना मिली / वांरष्ठ कार्यालय तमंच मंडळानं मागणी केल्यास परीक्षा केंद्रांनी ते उपलभ फान देणे अनिवार्य आहे.
७. दररोज पेपर सुरु होण्यापूची आणि वेळोवेळो गर्व CCTV कमर सुरू आहेत बाधावत केंद्रसंचालकांनी चाधी करावी.
८. परीक्षा केंद्रास भेट देणाऱ्या अधिकारी, भरारी पथक, बैठे पथक यांना CCTV कैमेरे व यंत्रणा कार्यान्वित असल्यायावत केंद्रसंचालकांनी अवगत करावे.
९. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसर व वर्गखोल्यांमधील CCTV कैमेरे बंद असगी बंद ठेवणे, access उपलब्ध करुन न देणे, फुटेज न ठेवणे अथवा उपलब्ध करून न देणे या बाबी गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने केल्याच मानण्यात येईल. यायावत संबंधित केंद्राचे प्राचार्य, केंद्रसंचालक, केंद्रसमन्वयक यांच्यावर जवाबदारी निश्चित करुन गैरमार्ग प्रतिबंध अधिनियम १९८२ अंतर्गत गैरप्रकार करणे, गैरप्रकारास मदत करणे आणि उत्तेजन देणे या कलम क्र. ०३ अन्वये कारवाई करण्यात येईल.
वरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे ही परीक्षा केंद्रसंचालकांची व संबंधित परीक्षा केंद्र शाळा /कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य व केंद्र समन्वयक यांची येक्तिक जयायदारी राहील. कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल असे आपल्या स्तरावरून संबंधितांना कळविण्यात यावे,
वरील सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
(मा. अध्यक्ष यांचे मान्यतेने)
(डॉ. दिपक माळी)
सचिव
राज्यमंडळ, पुणे-०४
परीक्षा केंद्रामध्ये CCTV वापराबाबत तांत्रिक व प्रशासकीय सर्वसाधारण सूचना
१) CCTV कॅमेऱ्यांच्या तांत्रिक बाबी:
कमी प्रकाशात (Low Light) देखील स्पष्ट रेकॉर्डिग होईल अशी प्रकाशव्यवस्था असावी.
प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये दिनांक व वेळ (Date & Time Stamp) अचूकपणे सेट असणे आवश्यक आहे.
२) कॅमेरे बसविण्याची पद्धत :
प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये संपूर्ण वर्ग स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने किमान १ किंवा आवश्यकतेनुसार अधिक कॅमेरे असावेत.
परीक्षा केंद्रसंचालक कक्ष, प्रवेशव्दार, कॉरिडॉर, परीक्षेसाठी आवश्यक वर्गखोल्या व नियंत्रण कक्ष येथे कॅमेरे आवश्यक आहेत.
कॅमेरे अशा उंचीवर बसवावेत की त्यामध्ये छेडछाड होणार नाही.
३) वीजपुरवठा व नेटवर्क सुविधा :
CCTV प्रणाली UPS / इन्व्हर्टरशी जोडलेली असावी.
वीजपुरवठा खंडित झाल्यास किमान २ तास रेकॉर्डिंग सुरू राहील अशी व्यवस्था असावी.
नेटवर्क आधारित प्रणाली असल्यास इंटरनेट कनेक्शन स्थिर व सुरक्षित असावे.
LAN केबलिंग व्यवस्थित व सुरक्षित पद्धतीने करण्यात यावे.
४) नियंत्रण व देखरेख :
परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व कॅमेरे कार्यरत असल्याची खात्री केंद्रसंचालकांनी करावी.
नियंत्रण कक्षात मॉनिटरद्वारे थेट निरीक्षणाची सुविधा उपलब्ध असावी.
CCTV फुटेजमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी केंद्रसंचालकांची राहील.
जिल्हास्तर दक्षता समिती / संबंधित अधिकारी / मंडळाने मागणी केल्यास आवश्यक फुटेज त्वरित उपलब्ध करून द्यावे.
५) सुरक्षितता व गोपनीयता :
रेकॉर्डिंगमध्ये प्रवेश केवळ अधिकृत व्यक्तींनाच असावा.
DVR/NVR प्रणाली पासवर्ड संरक्षित असावी.
प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक सायबर सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments