मूल्यवर्धन जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण यासाठी निधी वितरीत करणेबाबत राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
संदर्भ :
१. मूल्यवर्धन अंमलबजावणीबाबत शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्यामध्ये झालेला सामंजस्य करार, दि. २८/०४/२०२५
२. समग्र शिक्षा अंतर्गत केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाचे इतिवृत्त, दि.०२/०५/२०२५ (प्राप्त दि.१६/०५/२०२५)
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./रा.शै.सं.प्र.प./स.वि/मूल्यवर्धन राज्यस्तरीयाOT /१/१२८५९४४/२०२५, दि.१२/०६/२०२५
४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./रा.शै.सं.प्र.प./स.वि/मूल्यवर्धन जिल्हास्तरीय TOT व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण /।/१३२१३९५/२०२५, दि.१०/०७/२०२५
५. मप्रशिप/सशि/लेखा/निधि वितरण/ ECE, SEC-Rec./२०२५-२६/२३४७, दि. ०१/०८/२०२५
६. मा. सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे निर्देश, दि. २२/०८/२०२५
७. मा. संचालक यांचे निर्देश, दि. ०३/०९/२०२५
८. मा. संचालक यांचे निर्देश दि. १७/०९/२०२५
९. या कार्यालयाचे पत्र जा. क्र/रा.शै.सं.प्र.प./स.वि/मूल्यवर्धन जिल्हास्तरीय TOT दि. १७/०९/२०२५
१०. मा. संचालक यांची मान्य टिपणी दि. १७/०९/२०२५
११. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./रा.शै.सं.प्र.प./स.वि/मूल्यवर्धन जिल्हास्तरीय प्रशिक्षण निधी वितरण /१/१४३२५८४, दि.१७/०९/२०२५
१२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र. १९/एसडी-६, दि. २२/०९/२०२५
१३. मप्रशिप/सशि/लेखा/सशि/LEP/कास/२०२५-२६/३०९७ दि. १५/१०/२०२५
उपरोक्तसंदर्भीय विषयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा सन २०२५-२६ मध्ये Fundsfor quality (LEP) अंतर्गत concept based activity books and workbook (Value Education) on SEEL अंतर्गतमूल्यवर्धन या उपक्रमास संदर्भ क्र. २ नुसारकेंदीय प्रकल्प मान्यता मंडळाची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. १ नुसार महाराष्ट्र शासन आणि शांतीलालमुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे.
मूल्यवर्धन ३.० कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यात सन २०२५-२६ मध्ये राज्याच्या सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करायची आहे. त्या अनुषंगानेसंदर्भक्र. ३ नुसारराज्यस्तरीयप्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) पाच टप्प्यांमध्ये दि. १६/०६/२०२५ ते १८/०७/२०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले होते..
संदर्भ क्र. ४ नुसार जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) निवासी स्वरुपात आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिक्षकांचे तालुका/केंद्र स्तरीय प्रशिक्षण अनिवासी स्वरुपात आयोजित करणे बाबत कळविण्यात आले होते. त्यासाठी संदर्भ क्र. १० आणि ११ नुसार एकूण ३६ जिल्ह्यांपैकी ३१ जिल्ह्यांना जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी निधी वितरण करण्यात आले होते. उर्वरित बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि ठाणे या ५ जिल्ह्यांना जिल्हास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी आणि सर्व ३६ जिल्ह्यांना तालुका/केंद्र स्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी निधी वितरण करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे.
मूल्यवर्धन जिल्हा व तालुका / केंद्र स्तरीय प्रशिक्षणनिधी वितरण
उपरोक्त प्रमाणे एकूण रक्कम रु. १६,०४,८८,१५०/- (अक्षरी रु. सोळा कोटी चार लक्ष अनुयाऐंशी हजार एकशे पन्नास फक्त) जिल्ह्यांना RTGS द्वारे वितरीत करण्यात येत आहे. अनू. क्र. ८ व९ मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याची रक्कम प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांना वितरीत करण्यात येत आहे. सदर खर्च संदर्भ क्र. ४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार तसेच विहीत वित्तीय नियमावली नुसार खर्च करून उपयोगिता प्रमाणपत्र या कार्यालयास त्वरित सादर करावे.
Digitally signed by Rahul Ashok Rekhawar Date: 02-11-2025 17:03:22
(राहुल रेखावार, भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादरः
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments