शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स बचत खाते उघडण्याबाबत MSCE चे निर्देश

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स बचत खाते उघडण्याबाबत दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्याना प्रौत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना, महाराष्ट्र राज्य शासनाने सन १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते. सदर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नवीन बैंक खाते उघडणे आवश्यक आहे. त्याशिवाय विद्याथ्यर्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यांना हस्तंतरित करता येत नाही.

तथापि बऱ्याच वेळा झिरो बॅलन्स खाते उघडण्यास बैंका टाळाटाळ करतात. त्यामुळे शिष्यवृत्तीची अल्प रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी पालकांना स्वतःचे पैसे गुंतवून पाल्याचे बँक खाते उघडावे लागते. अशा परिस्थितीत पालक जर आपल्या अल्पवयीन पाल्याचे बँक खाते उघडण्यास असमर्थ ठरले तर तो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रक्कमेपासून वंचित राहतो.

सदर शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थांची शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे आई वडील / पालक यांचे संयुक्त बैंक खाते विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बैंक खात्याशी संलग्न असलेले झिरो बॅलन्स बचत खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडविण्यास सहकार्य करावे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील तालुकास्तरीय जिल्हा मध्यर्ती सहकारी बँकांचे अधिकारी यांना कळविण्यात यावे, जेणेकरुन तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये खाते उघडणेबाबत कळविणे सोईचे होईल. बँक खाते नसलेल्या सर्व विद्याथ्यांची यादीची Soft Copy त्यांच्याकडे उपलब्ध आहे.


 (डॉ. नंदकुमार बेडसे, भा.प्र.से.) 

अध्यक्ष, 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४.

प्रत माहितीस्तव व पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी -

शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व यांना उपरोक्त पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे अधिकारी /समन्वयकांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यास्तव अग्रेषित.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती साठी Subscribe करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.