शिक्षक बदल्या 2025 पती पत्नी एकत्रीकरण वन युनिट मधून बदली कशी दिली जाते?

✳️ वन युनिट मधून बदली कशी दिली जाते?

संजय नागे दर्या.अमरावती

9767397707

बऱ्याच वन युनिट मधील शिक्षकांशी वन युनिट बाबत बोलण्याची संधी मिळाली व सर्वांच्या चर्चेमधून वन युनिट बाबत संपूर्ण माहिती नसल्याचे निदर्शनात आले करिता आपणास वन युनिट ची बदली प्रक्रिया कशी राबवली जाते त्याबाबत उदाहरणासह विश्लेषण केलेलं आहे.

➡️ ज्या दोन बदली पात्र शिक्षकांना वन युनिट मधून बदली करायची असेल अशा शिक्षकांमधील सेवा जेष्ठ शिक्षक वन युनिट करिता फॉर्म भरतो.

➡️ जो शिक्षक वन युनिट करिता फॉर्म भरतो त्या शिक्षकाला त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार 30 प्राधान्यक्रम द्यावे  लागतात.

➡️ सेवा जेष्ठ शिक्षकांनी दिलेले प्राधान्यक्रम हे सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेनुसार दोघांनीही लागू असतात.

➡️ जोडीदार जर बदली पात्र असेल तर त्यांनाही त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार फॉर्म पोर्टलवर भरावा लागतो.

➡️ उदाहरणादाखल 1997 चे बदली पात्र शिक्षक व जोडीदार 2005 बदली पात्र शिक्षक  असेल तर खालील प्रमाणे फॉर्म भरावा.

➡️ सर्वप्रथम वन युनिट करिता वरील दोघांपैकी 19 97 चा सेवा जेष्ठ शिक्षक हा वन युनिटकरिता वन युनिट निवडून फॉर्म भरेल.

➡️ समजा सेवाजेष्ठ शिक्षकाने (उदा. 1997) आपल्या प्राधान्यक्रमामध्ये आपल्याला मिळू शकणाऱ्या दोन पदाच्या शाळा 5 व एक पद असणाऱ्या शाळा 25 घेऊन अशा 30 शाळांचा प्राधान्यक्रम पोर्टलवर भरून फॉर्म सबमिट केला.

➡️ सोबतच सेवाजेष्ठ शिक्षकाचा जोडीदारनेही आपल्या मोबाईल नंबर वरून लॉगिन करून 2005 च्या सेवाजेष्ठतेने 2005 ला मिळू शकणाऱ्या 30 पर्याय निवडून फार सबमिट केला.

➡️ या ठिकाणी सर्वप्रथम पोर्टल सेवाजेष्ठ शिक्षकाचा वन युनिटमध्ये भरलेल्या फॉर्मवर बदली प्रक्रिया करेल ती खालील प्रमाणे.

➡️ पोर्टल सर्वप्रथम 19 97 च्या  वन युनिट मधील सेवाजेष्ठ शिक्षकाचा फॉर्म तपासल्यानंतर खालील तीन प्रकारे दोघांनाही बदली देऊ शकते.

✳️ प्रकार 1

➡️ सर्वप्रथम पोर्टल सेवा जेष्ठ शिक्षकाच्या प्राधान्यक्रमातील दोन पदे असलेल्या शाळा तपासते त्या आपण प्राधान्यक्रमात कुठेही भरल्या तरी त्या पोर्टल सर्वप्रथम तपासते त्यानंतर दिलेल्या पाच शाळांपैकी दोन पदे रिक्त असलेल्या शाळांमधून ज्या शाळेवर दोन पदे सर्वप्रथम रिक्त असतील अशी शाळा शोधून सर्वप्रथम दोघांनाही त्या एका शाळेवर वन युनिट अंतर्गत दोघांनाही बदली देते.

✳️शक्यता 2.

➡️ सेवा जेष्ठ शिक्षकांनी दिलेल्या प्राधान्यक्रमातून जर एकही शाळा दोन पद रिक्त असणारी न मिळाल्यास त्यांच्याच प्राधान्यक्रमातून पुन्हा क्रमांक एक पासून प्राधान्यक्रम तपासून समजा सहा नंबरची शाळा रिक्त असेल तर ती सेवा जेष्ठ शिक्षकाला दिली जाते व  समजा सहाव्या, सातव्या क्रमांकाची शाळा त्यांच्या सेवाजेष्ठ शिक्षकांनी घेतली आहे असे समजून जर आठ नंबरची शाळा रिक्त असेल तर आठ नंबर च्या शाळेवर जोडीदाराला बदली दिली जाते अशा प्रकारे दोन्ही शिक्षकांना दुसऱ्या प्रकारानुसार वन युनिट मधून बदली दिली जाते.

✳️प्रकार 3

➡️ जर सेवा जेष्ठ शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम त्यांच्या सेवाजेष्ठतेने किंवा विचारपूर्वक भरला नाही अशा परिस्थिती पोर्टल सेवाजेष्ठ शिक्षकाचा 30 शाळांचा प्राधान्यक्रम तपासते त्यामध्ये दोन पदे असलेली एकही शाळा मिळाली नाही सोबतच एक पद असलेल्या शाळा ही त्यांच्या सेवा जेष्ठ शिक्षकांनी घेतल्या व फक्त 25 नंबरची शाळा रिक्त आहेव व 26 ते 30 क्रमांकाची ही शाळा सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी घेतल्या अशा परिस्थितीत सेवाजेष्ठ शिक्षकाला 25 नंबरची शाळा देऊन त्यांची त्यांच्या प्राधान्यक्रमातून बदली केली जाते व या ठिकाणी जोडीदाराला शाळा न मिळाल्यामुळे वन युनिट रद्द केल्या जाते.

➡️ वरील परिस्थितीत जोडीदाराला शाळा मिळाली नाही त्यामुळे वन युनिट रद्द होऊन जोडीदाराचा यापूर्वीच भरलेला फॉर्म पोर्टल जेव्हा 2005 ची बदली प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तीस शाळांचा प्राधान्यक्रम तपासून जोडीदाराला शाळा दिली जाते.

➡️ या ठिकाणी सेवा जेष्ठ शिक्षकांनी दिलेल्या शाळा जोडीदाराने आपल्या प्राधान्यक्रमात शक्यतोवर भरू नये कारण सेवाजेष्ठ शिक्षकाचा प्राधान्यक्रम हा जोडीदारालाही लागू असतो.

➡️ वरील प्रमाणे बदली होत असताना जोडीदार जर बदलीस पात्र नसेल वरील प्रकाराप्रमाणे बदली होत नसेल तर ते आहे त्या ठिकाणी राहतात.

➡️ जोडीदाराला फॉर्म भरताना वन युनिट निवडताना No  करण्याची गरज नाही तो बदल पोर्टलवर करण्यात आलेला आहे सरळ फॉर्म भरावा.

अजूनही आपणास बदली पात्र किंवा वन युनिट बदली प्रक्रिये बद्दल काही शंका असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता

धन्यवाद.


✳️बदली पात्र व 1 युनिट शंका समाधान. 

संजय नागे दर्या.अमरावती.

दि. 4 ऑगस्ट 2025

बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया संपलेली असून बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या  CEO लॉगिन ला प्राप्त  झालेल्या आहेत काही वेळातच बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात येईल. 

संवर्ग 4 साठी सुधारित रिक्त पदांची यादी  आज दुपार पर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर लगेच संवर्ग 4 करिता अर्ज भरण्यासाठी सुविधा मंगळवारी सुरू होणार आहे.

✳️ बदली पात्र शिक्षकांना 1 युनिट मध्ये फॉर्म भरताना येणाऱ्या शंका व समाधान. 

(सध्या परिस्थितीत बदली प्रक्रिया ही 18 जून 2024 च्या शासन आदेशानुसार होत असून शासन आदेशातील भाषा ही संदिग्ध असते त्यामुळे शासन आदेशातील प्रत्येकच मुद्द्याचा शब्दशः अर्थ लावू नये. 

➡️ 1) प्राधान्य क्रम भरताना घाई करू नये कारण प्राधान्यक्रम भरण्याकरिता 4 दिवस दिलेले आहे आपण असलेल्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करूनच प्राधान्यक्रम भरावा. 

➡️ 2) बदली पात्र शिक्षकांना 30 किंवा पोर्टलवर 30 पेक्षा कमी असल्यास तेवढे प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील. 

➡️ 3) 1 युनिट चा लाभ घेताना पती-पत्नी जिल्हा परिषदेचे शिक्षक असून दोघांमधील अंतर 30 किलोमीटर असणे अनिवार्य आहे. 

➡️ 5) परंतु अशा पती पत्नीला 1 युनिट मधून बदली घ्यायची नसेल तर 1 युनिट हे अनिवार्य नाही म्हणजेच पती-पत्नी 30 किलोमीटरच्या आत असतील तरीही त्यांना एक युनिट मधून आवश्यकता नसल्यास बदली घेणे बंधनकारक नाही. 

➡️ 6)1 युनिट मधील शिक्षकांपैकी एक बदली पात्र शिक्षक आहे आणि दुसरा बदली पात्र शिक्षक नाही अशा परिस्थितीत फक्त बदली पात्र शिक्षकांलाच एक युनिट अंतर्गत फॉर्म भरावा लागतो. 

➡️ 7)1 युनिट मध्ये फॉर्म भरताना दोघेही शिक्षक बदली पात्र असतील तर दोघांनाही फॉर्म भरावा लागतो. 

➡️ 8)1 युनिटमध्ये 1 युनिट करिता ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यांच फॉर्म मधून दोघांनाही बदली मिळते. 

➡️ 9)1 युनिट मधील दुसऱ्या जोडीदाराचा फॉर्म हा बदली पात्र मधून स्वतःचा वैयक्तिक फॉर्म भरावा लागतो तो सेफ्टी  (Sefty) फॉर्म असतो. 

➡️ 10) जोडीदाराचा फॉर्म भरताना तो जोडीदाराच्या सेवाजेष्ठतेनुसार भरावा. 

➡️ 11) 1 युनिट मधील दोन्ही फॉर्म मधील प्राधान्यक्रम हे सारखे भरण्याची गरज नाही जर आपण दोन्ही फॉर्म सारखे भरल्यास व दोघांमधील सेवाजेष्ठतेत एक वर्षापेक्षा जास्त फरक असेल तर जोडीदार विस्थापित होऊ शकतो. 

➡️ 12) वन युनिट मधून बदली देत असताना पोर्टल दोघांनाही वन युनिट मधून ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे त्याच फॉर्म मधून बदली देते जर त्याच फॉर्म मधून बदली झाली नाही तर प्रथम सेवा जेष्ठ शिक्षकाला बदली देते व नंतर आपल्या जोडीदाराचा फॉर्म त्यांच्या सेवाजेष्ठतीने तपासून त्याला बदली देते. 

➡️ 13) वन युनिट मध्ये फॉर्म भरताना आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल तर व त्यांना वन युनिट मधून बदली मिळाली नाही तर त्याची बदली होत नाही. 

➡️ 14) वन युनिट मधून अर्ज करताना दोन पदे रिक्त आहेत अशा शाळा प्राधान्याने निवडाव्यात व उर्वरित प्राधान्यक्रमत एक पद रिक्त असलेल्या शाळा भराव्यात. 

➡️ 15) वन युनिट मध्ये बदली करताना पोर्टल प्रथमतः दोन पदे रिक्त असणाऱ्या शाळा तपासते जर आपणास दोन पदं असणारी शाळा देता आली नाही तर एक पदाच्या शाळेतून दोघांनाही बदली देण्यात येते. 

➡️ 16) एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची अट नाही.

✳️ बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना येणाऱ्या शंका व समाधान. 

➡️ 1) बदली पात्र शिक्षक आपल्यापेक्षा सेवाजेष्ठ किंवा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतात. 

➡️ 2) बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या उर्वरित जागाचा प्राधान्यक्रम भरता येतो. 

➡️ 3) ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष सेवा व कार्यरत शाळेवर पाच वर्षे झाले अशा शिक्षकांच्या जिल्हा सेवाजेष्ठतेने बदल्या केल्या जातात. 

➡️ 4) बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्य क्रम भरताना आपल्या सेवा जेष्ठतेचा विचार करूनच भरावेत. 

➡️ 5) बदली पात्र शिक्षकांना आपला प्राधान्यक्रम भरण्याकरिता 4 दिवसांचा वेळ दिलेला असतो त्या चार दिवसात आपण केव्हाही फॉर्म भरला तरीही त्याचा बदली प्रक्रियेवर कोणताही फरक पडत नाही. 

➡️ 6) बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या सेवाजेष्ठतेने होतात. 

➡️ 7) बदली पोर्टलवर प्रत्येक शिक्षकाचा 1 ते 30 प्राधान्यक्रम सिस्टीम तपासल्याशिवाय पुढील शिक्षकांचा प्राधान्यक्रम तपासत नाही. 

➡️ 8) बदली पात्र शिक्षकांनी शक्यतोवर विनंती पर्याय निवडूनच अर्ज करावा आपण अर्ज प्रशासकीय मध्ये भरल्यास आपण सरळ विस्थापित राऊंडमध्ये जाणार व विस्थापित राऊंडमध्ये पुन्हा आपणास आपला अर्ज प्रशासकीय मध्ये भरावा लागेल या ठिकाणी जर आपली शाळा कोणीही घेतली  नाही तर आपली बदली होणार नाही. 

➡️ 9) बदली पात्र शिक्षकांनी प्रशासकीय मध्ये अर्ज करून जर त्यांना बदली मिळाली नाही तर असे शिक्षक ज्या जिल्ह्यांमध्ये अवघड क्षेत्र आहे त्या जिल्ह्याच्या अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या यादीत समावेश होऊन त्यांची बदली टप्पा क्रमांक 7 मधून अवघड क्षेत्रात होऊ शकते. 

➡️ 10) बदली पात्र शिक्षकांनी जर पसंती क्रम दिले नाहीत किंवा पसंती क्रम दिल्यानंतर त्यांच्या पसंतीक्रमतून बदली मिळाली नाही तर ते विस्थापित होऊन पुन्हा विस्थापित टप्प्यावर 30 शाळाचा प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देण्यात येते. 

*सदर पोस्ट आपण इतर ग्रुप वर edit न करता फॉरवर्ड करावी जेणेकरून त्यांनाही फायदा होईल.*


याबद्दल कोणतीही शंका असल्यास 9767397707 या नंबरवर आपण मला सरळ कॉल करू शकता.


  शिक्षक बदल्या 2025

 1 युनिट स्पष्टीकरण

✳️शिक्षकांनी वन युनिट करिता अर्ज करताना खालील मुद्द्यांचा विचार करावा. 


➡️ 1) बदली अधिकार पात्र शिक्षक (संवर्ग 3) व बदली पात्र शिक्षकच (संवर्ग 4) वन युनिट अंतर्गत अर्ज करू शकतात. 

➡️  2) 1 युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती-पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे.

➡️  3) पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बदली देण्यात येईल.



➡️  4) दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाजेष्ठ बदली पात्र किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय. 

➡️ 5) या ठिकाणी आपण लक्षात ठेवावे की जो शिक्षक वन युनिट करिता पसंतीक्रम देईल त्याच पसंतीक्रमातील शाळा दोघांनाही मिळणार आहेत. 

➡️ 6) वन युनिट करिता अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी पसंती क्रम भरताना जास्तीत जास्त ज्या शाळेवर दोन पदे रिक्त आहेत अशाच शाळा प्राधान्याने निवडाव्यात त्यामुळे दोघांनाही निश्चितच एकच शाळा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. 

✳️एक युनिट करिता अर्ज करण्याकरिता खालील शिक्षक पात्र ठरतात. 

1) दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास. 

2) दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास. 

3) एक बदली अधिकार पात्र व दुसरा बदली पात्र. 

4) एक बदली अधिकार पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात. 

     कितीही सेवा झालेला जोडीदार. 

5) एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही

   सेवा झालेला जोडीदार. 

✳️1) दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास. 

➡️ बदली अधिकार पात्र टप्प्यातून जर आपण एक युनिट म्हणून बदली करिता पसंती क्रम देत असाल तर  फक्त 1 युनिट करिता सेवा जेष्ठ शिक्षकालाच पसंतीक्रम द्यावा लागेल जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारल्या जाणार नाही. 

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी एक युनिट मधून बदली करिता पसंती क्रम दिला व दोघांनाही त्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाही तर दोघांचीही बदली केली जाणार नाही. 

परंतु संबंधित  बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र असल्यास त्यांना बदली पात्र टप्प्यावर अर्ज करण्याची संधी राहील. 

➡️ कृपया या ठिकाणी वरील अतिशय महत्त्वाचा बदल पोर्टलमध्ये करण्यात आलेला आहे त्याकरिता शिक्षकांनी जर आपल्याला पूर्णता शाश्वती एक युनिट मधून शाळा मिळण्याची असेल तरच एक युनिट मधून प्राधान्यक्रम भरावा अन्यथा प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर दोघांचीही बदली होणार नाही. 

2) दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास. 

➡️ जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाजेष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करिता अर्ज भरावा लागेल.

➡️ बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.

➡️ एक युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला एक युनिट अंतर्गत शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना त्यांनी दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार त्याच टप्प्यावर शाळा मिळेल किंवा विस्थापित टप्प्यामध्ये शाळा मिळेल. 

3) एक बदली अधिकार पात्र व दुसरा बदली पात्र. 

➡️ वन युनिट करिता अर्ज करणारा एक शिक्षक बदली अधिकार पात्र असेल व दुसरा शिक्षक बदलीस पात्र असेल तर वन युनिट करिता बदली अधिकार पात्र शिक्षकाला अर्ज करावा लागेल बदली पात्र शिक्षकाचा अर्ज याठिकाणी स्वीकारल्या जाणार नाही. 

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकाने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार दोघांनाही शाळा मिळाली नाही तर या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकांची बदली होणार नाही परंतु जोडीदार बदली पात्र असल्यामुळे संबंधित शिक्षकाला बदली पात्र टप्प्यावर पसंती क्रम देण्याची संधी मिळेल. 

4) एक बदली अधिकार पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार. 

➡️  एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली अधिकार पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही. 

➡️ वन युनिट करिता अर्ज करणारा एक बदली अधिकार पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकाला 1 युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल. 

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या पसंती क्रमानुसार दोघांनाही बदली मिळेल परंतु बदली न मिळाल्यास दोघांचीही बदली होणार नाही. 

5) एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार. 

➡️ एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही. 

➡️ वन युनिट करिता अर्ज करणारा एक बदली पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली पात्र शिक्षकाला 1 युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल. 

➡️  दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदली पात्र शिक्षक नसेल अशावेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल या ठिकाणी जोडीदार बदलीस पात्र नसल्यामुळे जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारल्या जाणार नाही. 

➡️  पती-पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही.

एक युनिट म्हणून लाभ घेतांना सर्वप्रथम दोघांनाही एका शाळेवर दोन जागा असतील तर अशा ठिकाणी दोघांनाही बदली देण्याचा प्रयत्न सिस्टीम करेल अन्यथा आपण दिलेल्या 30 शाळांच्या पसंतीक्रमामधून दोन शाळांवर दोघांनाही बदली देण्याचा सिस्टीम प्रयत्न करेन वरील दोन्ही प्रकारातून आपणास बदली देता आली नाही तर सिस्टीम ज्या शिक्षकांनी 1 युनिट करिता अर्ज केलेला आहे त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना बदली दिली जाईल. 

वन युनिटचा लाभ घेताना दोन्ही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना वन युनिटचा लाभ घेणे फायद्याचे ठरेल कारण यामध्ये सेवा जेष्ठ शिक्षकांबरोबर सेवा कनिष्ठ शिक्षकांना शाळा मिळू शकतात तसेही आपण दोघेही वैयक्तिक बदली पात्र मधून पसंती क्रम देणार आहोतच. 

पती-पत्नीमध्ये सेवा जेष्ठतेचा खूप फरक असल्यास वन युनिटचा लाभ घेणे अतिशय फायद्याचे ठरते. 

✳️ वन युनिट मध्ये पसंती क्रम भरताना आपणास वन युनिट मध्ये पसंती क्रम भरायचे असल्यास do you want to apply as one unit या प्रश्नाचे उत्तर Yes निवडून प्राधान्यक्रम भरावा. 

✳️ शेवटी प्राधान्यक्रम सबमिट केल्यानंतर दोघांनाही ओटीपी द्यावे लागतील. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

1 Comments

  1. वन युनिट मध्ये फॉर्म भरताना ब्रॅकेट सिस्टीम असायला हवी... जसे एका शाळेवर दोन जागा असेल तर त्यांना तेथील जागा मिळेल, परंतु एका शाळेवर एक जागा व दुसऱ्या शाळेवर एक जागा असेल तर या दोन्हीपैकी एक एक द्या... कारण 30 ऑप्शन पैकी जर दोन जागा आढळल्या नाही, सीनियर सिंगल शिक्षकांनी घेतल्याने त्या संपल्या तर 30 पैकी कोणतीही शाळा देताना अंतराची मर्यादा खूप लांब पर्यंत राहील आणि ब्रॅकेट सिस्टीम असेल तर एका ब्रॅकेटमध्ये दोन शाळा टाकल्या तर दोन जागांची एक शाळा मिळाली नाही तर या ब्रॅकेट मधील दोन्हीपैकी एकेक द्या पुढच्या ब्रॅकेट मधील दोन्हीपैकी एकेक द्या असे करणे सोपे जाईल.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.