आता रोज शालेय पोषण आहार (PM Poshan)चे Geo-Mappaing फोटो पाठवणे बंधनकारक?

 जळगाव जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे निर्देशानुसार मध्यान भोजनाचे जिओ टॅगिंगसह दररोज फोटो पाठवणे अनिवार्य या मथळ्याखाली पुढील प्रमाणे बातमी प्रसिद्ध झाली आहे! 

स्थानिक वृत्तपत्रातील बातमी पुढील प्रमाणे... 

जिल्हा परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील एकूण १८०० शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर आणि नियमिततेवर थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल लक्ष ठेवणार आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळांमध्ये मध्यान्ह भोजन ठरवून दिलेल्या प्रती प्रमाणे व मेनू अनुसारच दिले जाणे आवश्यक आहे. याच्या अंमलबजावणीसाठी एक अभिनव पाऊल उचलत, जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दररोज मध्यान्ह भोजनाचे जिओ-टॅगिंगसह फोटो पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जे मुख्याध्यापक दररोजचे फोटो अपलोड करणार नाहीत, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन वितरणात पारदर्शकता, शिस्त आणि गुणवत्तेची खातरजमा होणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालूका पोषण आहार अधीक्षक यांनी ग्रुप वर आलेल्या मध्यान्न भोजनाच्या छायाचित्रांचे मोजणी करून रेकॉर्ड ठेवायचे आहे. त्या सोबतच मध्यान्न भोजनासाठी दिले जाणारे पदार्थ दिसतील अशा पद्धतीनेच छायाचित्र काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

हा उपक्रम शालेय शिक्षणात पोषण सुरक्षा सुनिश्चित करणारा ठ..रेल, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सदर बातमीचा स्क्रीनशॉट 👇



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.