यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतनोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती विहित नमुन्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातून निर्गमित दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत मागील वर्षामध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी सुविधा तालुका/शाळा स्तरावर उपलब्ध होण्याकरिता तालुका स्तरावरील MIS-Coordinator/Operator व शाळांचे मुख्याध्यापक यांच्याकडून विनंती करण्यात येत आहे.
त्यानुसार कळविण्यात येते की, यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांकडून Form SO२ भरून घेवून नोंदणी करण्यासाठी सुविधा केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते. त्या फार्ममध्ये अद्यापपर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची मूलभूत माहिती मुख्याध्यापक यांनी भरून तालुका कार्यालयामध्ये स्वाक्षरीने सादर करावी. तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांनी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सदर विद्यार्थ्यांची नोंद नसल्याबाबत खात्रीकरून सदर फार्म प्रमाणीत करावा, जेणे करून विद्यार्थ्यांची माहिती दुबार होणार नाही.
तालुका स्तरावर MIS-Coordinator/Operator यांनी एकत्रित झालेल्या सर्व फार्म ची यादी तयार करून जिल्हा कार्यालयास पाठविण्यात यावे. जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची यादी एकत्रित करून राज्य कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावे. त्यानंतर तालुकास्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.
सोबत : Form SO२.
(गोविंद कांबळे) 11/8/2025
राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत माहितीस्तव :
१) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व).
२) श्री. सुनिल सुसरे, सरचिटणीस, "अनिल" यशोदानगर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३.
Form SO2 PDF Download
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉगीवर उपलब्ध करून देणेसाठी विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी उपलब्ध करून देणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सन २०२४-२५ या वर्षामध्ये शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची नोंदी पूर्ण करून घेण्याकरिता यु-डायस प्लस प्रणालीमध्ये आधार नसलेल्या मुलांची नोंद करण्याची सुविधा जिल्हा लॉगीवर उपलब्ध करून देणेसाठी आधार नसलेले विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी सोबत दिलेल्या नमून्याप्रमाणे या कार्यालयास दि. २५/०२/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी. सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनास यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विनंती करण्यात येईल.
सरोज जगताप)
सहा. संचालक (कार्यक्रम) म.प्रा.शि.प., मुंबई.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्यासाठी दि. १४/०२/२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहाय्यक प्रकल्प संचालकांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
संदर्भ : जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार.
सन २०२४-२५ या वर्षांमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याचे सर्व काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्यासाठी दि. १०/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी झाली नसल्याचे दिसून आले आहे. या कार्यालयास ई-मेल व दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून मुदतवाढ मिळण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.
यासंदर्भात आपणास कळविण्यात येत, की यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २ री ते इयत्ता १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंद पूर्ण करून घेण्याच्या अनुषंगाने दि. १४/०२/२०२५ पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ घेण्यात आली आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ नोंदणी करण्यासाठी कळविण्यात यावे. यानंतर केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देता येणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा, जबाबदारी सर्वस्वी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
यु-डायस प्लस क्रमांक प्राप्त नसलेल्या शाळा आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असतील तर तात्काळ विद्यार्थी पटसंख्येसह अहवाल या कार्यालयास दि. १४/०२/२०२५ पर्यंत सादर करावा.
(सरोज जगताप)
सहा. संचालक (कार्यक्रम) म.प्रा.शि.प., मुंबई.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देणेबाबत.
सन २०२१-२२ या मागील वर्षामध्ये यु-डायस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्याची सविस्तर नोंदणी करण्यासाठी कळविण्यात आले होते परंतु असे दिसून आले आहे, की शाळेत शिक्षण घेत असुनही बऱ्याच विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. त्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थी जे सध्या त्याच शाळेत शिक्षण होत आहेत त्यांची माहिती नोंदविण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. विद्यार्थी नोंदणी बाकी असण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगण्यात येत आहे :-
• आधार क्रमांक नसल्याने नोंदणी बाकी आहे.
माहिती पूर्ण न भरल्याने डिलीट करण्यात आली आहे.
• शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरलेली नाही.
याबाबत आपणास कळविण्यात येते की, शाळेच्या मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांची माहिती न नोंदविण्याबाबत खुलासा घेण्यात यावा व त्या शाळांची माहिती व खुलासा सोबत दिलेल्या लिंकवर भरण्यात यावा त्यानंतर जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी बाकी असलेल्या शाळांची माहिती दि.२५ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत सोबतच्या लिंकवर उपलब्ध करून देण्यात यावी.
वरील लिंक मध्ये मुख्याध्यापकाने जे प्रमाणपत्र भरून अपलोड करायचे आहे ते प्रमाणपत्र.
(सरोज जगताप)
सहा. संचालक (कार्यक्रम/प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.
Download
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
Preksha Bongirwar
ReplyDeleteYes?
Delete