राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव (National Science Drama Festival-NSDF)-२०२५-२६ विषय स्तरनिहाय वेळापत्रक सूचना

महाराष्ट्र राज्याच्या राज्य विज्ञान संस्थेने दिनांक 16 जुलै 2025 रोजी  राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2025 26 बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव २०२५ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने नेहरु विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई यांचेकडून मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व मार्गदर्शक सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करावे. या विज्ञान विषयक नाटयस्पर्धेत जास्तीत जास्त शाळा सहभाग घेतील याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.

उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय संग्रहालय परिषद (भारत सरकार), नेहरु विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ मध्ये विज्ञान नाट्योत्सव विविध स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश आहेत.

उपक्रमाचा हेतू विज्ञान नाट्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती, घटना आणि संकल्पना मनोरंजक पध्दतीने देता यावी तसेच विज्ञान नाटयातून विज्ञान लोकप्रिय व्हावे, आणि मनोरंजनासोबत समाज प्रबोधन व्हावे या हेतूने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.

उपक्रम आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना २०२५-२६ या वर्षाकरीता विज्ञान नाटयोत्सवाचा मुख्य विषय व उपविषय पुढीलप्रमाणे आहेत.

मुख्य विषय :- Science and Technology for the benefit of Mankind.

(मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान) हा असून त्या अंतर्गत पुढीलप्रमाणे पाच उपविषय दिलेले आहेत.

1. Women in Science विज्ञानातील महिला

2. Smart Agriculture स्मार्ट (नाविन्यपूर्ण) शेती

3. Digital India Empowering Lives: डिजिटल भारत जोवन सक्षमीकरण

4. Hygiene for All : सर्वांसाठी स्वच्छता

5. Green Technologies: हरित तंत्रज्ञान

उपरोक्त विषय व उपविषयानुसार, पश्चिम भारत झोनल पातळीवरील विज्ञान नाट्योत्सव २२ नोव्हेंबर २०२५ रोजी नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन 6 व 7 जानेवारी 2026 रोजी बिर्ला औद्योगिक तथा प्राद्योगिकी संग्रहालय, कोलकाता येथे करण्यात येणार आहे.

याकरीता राज्यातील विज्ञान नाटयोत्सवाचे स्तरनिहाय आयोजन पुढील प्रमाणे करणे आवश्यक आहे.

अ.क्र. उपक्रमाचा स्तर, संभाव्य कालावधी, स्तरनिहाय निवडपात्र विद्यार्थी

१.तालुकास्तर

२० ऑगस्ट ते ०१५ सप्टेंबर

प्रत्येकी ०१ चमू जिल्ह्याकरिता

२ जिल्हास्तर

१० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर

प्रत्येको ०१ चम् विभागाकरिता

 ३.विभागस्तर

१ ऑक्टो. ते १५ ऑक्टोबर

प्रत्येको ०१ चम् राज्याकरीता

४. राज्यस्तर

२० ऑक्टो. ते ३० ऑक्टोबर

केवळ १ विजेता चमू (प्रथम क्र.) झोनलकरिता

जिल्हास्तरावरील विज्ञान नाटयस्पर्धेची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे राहील व त्यांच्या नियंत्रणाखाली विज्ञान पर्यवेक्षक/क्षेत्रीय अधिकारी याबावत आवश्यक कार्यवाही करतील. प्रत्येक जिल्हयात तालुकास्तरावर सुध्दा विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करुन जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्हयातून विभाग स्तरामाठी एक विज्ञान नाटय चमू निवडण्यात यावा. विभागस्तरावरील विज्ञान नाट्योत्सवाची जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांचेकडे राहील. त्यांचे नियंत्रणाखाली संबंधित अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील, विभागस्तरावरुन प्रथम क्रमांक आलेल्या केवळ एका विज्ञान नाटय चमूला राज्यस्तरीय स्पर्गसाठी सहभाग घेता येईल. राज्यस्तरीय विज्ञान नाटयोत्सवाचे आयोजन राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर तर्फे करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन २० ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या दरम्यान करण्यात येईल. या स्पर्धेची निश्चित तारीख व स्थळ आपणास यथाशीघ्र कळविण्यात येईल.

प्रत्येक जिल्हयातून निवड झालेल्या एक विज्ञान नाट्य चमूची माहिती बिहित सांख्यिकीय प्रपत्रासह आपण संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावी व एक प्रत या कार्यालयास पाठवावी,

तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेसाठी नियम व अटी

१. कोण भाग घेवू शकतो ? शासनमान्य शाळेत नियमित शिकणारे (इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे) विद्यार्थी

२. विज्ञान नाटय पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी कमाल अर्धा तास (३० मिनिटे).

३. भाषा व विषय विज्ञान नाटय हे हिंदी, मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर शासन मान्य भाषेतून सादर करता येईल. विज्ञान नाटय हे दिलेल्या विषय/उपविषय यावरच आधारित असणे आवश्यक आहे.

४. विज्ञान नाटयाच्या एका चमूत जास्तीत जास्त ८ पात्र विद्यार्थी/विद्यार्थीनी सहभागी होवू शकतात, विज्ञान नाटयाच्या एका चमूत विद्यार्थी/विद्यार्थीनी कमाल संख्या ८ याव्यतिरिक्त मार्गदर्शक शिक्षक, संगीतकार, गायक, वादक, नेपथ्यकार, मदतनीस इत्यादीचा समावेश होईल. परंतु प्रत्यक्ष मंचावर विज्ञान नाटय सादर करतांना सादरकर्ते विद्यार्थी/विद्यार्थीनी हे जास्तीत जास्त ८ या संख्येत असतील. याव्यतिरिक्त मंचावरील नाटयाच्या दृष्टीने कोणाचाही प्रवेश नियमबाहय समजण्यात येईल. पडदयामागील कलाकारांच्या/मदतनीसांच्या समावेशाबाबत नाटय चमूचे अधिकार असतील,

५. पंच (Judges) विज्ञान नाटयाचे परिक्षण करतांना ०३ पंच (Judges) असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन, विद्यापीठ किंवा संशोधन विभाग यासारख्या शैक्षणिक संस्थामधील विज्ञान तसेच कला, नाटय, संगीत विषयाचे जाणकार (तज्दा) मान्यवर व्यक्तीना शक्यतोवर पंचाचे कार्य सोपवावे. सहभागी शाळेतील शिक्षकांची पंच म्हणून नेमणूक करण्यात येवू नये. या विज्ञान नाट्य स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहील.

६. कोणत्याही परिस्थितीत दोन नाटय चमूंना सारखे गुणदान होणार नाही याची पंचांनी दक्षता घ्यावी. अशावेळी सारखे गुणदान झाल्यास पनुर्मुल्यांकन करुन पंचांनी अंतिम निर्णय घ्यावा. पंचांचा निर्णय सर्वाकरिता मान्य व बंधनकारक राहील.

७. विज्ञान नाटय मूल्यमापनाचे निकष एकूण गुण १००

अ) Presentation of the science drama (नाटयाचे सादरीकरण) ५० गुण

च) Scientific content in the drama (नाटयातील वैज्ञानिक माहिती) ३० गुण

क) Effectiveness of the drama (विज्ञान नाटयाची परिणामकारकता) २० गुण. 

८. विज्ञान नाटयाच्या दर्जेदार सादरीकरणाकरिता पोष्टर्स, बॅनर्स, दृकश्रवण माध्यम, पार्श्वभूमी (Backdrops) इत्यादीचा वापर नाटय चमूने (स्वतः) करणे अपेक्षित आहे.

९. नाटय चमूने नाटय सादरीकरणापूर्वी नाटपाची पटकथा (Script) परोक्षकांना किमान दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. इंग्रजी किंवा हिंदी ऐवजी इतर भाषेत नाटय असल्यास, त्या नाटयाची अस्सल (Authentic) इंग्रजी किंवा हिंदी भाषांतराची Script नाट्य सुरु होण्यापूर्वी परीक्षकांना द्यावी लागेल.

१०. विभागस्तरीय नाटय स्पर्धेकरिता आर्थिक तरतूद पुढीलप्रमाणे प्रस्तावित आहे-

१. परीक्षक मानधनः (३ परीक्षक x रु. १,०००/-) = रु. ३,०००/-

२. बक्षिसे अ) प्रथम रु. ३,०००/-

ब) द्वितीय- रु. २,०००/-

क) तृतीय- रु. १,५००/-

३. सादिलवार खर्चः (ध्वनी, प्रकाश, प्रमाणपत्रे छपाई इ.) रु. ९,०००/-असा एकूण रुपये १८,५००/- इतका खर्च एका विभागस्तराकरिता मंजूर राहील.

राज्यस्तरीय विज्ञान नाटय स्पर्धा राज्यस्तरावर सहभागी झालेल्या प्रत्येक विभागातील प्रथम क्रमाकांच्या नाटय चमूतील कमाल ०८ (आठ) विद्यार्थ्यांचा प्रवास व दैनिक भत्ता (निवास व भोजन खर्च वजा करुन) प्रवास खर्च जवळच्या मार्गाने (एसटी किंवा रेल्वे द्वितीय श्रेणी) या संस्थेमार्फत अदा करण्यात येईल. शिक्षकांचा खर्च, प्रवास भत्ता व दैनिक भत्ता शाळेच्या आस्थापनेतून काढावा. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले प्रवास तिकीट व बैंक पासबुकची xerox प्रत सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखाप्रमाणे तसेच उपरोक्त दिशानिर्देशाप्रमाणे स्तरनिहाय विज्ञान नाट्य स्पर्धाचे आयोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा एक उपचार म्हणून पार पाडल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या स्पर्धांमागील वैज्ञानिक उद्देश पूर्णतः सफल होत नाही. त्यासाठी सर्व शिक्षणाधिकारी यांनी या उपक्रमाकडे जातीने लक्ष घालून तालुकास्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील आयोजन प्रभावीरित्या होईल, याची दक्षता घ्यावी. तालुकास्तर स्पर्धेकरिता माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हास्तर स्पर्धेकरिता विभागीय शिक्षण उपसंचालक हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कार्य पार पाडतील.


(डॉ. हर्षलता बुराडे)

संचालक

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर,

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.