B. A./B. Sc B Ed Integrated CET 2025 Application Link - बारावीनंतर एकात्मिक बीए बीएससी बीएड प्रवेश परीक्षा ऑनलाइन अर्ज लिंक माहिती

 जाहीर सुचना

बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) या अभ्यासक्रमाची सीईटी २०२५

१. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे क्र. सीईटी २०२५/प्र.क्र.३४/९७६५४६/मशि-२ दिनांक २३ मे २०२५ रोजीचे पत्र.

२. संचालक, उच्च शिक्षण, संचालनालय, पुणे यांचे क्र. बीएड-२४३६/प्र.क्र.०४/सीईटीसेल/११७३१२३ दिनांक २५/०५/२०२५.

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, नवी दिल्ली (NCTE) यांची पब्लिक नोटीस दि. ०६.०५.२०२५ अन्वये सन २०२५-२६ ऐवजी सन २०२६-२७ पासून चार वर्षीय बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम बंद करुन प्रस्तुत अभ्यासक्रम चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (ITEP) या अभ्यासक्रमामध्ये परिवर्तीत करण्याचे विहित केले आहे.

त्याअनुषंगाने संदर्भाकित पत्रान्वये सन २०२५-२६ मधील चार वर्षीय बी.ए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) या अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) राबविण्यात यावी असे कळविण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी चार वर्षीय बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या CET व CAP चे नियोजन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा रविवार, दिनांक २०/०७/२०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच सदर अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सीईटी निकाल घोषित झाल्यावर राबविण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्र वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

तरी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी चार वर्षीय बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या सीईटी करिता ऑनलाईन अर्ज नोंदणी पुढील प्रमाणे सुरु करण्यात येणार आहे.

सीईटी चे नाव

महा- बी.ए/बी.एस्सी-बी.एड-सीईटी २०२५

अर्ज नोंदणी दिनांक

दिनांक ०२/०६/२०२५ ते १५/०६/२०२५


सही/-

आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.


बीए बीएड व बीएससी बीएड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक

https://cetcell.mahacet.org/


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.