अस्थायी शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना स्थायित्व व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे बाबत शासन आदेश.

अस्थायी शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना स्थायित्व व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे बाबत कार्यपद्धती व प्रमाणपत्र नमुना शासन आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 11 सप्टेंबर 2014 रोजी अस्थाई शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

विहित पद्धतीने नियुक्त झालेल्या अस्थाई शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकारणे तो कर्मचारी विहित शर्तीनुसार पात्र होताच त्याला स्थायित्व प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे या संबंधातील सूचना शासन निर्णय परिपत्रका अन्वय देण्यात आलेले आहेत. 

निदर्शनास येते की अशी प्रमाणपत्रे वेळच्यावेळी दिली जात नाही आणि दिल्या दिलेल्या प्रमाणपत्राची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात घेतली जात नाही त्यामुळे स्थायिक व प्रमाणपत्र मिळण्यास पात्र असूनही केवळ तसे प्रमाणपत्र न दिल्या गेल्यास कर्मचाऱ्यास अवाजवी अडचणी येतात. तसेच सामान्य प्रशासन विभागाकडे या संबंधात मार्गदर्शनात संदर्भ प्राप्त होतात. त्यामुळे उपरोक्त शासन निर्णय परिपत्रकातील सूचना सर्व नियुक्ती प्राधिकार्‍यांच्या निदर्शनास आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

प्रत्येक अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यास अधिकऱ्यास स्थायित्व प्रमाणपत्र प्रथम पदावरील नियुक्तीच्या संदर्भात देणे आवश्यक आहे. त्यामुळे उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय परिपत्रके अधिक्रमित करून त्यामधील सूचनांचा एकत्रित विचार करून स्थायित्व प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. 

प्रथम नियुक्तीच्या पदावर तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण करणाऱ्या व पुढील शर्तीची पूर्तता करीत असलेल्या अस्थाई शासकीय कर्मचाऱ्यांपैकी गट-अ व गट ब राजपात्रिक अधिकाऱ्यांच्या बाबतीत संबंधित नियुक्ती प्राधिकार्याने तसेच गट ब अराजपत्रित व गट क गट ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालय प्रमुखांनी स्थायित्व प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. 


१) कर्मचाऱ्यांची नियुक्ती सेवा प्रवेश नियमानुसार व विहित पद्धतीने होणे. 

२) कर्मचारी सेवेस पात्र असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे व कर्मचाऱ्यांनी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे. 

३) कर्मचाऱ्यांचा सेवाभिलेख उदाहरणार्थ गोपनीय अहवाल उपस्थिती सचोटी इत्यादी चांगला असणे. 


प्रत्येक पात्र अस्थाई कर्मचाऱ्यांना योग्य त्या सक्षम प्राधिकार्‍याच्या सहीने स्थायित्व प्रमाणपत्र सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ येथील नमुन्यात विना विलंब देण्याची आणि त्याची नोंद सेवा पुस्तकात घेण्याची दक्षता संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी. 

संबंधित कर्मचाऱ्याला तो स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्यास ज्या दिनांकापासून पात्र ठरले त्या दिनांकापासून ते देण्यात यावे एखाद्या कर्मचाऱ्यांच्या संबंधात स्थायित्व प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला असेल तर त्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यास स्थायिक व प्रमाणपत्र न देण्यामागची कारणे नमूद करून कळवण्यात यावे व त्याबाबतची नोंद त्या त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी. 

ज्या प्रकरणांमध्ये स्थायित्व प्रमाणपत्र देण्यापूर्वी जर कर्मचाऱ्यांची पदोन्नती बदली अथवा अन्यत्र सामावून घेण्याची कार्यवाही झाली असेल तर सदर कर्मचारी नियुक्ती पासून कार्यरत असलेल्या कार्यालयाकडून कार्यालयांकडून उपरोक्त सूचना क्रमांक एक येथील तीनही अटींची पूर्तता संबंधित कर्मचारी करीत होता किंवा कसे याबाबत ची माहिती त्याच्या सध्याच्या कार्यालयाने उपलब्ध करून घेऊन अशा कर्मचाऱ्यास तो पात्र ठरत असलेल्या पूर्वीच्या पदाचे स्थायित्व प्रमाणपत्र द्यावे. 

वरील प्रमाणे साहित्य प्रमाणपत्र प्रथम नियुक्तीच्या पदावर द्यावयाचे असले आणि गट-अ पदावर कार्यरत शासकीय अधिकाऱ्यांना पूर्वी अराजपत्रित पदावर काम करताना स्थायिक व प्रमाणपत्र लाभ मिळाले असले तरी ते धारण करत असलेल्या गट अ च्या पदावर उपरोक्त सूचना क्रमांक एक येथील तीनही अटींची पूर्तता करीत असल्यास त्यांना नव्याने स्थायित्व लाभ प्रमाणपत्र देण्यात यावे. 

आपल्या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या व तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण करणाऱ्या पात्रताई शासकीय कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय नियुक्ती प्राधिकार्‍यांनी अथवा कार्यालय प्रमुखांनी प्रत्येक वर्षात दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत घ्यावा व या दिनांक पर्यंत ची स्थिती दर्शवणारा वार्षिक अहवाल त्याच वर्षी दिनांक 15 डिसेंबर पूर्वी तयार करावा. सदर अहवालामध्ये संबंधित कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय एकूण संख्या त्यापैकी स्थायित्व प्रमाणपत्र धारकांची संख्या त्यापैकी सेवा पुस्तकात स्थित्वाची नोंद घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पात्र असलेल्या तथापि स्थायिक व प्रमाणपत्र अद्याप न देण्यात आलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांची संख्या स्थायित्वासाठी विचार करण्यात आलेल्या तथासी विहित अटींची पूर्तता होत नसल्यामुळे स्थायित्व प्रमाणपत्र न देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती नकारांच्या कारणासह या मुद्द्यांची माहिती असावी. 

सर्व मंत्रालयीन विभागांनी खुद्द विभागातील तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील नियुक्ती प्राधिकारी कार्यालय प्रमुख यांच्याकडील अहवाल दिनांक 31 डिसेंबर पूर्वी संकलित करावेत व स्थायिक व प्रमाणपत्र देण्याबाबतच्या प्रकरणी निर्णय घेण्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय प्रमुख यांच्याकडून अकारण विलंब होणार नाही याकडे लक्ष पुरवावे. 

पात्र अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या स्थायित्व प्रमाणपत्र देण्याचा नमुना सदर परिपत्रकासोबत जोडला आहे. 

सदर शासन निर्णयानुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांना स्थायित्व प्रमाणपत्र प्रदान करण्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहे. 






वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.