राज्यातील इयत्ता ११ वीचे वर्ग शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये सुरु करण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयाने दिनांक 19 मे 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
इयत्ता ११ वीचे शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये सुरु करण्याबाबत शासन निर्णय दिनांक ६ मे, २०२५ मध्ये दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ ही इयत्ता ११ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे. दिनांक ११ ऑगस्ट २०२५ पूर्वी राज्यातील इयत्ता ११ वीचे वर्ग सुरु करण्याची मुभा शाळा व्यवस्थापनास असेल. इयत्ता ११ वीचे वर्ग शाळा व्यवस्थापनास दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ला किंवा त्यापूर्वी सुरु करता येतील. करीता दिनांक ११ ऑगस्ट २०२५ इयत्ता ११ वीचे वर्ग अध्यापन कार्य सुरु होईल. इयत्ता ११ वी मधील एकूण प्रवेश क्षमतेपैकी ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा १ जुलै २०२५ यापैकी जे प्रथम होईल त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी शैक्षणिक हित लक्षात घेता इयत्ता ११ वीचे वर्ग सुरु करता येतील. याची खातरजमा आपल्या स्तरावर त्या त्या वेळी करण्यात यावी.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे-१
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments