भारतीय भाषा उन्हाळी शिबीर आयोजित करण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 22 मे 2025 रोजी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व शिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिल्या आहेत.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या कडून प्राप्त निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये भारतीय भाषा ग्रीष्म कालीन शिबीर आयोजित करावयाचे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, भारतातील बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणारे असून लहान वयातच मुलांना विविध भाषांची ओळख व्हावी, गमतीशीर आणि आकर्षक पद्धतीने अन्य भाषा शिकावी यासाठी NCERT मार्फत ग्रीष्म कालीन शिवीराची रचना करण्यात आली आहे.
सदर शिबिरातून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या मातृभाषेशिवाय आणखी एक भारतीय भाषा शिकावी, त्या भाषेतील मुलभूत संवाद व संवाद कौशल्ये शिकविण्यासाठी सदर शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी एका आठवड्यातील एकूण २८ तासाचा कॅप्सूल कोर्स नियोजित असून, प्रत्येक शाळेत किमान ७५ ते १०० इच्छुक विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. ग्रीष्म कालीन शिबीरामध्ये स्व-परिचय, शब्दसंग्रह निर्मिती, वास्तविक जीवनातील संभाषण पद्धती, संस्कृतीचे कौतुक, मजबुतीकरण आणि आत्मविश्वास निर्माण करणे इत्यादींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सदर ग्रीष्मकालिन शिबिराची वेळ स्थानिक गरजा आणि शैक्षणिक दिनदर्शिका लक्षात घेऊन त्याप्रमाणे शाळा स्थानिक पातळीवर आवश्यक तो बदल करू शकतात.
सदर शिबिरासाठी संसाधन सामग्री पुरविण्याची जबाबदारी नोडल संस्था आणि तांत्रिक भागीदार म्हणून एनसीईआरटी ची असणार आहे. उक्त भारतीय भाषा उन्हाळी शिबीर आयोजित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना यासोबत जोडल्या आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिबीर राबविण्यासंदर्भात अधिनस्थ यंत्रणेस आदेशित करावे.
सहपत्रः- सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहे.
राहूल रेखोवार (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत - माहितीस्तव
१) मा. सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार, नवी दिल्ली
२) म.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
३) मा.आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments