जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा करणेबाबत ग्राम विकास विभागाने दिनांक 23 मे 2025 रोजी पुढील प्रमाणे शासन शुद्धीपत्र निर्मित केले आहे.
शासन शुध्दीपत्रक:-
जिल्हा परिषदेच्या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४ नुसार निश्चित केलेले आहे.
सदर शासन निर्णयातील "प्रकरण-२, जिल्हास्तरीय बदल्या मधील अ.क्र.३ येथील तक्त्यामधील अ) प्रशासकीय बदली (१) व (२) येथील खालील मजकुर वगळण्यात येत आहे,-
बदलीचा प्रकार
अ) प्रशासकीय बदली
१) गट-क संवर्गातील कर्मचारी (प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्राम सेवक/ग्राम विकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी वगळून (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी/नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात)
२) प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्राम सेवक, ग्राम विकास अधिकारी व आरोग्य कर्मचारी (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात)
$ १० % अनिवार्य
$ १) मात्र, ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातुन बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी.
$ २) वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान १ अथवा २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.
$ १०% अनिवार्य
व त्याऐवजी खालील मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.
बदलीचा प्रकार
अ) प्रशासकीय बदली
१) गट-क संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी (प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळून) (संबंधित आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व
$ १० % अनिवार्य
ज्या जिल्ह्यात आदिवासी/नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका
तालुक्यातून अन्य तालुक्यात)
$ १) मात्र, ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातुन बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी.
२) वरीलप्रमाणे विहीत केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान १ अथवा २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी.
सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०५२३१७३४२१५९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by JYOTSNA SUNIL ARJUN Date: 2025.05.23 17:35:32 +05'30'
(ज्योत्स्ना अर्जुन)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा बाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 28 मार्च 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
वाचा :-
१) शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४
२) शासन पूरक पत्र क्र. जिपब-४८१७/प्र.क्र.२२८/आस्था-१४, दि.७.३.२०१९
शासन पूरकपत्रः-
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्य बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४ नुसार निश्चित केलेले आहे.
सदर शासन निर्णयातील प्रकरण-१ मधील कलम ३ (क) येथे "विधवा, परित्यक्ता/घटस्फोटित महिला कर्मचारी यानंतर व कर्करोगाने (कॅन्सर) आजारी/पक्षघाताने आजारी/डायलेसिस सुरु असेलेले कर्मचारी या अगोदर "४० वर्षावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी" असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.
सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३२८१३१२१४३२२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(ज्योत्स्ना अर्जुन)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2023 24 या चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्यात करण्यास मुदतवाढ देणे बाबत दिनांक 30 मे 2023 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शासन निर्णय :-
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. तथापि, सन २०२३ - २४ या चालू आर्थिक वर्षातील दि. ३१ मे, २०२३ पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या दि. ३० जून, २०२३ पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०५३०१६५०४३४२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
VIDYA LAXMAN BHOITE
(विद्या भोईटे )
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत,
१. राज्यपालांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
४. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, ५. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, विधानभवन, मुंबई,
६. सर्व मा. संसद सदस्य / विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
७. मा. मुख्य सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
९. सर्व विभागीय आयुक्त,
१०. सर्व जिल्हाधिकारी,
११. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१२. सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख (संबंधित प्रशासकीय विभागामार्फत )
१३. सामान्य प्रशासन विभाग / का. प्रसिध्दीकरिता),
१४. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
३९ (महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर
१५. निवड नस्ती कार्या- १२.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments