निपुण महाराष्ट्र SCERTM मोबाईल ऑप्लिकेशन मध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक अद्यावत करणे बाबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तानी दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
आपण सर्व जाणतो की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये सुद्धा याचे महत्त्व अतिशय सविस्तरपणे विषद केले आहे. शिक्षकांच्या मेहनतीला पालकांच्या प्रयत्नांची जोड मिळाली आणि शिक्षकांच्या शैक्षणिक सूचनांचे पालकांनी अनुपालन केल्यास विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तींना साध्य करण्याच्या गतीमध्ये निश्चितच वाढ होते. वर्ष २०२६-२७ पर्यंत संपूर्ण राज्याला निपुण भारत अभियानांतर्गत मोठे ध्येय साध्य करायचे आहे. सबब शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभाग मिळविण्यासाठी व त्यांच्या पाल्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्यापर्यंत सूचना देणे सर्व शिक्षकांना सुलभ व्हावे यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
या दृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा, तसेच शासकीय अनुदानित शाळांच्या इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक 'निपुण महाराष्ट्र SCERTM' या मोबाईल अॅप्लिकेशन मध्ये अद्ययावत करण्यात यावेत. VSK Chabot वर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण नोंदविलेला विद्यार्थ्यांचा स्तर पालकांना या अॅप मधून आपोआप दिसेल, सोबतच या स्तरांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरावाचे प्रश्न सुद्धा पालकांना दिसतील, पालकांना विदयाथ्यर्थ्यांची तयारी सराव करून घेता येईल. यामुळे विदर्यार्थ्यांची गुणवत्ता/संपादणूक पातळी उंचावण्यास मदत होईल.
सदर 'निपुण महाराष्ट्र SCERTM' या मोबाईल अॅप्लिकेशनची पथदर्शी चाचणी कोल्हापूर जिल्हयामध्ये माहे एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आली आहे. अल्पकालावधीमध्ये इयत्ता २ री ते ५वी च्या १,१०,००० पालकांची नोंदणी करण्यात आली, तसेच ९९ टक्के विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी करण्यात आलेली आहे.
आपण आपल्या कार्यक्षेत्रात क्षेत्रिय यंत्रणेमार्फत इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व पालकांना या सूचना देऊन अॅप वापरण्यास आणि त्यांच्या पाल्यांकडून आवश्यक सराव अॅप द्वारे करून घेण्यासाठी मार्गदर्शन करावे. यासाठीचे मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा अॅप मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग व सहकार्य घेण्यासाठी सर्व शिक्षकांना सदर अॅप उपयुक्त ठरणार आहे. आपण आपल्या सर्व अधिनस्त अधिकारी यांचेमार्फत सोबत जोडलेल्या प्रपत्र अ मधील सूचनांनुसार कार्यवाही करणेबाबत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना सूचित करावे,
Signed by Sachindra Pratap Singh Date: 30/04/2025
आयुक्त (शिक्षण),
महाराष्ट्र राज्य, पुणे
मुख्याध्यापकांसाठी सूचना-
कृती १- मुख्याध्यापकांनी स्वतःचा व शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल क्रमांक शालार्थ २पोर्टल ०. वर अद्ययावत करावा व डीडीओ-२ कडून मान्यता प्राप्त करावीशालार्थ पोर्टल वर नोंद असलेल्या . मोबाईल क्रमांकावर निपुण महाराष्ट्र अॅप मध्ये लॉगिन करता येईल याची नोंद घ्यावी.
कृती २- मुख्याध्यापकांनी सरल पोर्टल वर शाळेतील वर्ष २०२४-२५ च्या पदाप्रमाणे सर्व विद्यार्थी तुकडीनिहाय नोंदवलेले आहेत याची खात्री करावी, हे सर्व विद्यार्थी निपुण महाराष्ट्र अॅप मध्ये दिसतील.
शिक्षकांसाठी सूचना
कृती १-प्ले स्टोअर मध्ये जाऊन 'NIPUN Maharashtra (SCERTM)' हे नाव टाकून अॅप्लिकेशन शोधावे व ते डाऊनलोड करावेलिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.nipun
कृती २- लॉगीन करावे.
कृती ३- पालकांचे संपर्क क. अद्ययावत करा हा भाग निवडा.
कृती ४- दिसणाऱ्या तुकड्यांच्या यादीमधील हवे ती तुकडी वर्ग निवडा तुकडीनिहाय विद्यार्थी यादी /दिसू लागेल, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक नोंदवा (शक्यतो व्हॉट्सअप क्रमांक) .व जतन करा
1. मुख्याध्यापकांसाठी सूचना -
कृती १ - मुख्याध्यापकांनी स्वतम्चा व शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल क्रमांक शालार्थ
२.० पोर्टल वर अद्यावत करावा व डीडीओ-२ कडून मान्यता प्राप्त करावी. शालार्थ पोर्टल
वर नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच 'निपुण महाराष्ट्र' अॅप मध्ये लॉगिन करता येईल याची नोंद घ्यावी.
कृती २ - मुख्याध्यापकांनी सरल पोर्टल वर शाळेतील सर्व विद्यार्थी तुकडीनिहाय नोंदवलेले आहेत याची खात्री करावी. हेच विद्यार्थी 'निपुण महाराष्ट्र' अॅप मध्ये दिसतील याची नोंद घ्यावी.
शिक्षकांसाठी
कृती १ आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती खालील प्रकारे तुकडीनिहाय गोळा करावी.
विद्यार्थ्याचे नाव
वडील पालकांचे नाव,
वडील पालकांचा मोबाईल क्र.
माता पालकांचे नाव
माता पालकांचा मोबाईल क्र.
कृती २ -
प्ले स्टोअर मध्ये जाऊन 'NIPUN Maharashtra (SCERTM)' हे नाव टाकून अॅप्लिकेशन शोधावे व ते डाऊनलोड करावे. (आपणास चित्र दिले आहे ते पाहावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.nipun&pcampaignid=webshare
अन्यथा ह्या लिंक ला टच करून Direct ओपन होईल
कृती ३-
पालकांचे सैपर्क क्र. अद्यावत करा हा भाग निवडा.
कृती ४ - तुकडीनिहाय विद्यार्थी यादी दिसू लागेल, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक (शक्यतो व्हॉट्सअप क्रमांक) नोंदवा व जतन करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments