Maharashtra Vidhansabha Election Duty Update - PO 1 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी क्रमांक एक ची जबाबदारी पार पाडावी लागणारी कार्य/कर्तव्य

 मतदान घेण्यासाठी मतदान केंद्रावर एकूण चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते त्यापैकी एक मतदान केंद्राध्यक्ष असतो तर उरलेले मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन असे असतात अर्थात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे ही सामूहिक जबाबदारी असते परंतु तरीदेखील प्रत्येक मतदान अधिकाऱ्याला त्याची कामे ठरवून दिलेली असतात.

मतदान अधिकारी क्रमांक एक याची कार्य


मतदान अधिकारी यांचे कार्य

1 ला मतदान अधिकारी यांचे कार्य

1। पहिला मतदान अधिकारी कोणते दस्तावेज असतील? मतदार यादीच्या चिन्हांकित यादीचा प्रभारी

पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे मतदार यादीची चिन्हांकीत प्रत, जोडपत्र 13A नुसार ASD मतदार यादी, स्त्री, पुरुष, तृतीयपंथी यांच्या मतदानाच्या आकडेवारीची नोंद करणारा व दर दोन तासांनी टक्केवारी काढायचा सारणी पेपर असेल मतदानास सुरुवात करताना मतदार नोंदवही नमुना 17 अ/ 17A मध्ये पहिल्या मतदाराने स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी । व मतदान केंद्राध्यक्ष यांनी (मतदान अधिकारी-2 यांच्याकडील) मतदार नोंदवही नमुना 17 अ/17A मध्ये तपासणी करुन सही करावी व" नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण "0" असल्याचे आढळले आहे" अशी नोंद करावी / शेरा लिहावा (मतदार नोंदवही म्हणजे नमुना 171/17A)


1] मतदाराची ओळख पटवणे-:

मतदाराची ओळख पटवणे. मोठ्याने नाव व अनुक्रमांक वाचून दाखवणे व निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ओळखपत्रांच्या यादीतील कोणत्याही एका ओळखपत्राच्या आधारे मतदाराची ओळख पटवणे

2 | स्त्री, पुरुष व तृतीयपंथी मतदारांची वेगवेगळी गणना करणे-:

मतदाराची ओळख पटल्यावर मतदार यादीच्या चिन्हांकित यादीवर मतदाराच्या चौकोनात लाल शाईने तिरकी रेषा मारावी. स्त्री, पुरुष व तृतीयपंथी यांची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी

अ] पुरुष मतदाराच्या चिन्हांकित यादितील चौकोनात फक्त तिरकी रेषा मारावी 

ब] स्त्री मतदाराच्या चिन्हांकित यादितील चौकोनात तिरकी रेषा + अनुक्रमांकाभोवती गोल करावे 

क] तृतीयपंथी मतदाराच्या चिन्हांकित यादितील चौकोनात तिरकी रेषा + अनुक्रमांका जवळ चांदणी ची खूण करावी.





3| मतदानाची टक्केवारी तयार करणे -:

स्त्री, पुरुष व तृतिय पंथी मतदाराची मतदान आकडेवारीच्या तक्त्यात अचूक नोंद घेईल व दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची स्त्री, पुरुष व तृतीयपंथी या श्रेणीनिहाय व तिघांची एकत्रित टक्केवारी तयार करेल.

4| EDC इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट / निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र मतदाराची नोंद ठेवणे-: 1] ज्या निवडणूक कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात म्हणजे जेथे मतदार म्हणून ज्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यात आले आहे अशा ठिकाणी नियुक्ती दिली असेल त्याच्या व्यतिरिक्त इतरत्र म्हणजे त्यांची नेमणूक ज्या मतदार केंद्रावर झाली आहे त्या मतदान केंद्रावर ते मतदान करू शकतात

2] अशा मतदारांचे मतदान हे मतदान यंत्रावर घेण्यात यावे.

3] असे EDC मतदार आले तर अशा मतदारांकडून EDC चे मूळ प्रमाणपत्र मतदान अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. नमुना 12B निवडणुक कार्य प्रमाणपत्र

4] मतदार यादीच्या चिन्हांकित यादीमध्ये शेवटच्या अनुक्रमांकानंतर अशा मतदारांची नोंद घ्यावी.

5] अशा मतदारांनी शक्यतो मतदान प्रतिनिधी उपस्थित असताना मतदान करावे.

6] मतदारांची नोंदवही 17A मध्ये सदर मतदाराचा त्याचा मूळ मतदार यादीतील अनुक्रमांक / भाग क्रमांक /

मतदारसंघाचा क्रमांक व नाव अशा रितीने नोंद करावी.

उदा. 997/176/141 वाव्हळेवाडी

7) मतदारांची नोंदवही 17A च्या शेवटाच्या रकान्यात EDC मतदार अशी नोंद करतील

8] मतदान केंद्राध्यक्षाने सर्व EDC प्रमाणपत्र स्वतंत्र पाकिटात टाकून साहित्य स्विकृती कक्षात जमा करावेत.

१] मतदान केंद्राध्यक्षांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनी मध्ये अनुक्रमांक 13 मध्ये किती जणांनी EDC द्वारे मतदान केले आहे याची नंद ठेवावी.

10] नमुना 17C : भाग । अनुक्रमांक । मध्ये त्या मतदार यादी भागातील मतदार EDC द्वारे मतदान केलेले

मतदार अशी एकूण मतदारांची संख्या दाखवावी. उदा.

फॉर्म 17C नोंद झालेल्या मतांचा हिशोब

1) मतदार केंद्राशी सलग्न मतदारांची एकूण संख्या

715 710+EDC 

5] PB नोंद असलेल्या मतदारांना मतदान केंद्रात परवानगी नाकारणे-:

ज्या मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या आहेत AVSC / AVPD/AVES/AVCO / मतदार बाबत चिन्हांकीत मतदार यादीत PB म्हणून चिन्हांकीत केले असेल तर मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी देता येणार नाही.

6] ASD मधिल मतदार आल्यास काय करावे? (सदर मतदाराला केंद्राध्यक्षांकडे पाठवावे)

1] मतदार यादीच्या चिन्हांकीत यादीसोबत जोडपत्र 13A नुसार ASD मतदार यादी (Absent, Shifted, Dead अनुपस्थित, स्थलांतरीत, मयत) मतदार यादी पुरवण्यात येते. अशा मतदारांची निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ओळखिच्या पुराव्याच्या आधारे कसून तपासणी करुन ओळख पटवावी.

2] अशा मतदारांचे मतदान केंद्राध्यक्षाने जोडपत्र 14 मध्ये घोषणापत्र भरुन घ्यावे. अशा मतदाराबाबत दुसरा मतदान अधिकारी कडील मतदार नोंदवहीं 171 / 17A मध्ये सही सोबत अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा.

3] जर असा मतदार अंध अपंग असेल तर सोबती घेण्याची परवानगी द्यावी. व अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र 18 भरुन घ्यावे. सोबत्याला उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधिपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

4] जर सोबती मतदान कक्षापर्यंत गेला असेल तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये घेवू नये. पण जर मतदाराने सोबत्याच्या मदतीने मतदान केले तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये करावी.

7) अंध अपंग मतदारांच्या बाबतीत-: (सदर मतदाराला केंद्राध्यक्षांकडे पाठवावे)

जर असा मतदार अंध अपंग असेल तर सोबती घेण्याची परवानगी द्यावी. व अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र 18 भरुन घ्यावे. सोबत्याला उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधिपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

जर सोबती मतदान कक्षापर्यंत गेला असेल तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये घेवू नये. पण जर मतदाराने सोबत्याच्या मदतीने मतदान केले तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये करावी.

8) आक्षेपित मत / Challenge Vote मतदारांच्या बाबतीत (सदर मतदाराला केंद्राध्यक्षांकडे पाठवावे)

1] मतदान प्रतिनिधिने मतदाराच्या ओळस्वीला आव्हान दिले तर.....

2] सदर मतदान प्रतिनिधि कडून रु.2/- अनामत रक्कम भरुन घ्यावी

3] मतदान केंद्राध्यक्षाने आव्हान दिलेल्या मतदाराला त्याच्या ओळखीचा योग्य तो पुरावा देवून स्वतःला मी तोच आहे हे सिध्द करण्यास सांगावे

4। चौकशीनंतर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास मतदाराला मतदान करू द्यावे व मतदान प्रतिनिधिची अनामत रक्कम जप्त करावी

5] आक्षेप जर स्वरा झाला व सदर मतदार तोतया मतदार असल्याचे सिध्द झाले तर सदर व्यक्तीस मतदान करू देवू नये दिलेल्या नमुन्यात त्या मतदाराची लेखी तक्रार देवून पोलिसाच्या स्वाधिन करावे, मतदान प्रतिनिधिची अनामत रक्कम परत करावी

9| प्रदत्त मत /Tender Vote (सदर मतदाराला केंद्राध्यक्षांकडे पाठवावे)

1] जर एखादी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर आली आहे व त्या व्यक्तीच्या नावावर अगोदरच कोणत्यातरी दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करून गेल्याचे लक्षात आल्यास सदर मतदाराला त्याच्या ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगावे. जर त्याने सादर केलेला पुरावा योग्य असेल तर त्याला मतदान करू द्यावे पण सदर मतदान प्रदत्त मतपत्रिकेवर करु द्यावे मतदार यंत्रावर नाही

2) दुसरा मतदान अधिकारी या प्रदत्त मताची नोंद नोंदवही नमुना 17A मध्ये करणार नाही

3] अशा प्रदत्त मताची नोंद नमुना 17B मध्ये प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदारांची यादी मध्ये ठेवावी व त्यातील रकाना 5 मध्ये मतदारांची स्वाक्षरी किंवा अंगठा घ्यावा.

4] मतदान केंद्रावर तुम्हाला पुरवलेल्या प्रदत्त मतपत्रिकेवर मागील बाजूस "प्रदत्त मतपत्रिका" असा शिक्का मारलेला नसेल तर केंद्राध्यक्षाने स्वतःच्या हस्ताक्षरात प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.

5] सदर मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देतेवेळी शाई लावलेला बाणाकृती बरी स्टॅप द्यावा सदर मतदार मतदान कक्षात जावून त्याच्या पसंतीच्या उमेदवारच्या निशाणी समोर बाणफुलीचा रबरी शिक्का मारण्यास सांगावे. त्यानंतर मतदाराने दिलेले मत कोणाला दिसणार नाही अशा रितीने मतपत्रिकेची घडी करेल व केंद्राध्यक्ष यांच्याकडे देईल

6] सदर प्रदत्त मतपत्रिका मतदान केंद्राध्यक्षाने प्रदत्त मतपत्रिकांची यादी फॉर्म 17B च्या पाकीटात घाला [ प्रदत्त मतपत्रिका उघडून पाहू नका) मतदान पूर्ण झाल्यावर पाकीट सीलबंद करा 7] नमुना 17क / 17C च्या भाग-1 मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब अनुक्रमांक 9 मध्ये घ्यावी

10] सांख्यिकीय प्रपत्रे भरणे -:

मतदान संपल्यानंतर सांख्यिकीय प्रपत्रे भरण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष याला मदत करावी.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.