मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालयात परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक तयारी व्हिडिओ कॉन्फरन्स बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार आहे. सदर निवडणुकीच्या पूर्वतयारीचा मा. मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्स (VC) द्वारा आढावा घेणार आहेत. सदरची VC मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी खाली दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.
१ सकाळो ०९.३० ते १०.०० वाजेपर्यंत
नागपूर विभागातील ६ जिल्हे
२ सकाळी १०.१० ते १०.३५ वाजेपर्यंत
अमरावती विभागातील ५ जिल्हे
सकाळी १०.४५ ते ११.२५ वाजेपर्यंत
औरंगाबाद विभागतील ८ जिल्हे
सकाळी ११.३५ ते १२.०० वाजेपर्यंत
नाशिक विभागातील ५ जिल्हे
दुपारी १२.१० ते १२.३५
पुणे विभागातील ५ जिल्हे
दुपारी १२.४५ ते ०१.१० वाजेपर्यंत
कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी.
७ दुपारी ०१.२० ते ०१.३० वाजेपर्यंत
रायगड, पालघर व ठाणे
मुंबई शहर व मुंबई उपनगर
सदर VC मध्ये प्रामुख्याने पुढील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे- १. मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती
२. कायदा-सुव्यवस्थेबाबत आढावा (Vulnerability mapping, सेक्टर ऑफोसर, सेक्टर पोलीस ऑफिसरची नियुक्ती, पोलीस कर्मचारी आवश्यकता इत्यादी)
३. मतदान केंद्राची तपासणी
४. मतमोजणी केंद्राचे प्रस्ताव
५. मतदान साहित्याचा आढावा. (EVM व अन्य साहित्य)
६. मतदारयाद्यांच्या निरंतर अद्ययावतनाचा आढावा.
७. NGRS
८. स्वीप विषयक आढावा
९. Control Room/Media Room/Communication Plan/Nodal Officer नियुक्तीबाबत.
१०. निवडणूक अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण
सदर VC करिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित राहावे.
आपला,
(म. रा. पारकर)
उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी
महाराष्ट्र राज्य
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments