महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रका नुसार विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका) शाळांत उपलब्ध करुन देण्याविषयी निर्णय घेण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भः
१. मा. शिक्षण आयुक्तालय यांचे पत्र क्र. आस्था-अ/टे.क्र.१०६/प्राथ/ २०२२/२०८७, दि. ०८/०४/२०२२.
२. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३९/एसडी-४, दि. ०६/०४/२०२२. उपरोक्त संदर्भिय पत्रांचे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न).
मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली दि. ०४/०४/२०२२ रोजी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत शालेय विद्यर्थ्यांना सुरक्षा पुरविण्यकरिता शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळासाठी होमगार्डची मदत घेता येईल असे मा. प्रधान सचिव यांनी सूचित केले.
त्यास सुनसरुन राज्यातील सर्व शासकिय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका) शाळांना प्रत्यक्षात किती होमगार्डची आवश्यकता आहे ते तपासून विस्तृत माहिती संचालनालयास त्वरीत दिलेल्या प्रपत्र अ व प्रपत्र व मध्ये सादर करावी.
(दिनकर टेमकर)
संचालक,
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे १.
प्रत- मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१, यांना माहितीस्तव सविनय सादर. प्रत योग्य त्या कार्यवाहीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. सर्व
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments