दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत. आज दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजीचे ग्राम विकास विभागाचे नवीन परिपत्रक.
वित्त विभागाकडील दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे. वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी याप्रकरणी किती कर्मचा-यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार यासंदर्भातील माहिती मागविण्यात आलेली होती.
२. तरी सदरील माहिती खालील प्रपत्रात शासनास तात्काळ २ दिवसांत सादर करण्यात यावी.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 31 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे माहिती मागविली आहे.
वित्त विभागाकडील दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे. वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी याप्रकरणी किती कर्मचा-यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार यासंदर्भातील माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले आहे.
२. अधिवेशनामध्ये सम्नाननीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी "३ महिन्याच्या आत सरकार त्याबद्दलचा निर्णय घेईल" असे नमूद केले आहे.
तरी दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेसाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार १५ दिवसात शासनास rdd.est4- mh@mah.gov.in या ईमेलवर सादर करण्यात यावा. सदर प्रकरणी मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी कालमर्यादा नमूद केली असल्याने आपले स्तरावर तातडीने कार्यवाही करुन माहिती शासनास सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.
आपला
(सुभाष इंगळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील आदेशानुसार दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचा-यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत उपमुख्यमंत्री तीन महिन्यात निर्णय घेणार आहेत अर्थात त्यांनी जर आचारसंहितापूर्वी निर्णय घेतला तर तो कर्मचाऱ्यांच्या हिताचा असू शकतो.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments