निःशुल्क नागरी सेवा पूर्व परीक्षा (MPSC) प्रशिक्षण २०२५ सामायिक प्रवेश परीक्षा CET-2025 अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ लिंक

 महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आयोजित

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था SIAC द्वारे घेण्यात येणाऱ्या निःशुल्क नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२५

सामायिक प्रवेश परीक्षा CET-2025

www.siac.org.in

उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचालित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (ACEC) पुणे, ठाणे महानगरपालिकेचे सी.डी. देशमुख यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र, ठाणे अंबरनाथ नगर पालिका संचालित युपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचालित सावित्रीबाई फुले अकॅडमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२५ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे (offline mode) आयोजन दिनांक ०४.०८.२०२४ रोजी करण्यात येत आहे. इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा.


प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :-


ऑनलाईन अर्ज सुरूवात दिनांक ०६.०६.२०२४ पासून दिनांक २८.०६.२०२४ पर्यंत

www.siac.org.in

परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ३०.०६.२०२४ पर्यंत


परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ३०.०६.२०२४


लेखी प्रवेश परीक्षा दिनांक ०४.०८.२०२४ (offline mode)


टीप :-

(१) विद्यार्थ्यांचे प्रवेश लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकूण गुणांच्या आधारे ठरवले जाणार असल्याने मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल.

(२) सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे. (३) प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेबद्दल सर्व माहिती SIAC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. सदर जाहिरातीत आवश्यकतेनुरूप बदल करण्याचा अंतिम अधिकार संचालक एसआयएसी यांचा असेल. सविस्तर जाहिरात, प्रीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना व इतर माहिती www.siac.org.in

 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


दिनांक 04.06.2024


स्थळ :- मुंबई


(DGIPR-2024/25/क्र-5/C-94)


Sd/- डॉ. स्वाती वाव्हळ

 संचालक, SIAC, मुंबई समन्वयक, सामायिक प्रवेश परीक्षाwww.siac.org.in


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.