RTE 25% Admission 2024-25 Update - पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू.

 RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू.


राज्य सरकारनं राईट टू एज्युकेशन कायद्यांतर्गत अर्थात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शालेय प्रवेशाबाबत केलेल्या नव्या सुधारणेला मुंबई हायकोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळं हे नवे नियम तुर्तास लागू होणार नाहीत. (Maharashtra News Mumbai High Court stays RTE reform the new rules will not apply immediately)


RTE कायद्यातील सुधारणेबाबत 9 फेब्रुवारी रोजी अधिसूचना राज्य सरकारनं काढली होती. याविरोधात एका सामाजिक संस्थेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर मनसे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा या नियमाला विरोध केला होता. कायद्यातील नव्या तरतुदींनुसार शाळांना दिलेल्या सवलतींमुळं सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणाला तडा जात असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.


काय आहे नवा नियम?

शिक्षण हक्क कायद्यातील नव्या सुधारणेनुसार १ किमीच्या जवळपास खासगी व अनुदानित शाळांमध्ये दुर्बल घटकांतील 25 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सक्ती असणार नाही. या निर्णयामुळं या कायद्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासण्यात आली होती. यामुळं खासगी शाळा दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देणारच नाहीत, असा आरोप केला जात आहे.


सन 2024-25च्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदत 10 मेपर्यंत आहे. पण सध्या मुंबई हायकोर्टाच्या या नव्या नियमाला दिलेल्या स्थगितीमुळं कायद्यातील सुधारणा तूर्तास लागू होणार नाही.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.