PM Poshan In Summer Vacation Update - राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ उन्हाळी सुट्टीत देणेबाबत संचालकांचे नवीन परिपत्रक

प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 20 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली यांना उन्हाळी सुट्टीत राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७. दिनांक ३१/१०/२०२३.


२. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/ २०२३ २४/ ०३२१७, दिनांक २२/०४/२०२४.


३. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिस/पीएम पोषण/ २०२३-२४/ ०३३८० दिनांक:-३०/०४/२०२४


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत संदर्भिय क्र. १ च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यातील दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्याचे निर्देश संदर्भिय पत्रान्वये आपणांस दिलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील काही शाळांमध्ये आहार शिजवून देण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.


आपल्या जिलह्यातील दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यातील विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याकरीता योग्य ती कार्यवही करण्यात यावी.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणेमहत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.