शिक्षक पद भरतीबाबत आजचे नवीन प्रसिद्धीपत्रक - शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त!

दिनांक १०/०६/२०२४


शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे.


दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल.


दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे.


त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे.


समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.


कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये.


बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल.


दिनांक ०७/०६/२०२४


शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहिते मधून शिक्षकपद भरतीस मा.भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्या संदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे. दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित


विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे. तथापि, आचारसंहितेतील सुटीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.


प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्व तयारी करण्यात येत आहे.


कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये.


बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल.

दिनांक २६/०५/२०२४


शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून मा. भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती.


दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक २४/०५/२०२४ अन्वये निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. दिनांक २४/०५/२०२४ पासूनच या क्षेत्रासाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असे आयोगाच्या प्रेस नोट मध्येच स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे.


समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रुपांतरीत करून भरण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून वरील नमूद प्रमाणे यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास मा.भारत निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.


काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात असताना अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे, चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे. ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल. दिनांक २०/०५/२०२४


शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांचेस्तरावर सुरु आहे. आज अखेर प्राप्त माहितीनुसार ४४७४ अभियोग्यता धारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत, त्यातील ४०९३ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत.


राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक २०/०५/२०२४ रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पद भरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.


विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे. त्याच प्रकारे शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्ता पूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. या प्रकारातील पद भरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure) तयार करण्यात येत आहे.


समांतर फेरी, न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबीसंदर्भात शासन स्तरावरून काही बार्बीवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासंदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल.


समाज माध्यमांद्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात. कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्यांची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी.


ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्या वेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.