विद्यार्थ्यांना 22 एप्रिल पासून सुट्टी! राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबत दिनांक 19 एप्रिल 2024 चा शासन आदेश

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. 


राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळणेबाबत विनंती केली आहे.


२. वरील नमूद प्रस्तावाच्या अनुषंगाने मला असे कळविण्याचे निर्देश आहेत की, राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्याथ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यासंदर्भात खालील सुचना देण्यात येत आहेत.


१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याथ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.


२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनानं त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.


३) आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.-४. दिनांक २०.०४.२०२३ नुसार कार्यवाही करावी.


३. वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी घ्यावी.


(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.


प्रतः

१) मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.

२) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.