PAT Chatbot Online Marks Filling Update - संकलित मूल्यमापन-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत

 संकलित मूल्यमापन-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे दि.२६एप्रिल २०२४


STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-३)चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन २(PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु- ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-३शुचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन २ (PAT- ३) चे गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता,

तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना दि.५ मे २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा घाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-३)चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन - २ (PAT-३घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्याथ्यर्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.ole/9ssWv4bu5QPC06XHA) प्रतिसाद नोंदवावा.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.

यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन)

https://youtube.com/live/xnnTpdMvlxY?feature=share

 PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RIQhbVl2D7qQgW5Zj6/view?usp=sharing


संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक -२ (PAT-३)

https://cgweb.page.link/HhMEgoaKD43dnJdV7


(शरद गोसावी)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


वरील परिपत्रक PDF Download करण्यासाठी खालील  Download वर click करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.