Tait 2022 Teachers Recruitment Maharashtra Update - मतदान पूर्ण झालेल्या जिल्ह्यात पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू.

 दिनांक १९/०४/२०२४


शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.


त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.


दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले.


तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.


यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक १९/०४/२०२४ अन्वये या कार्यालयास कळवणेत आले आहे.


त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.