कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे थकीत देयके, ७ व्या वेतन आयोगाचे हप्ते व इतर वेतन फरकाचे प्रलंबित देयके SHALARTH प्रणालीमधुन Online पध्दतीने सादर करणेबाबत मार्गदर्शक सुचना

 जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे थकीत देयके, ७ व्या वेतन आयोगाचे हप्ते व इतर वेतन फरकाचे प्रलंबित देयके SHALARTH प्रणालीमधुन Online पध्दतीने सादर करणेबाबतेच निर्देश प्राप्त झालेले आहेत.


त्याअनुषंगाने संदर्भ क्र.२ नुसार आपले पंचायत समिती अंतर्गत करावयाची कार्यवाही बाबत सुचित करण्यात आले आहेत. त्यामध्ये दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पहिला टप्पामध्ये १) मार्च २०२३ पूर्वीचे प्रलंबित वेतन / रजा वेतन २) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोग फरकाचे हप्ते (२रा, ३रा व ४ था हप्ता) यापैकी जो देय असेल तो हप्ता ३) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक जिल्हा कार्यालयास सादर करावे, तसेच उर्वरित देयके ही दुसन्या टप्पामध्ये दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्हा कार्यालयास सादर करावे. याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. कार्यशाळेमध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर देयके विहीत मुदतीमध्ये सादर करण्याबाबतचे तसेच याबाबतचा अहवाल सादर करणेबाबतचे निर्देश दिलेले आहेत.


या कार्यालयाकडुन वारंवार सुचना देण्यात आलेल्या असतांना सुध्दा आज दिनांक ०१ मार्च २०२४ पर्यंत केवळ चांदुर बाजार व धामणगांव रेल्वे या पंचायत समितीच्या Claim Approval करिता आवश्यक कागदपत्राच्या हार्ड कॉपी जिल्हा कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. आपले कार्यालयाकडून Claim Approval करिता आवश्यक कागदपत्राच्या हार्ड कॉपी प्राप्त झालेनंतर त्या तपासुन प्रत्येक कर्मचारी निहाय Claim ला DDO-३ लॉगीन मधुन Approval द्यावयाचे असल्याने जिल्हा स्तरावर सुध्दा मोठ्या प्रमाणात काम करावयाचे याकरीता वेळ लागणार आहे.


त्यामुळे आपणास याव्दारे पुनःश्च स्मरण करूण देण्यात येते की, आपणास याव्दारे पुनःश्च स्मरण करूण देण्यात येते की, आपण Claim Approval करिता संदर्भ क्रमांक ०२ चे पत्रान्वये आवश्यक कागदपत्राच्या हार्ड कॉपी जिल्हा कार्यालयास दिनांक ०४/०३/२०२४ पर्यंत खास दुतामार्फत दिलेल्या नमुन्यामध्ये सादर कराव्या, आपणाकडुन सदर बाबतीत विलंब होत असल्याने जर संचालनालयकडुन अनुदान परत घेतले गेल्यास व शिक्षकांना त्यांचे लाभ अदायगी करता न आल्यास सदर बाब मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांचे निदर्शनास आणुन देण्यात येईल. तसेच आपल्यावर व्यक्तीश: जबाबदारी निश्चित करण्यात येऊन प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.


शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, अमरावती


थकीत देयके बाबत


संदर्भ : -

मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्रक्र. प्राशिसं/विशैक्षसा/अंदाज - 203 / 2024/877 दिनांक 30.01.2024

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे थकीत देयके, 7व्या वेतन आयोगाचे हप्ते व इतर वेतन फरकाचे प्रलंबीत देयके SHALARTH प्रणालीमधून ONLINE पद्धतीने सादर करणेबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत.

त्यानुषंगाने पंचायत समिती अंतर्गत करावयाची कार्यवाही बाबत खालील प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आलेले आह.


मार्गदर्शक सुचनानुसार

👇👇👇👇👇👇👇👇

उपलब्ध निधीनुसार प्रलंबीत / थकीत देयकांसाठीचे प्राधन्यक्रम

👇👇👇👇👇👇👇👇

1) मार्च 2023 पुर्वीचे प्रलंबीत वेतन / रजा वेतन.

2) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे हप्ते 2 रा, 3 रा व 4 था हप्ता यापैकी जो देय असेल तो हप्ता.

3) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक.

4) कार्यरत कर्मचारी यांचे वरीष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी फरकाचे देयक.

5) कोणताही वेतन फरक प्रलंबीत असेल त्या वेतन फरकाचे देयक.

6) निलंबन काळ सेवाकाळ झालेला असेल त्याचे वेतन फरकाचे देयक.

7) Stepping UP मुळे वेतन वाढ झालेली असल्यामुळे वेतन फरकाचे देयक.


१) प्रलंबीत / थकीत देयकांसाठीचे कार्यपद्धती

👇👇👇👇👇👇👇👇

1) सर्वप्रथम प्रलंबीत वेतन / रजा वेतन हे देयक तसेच इतरही देयके ही पंचायत समिती स्तरावर अस्थापना लिपीक यांनी Offline प्रचलीत पद्धतीने अचूक नमुना-26 तयार करावा.

2) सदर देयक गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने तपासणी साठी पंचायत समिती लेखा विभागाकडून तपासणी करून सदर देयकावर सहाय्यक लेखाधिकारी यांनी तपासले म्हणून त्यांची स्वाक्षरी घ्यावी.

3) त्यानंतरच सदर देयकाची वरील User Manual चा उपयोग करून SHALARTH प्रणालीमध्ये Claim Entry करावी

4) Broken Period ID च्या Page ची Ctrl + P चा उपयोग करून प्रिंट काढणे व त्यासोबत

गटशिक्षणाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी यांच्या स्वाक्षरीची देयकाची झेरॉक्स प्रत सोबत जोडून Approval साठी जिल्हा कार्यालयास सादर करावे.

5) जिल्हा कार्यालयाकडून Approval दिल्यानंतर User Manual चा उपयोग करून SHALARTH प्रणालीमध्ये Supplymentary Bill तयार करून गटशिक्षणाधिकारी यांना Online Forward करावे.

6) मुख्याध्यापक लॉगीन मधून सदर Bill चे Outer, Inner, Aquittance व Bank Statement ची प्रिंट काढून व त्यासोबत गटशिक्षणाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी यांच्या स्वाक्षरीची Offline देयकाची मूळप्रत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करणे, पंचायत समिती स्तरावर शिक्षण विभागामध्ये सदर देयकांचे जतन करून ठेवावे.

7) गटशिक्षणाधिकारी लेंगीन मधून पंचायत समिती अंतर्गत प्राप्त झालेली सर्व Supplymentary Bill हे

SHALARTH प्रणालीमधून शिक्षणाधिकारी यांचे लॉगीलना Online Forward करावे.


२) मार्च 2023 पुर्वीचे प्रलंबीत वेतन / रजावेतन चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

👇👇👇👇👇👇👇👇

१)रजा वेतन किंवा प्रलंबीत वेतन अदा करणेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे आदेश.

२)सदर देयकाचे अचूक विवरणपत्र नमुना -26

३)सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

४)देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


३)सेवानिवृत्त / मयत कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे हप्ते 2 रा, 3रा व 4 था हप्ता यापैकी जो देय असेल तो हप्ता चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

👇👇👇👇👇👇👇👇

१)7 वा वेतन आयोग फरकाचे माहे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतचे विवरणपत्र.

२)सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत

३)मयत कर्मचारी बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत. ४)सेवापुस्तकाच्या वेतन निश्चिती पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत.

५)सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

६)देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


४)सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

👇👇👇👇👇👇👇👇

१)महागाई भत्ता फरकाचे विवरणपत्र.

२)सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत.

३)सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

४)देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


५)कार्यरत कर्मचारी यांचे वरीष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी फरकाचे देयक चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

👇👇👇👇👇👇👇👇

१)वेतन फरकाचे विवरणपत्र.

२)वेतन देयक नमुना -26

३)वरीष्ठ वेतन श्रेणी / निवडश्रेणी मंजूर आदेशाची झेरॉक्स प्रत.

४)सेवापुस्तकाच्या वेतननिश्चिती पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत.

५)सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

६)देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


६)कोणताही वेतन फरक प्रलंबीत असेल त्या वेतनफरकाचे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे.

👇👇👇👇👇👇👇👇

१)वेतन फरकाचे विवरणपत्र.

२)वेतन देयक नमुना -26

३)वेतन फरक प्रलंबीत असून अदा करणेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे आदेश.

४)सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

५)देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक

लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


७) निलंबनकाळ सेवाकाळ झालेला असेल त्याचे वेतन फरकाचे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

👇👇👇👇👇👇👇👇

१)वेतन फरकाचे विवरणपत्र.

२)वेतन देयक नमुना -26

३)निलंबनकाळ सेवाकाळ केले असलेबाबत सक्षम प्राधिकारी यांचे आदेश.

४)सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

५)देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


८) Stepping UP मुळे वेतन वाढ झालेली असल्यामुळे वेतन फरकाचे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

👇👇👇👇👇👇👇👇

१)वेतन फरकाचे विवरणपत्र.

२)वेतन देयक नमुना -26

३)Stepping UP मुळे वेतनवाढ केले असलेबाबत सक्षम प्राधिकारी यांचे आदेश.

४)सेवापुस्तकाच्या वेतननिश्चिती पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत.

५)सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

६)देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करून उपलब्ध अनुदानानुसार पहिला टप्प्यामध्ये 1) मार्च 2023 पुर्वीचे प्रलंबीत वेतन / रजा वेतन 2) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे हप्ते (2 रा 3 रा व 4 था हप्ता) यापैकी जो देय असेल तो हप्ता 3) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक जिल्हा कार्यालयास सादर करायचे होते. तसेच उर्वरीत देयके ही दुसऱ्या टप्यामध्ये जिल्हा कार्यालयास सादर करायाचे होते................


आपले जे बिल थकीत असेल त्याबाबत शाळेचे मुख्याद्यापक आणि पंचायत समिती कार्यालयशी संपर्क करून उचित कार्यवाही करावी.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.