पवित्र पोर्टल शिक्षक भरती आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 चे नवीन अपडेट - २-३ दिवसात याद्या!

दिनांक २४/०२/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


• पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक पदभरती व याद्या संदर्भात अनिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील "One and only" न्यूज बुलेटीन हाच एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे.


• सतत संभ्रम निर्माण करणे व त्यातून स्वतःचे महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींना दूर करावे. याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात आहे.


• पूढील २-३ दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल. तोपर्यंत प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तयार ठेवणे व तत्सम कामे करावीत किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे.






 दिनांक २२/०२/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


• पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांतून आलेल्या सर्व निवेदनांचा, सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.


• नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शिफारसपात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत.


• स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी, नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत.


• पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक १/०९/२०२३ व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे.

पवित्र पोर्टलवरील दिनांक १/०९/२०२३ मार्गदर्शक सूचना👇

Download






शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :-

*TAIT 2022

अती महत्त्वाचे ✍️🙏👉

01) मो.न.

02) ईमेल आयडी

03) सही,पत्ता,जन्मतारीख

04) ओळख पत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)

05) निवड यादीतील अनु क्रमांक

06) उमेदवाराच्या अर्जाची स्वप्रमाणित प्रत

07) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला

08) SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र

09) HSC गुणपत्रक व प्रमाणपत्र

10) पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र

11) पदव्युत्तर पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र

12) D.Ed/D.T.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र

13) B.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र

14) TET / CTET गुण व प्रमाणपत्र

15) TAIT 2022 परीक्षा गुणपत्रक किंवा TAIT 2022  merit list मधील आपले नाव असलेले page ची प्रिंट.

16) जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

17) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)

18) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

19) लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र/प्रमाणपत्र (Small Family Declaration)

20) MS-CIT प्रमाणपत्र

21) नावात बदल असल्यास (Marriage certificate/Affidavit/Gazette.)

22) महिला आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास.

23) नॉन क्रिमीलिअर लागू असल्यास.

24) पेसा क्षेत्रातील असल्यास (ST फक्त) मुळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र

25) उमेदवार - खेळाडू,अनाथ,दिव्यांग, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन लागू असल्यास प्रमाणपत्र.

तसेच निवड याद लागल्यावर नाव असलेले page ची प्रिंट व लॉगिन ला संबंधित ZP/NP/MNP/संस्था यांचे recommendation letter असेल तर त्याची ही प्रिंट लागेल.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.