शालार्थ प्रणालीतून थकीत व पूरक वेतन देयके कसे तयार करायचे? Pending Bill OR Supplymentary Bill Functinality in SHALARTH USER Manual PDF Download Step By Step Instructions

 मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक प्राशिसं/विशैक्षसा /अंदाज 203/2024/877 दिनांक 30.01.2024 व मा. उपसंचालक, अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक शिसंमा/टी-7/शालार्थ/ थदे/ऑनलाईन/557 दिनांक 30.01.2024 नुसार यापुढे शिक्षकांचे थकीत देयकाची मागणी व अदायगी ही शालार्थ प्रणालीमधूनच ऑनलाईन सादर करणेबाबतचे निर्देश आहेत. त्यासाठीची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे.

या सुविधेमधून खालील देयकांचा Claim Entry SHALARTH प्रणालीमधून करावी.

* मार्च 2023 पुर्वीचे प्रलंबीत वेतन / रजा वेतन

* सेवानिवृत्त कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे हप्ते (1ला, हप्ता) यापैकी जो देय असेल तो हप्ता 2 रा 3 रा व 4 था

• सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक

* कार्यरत कर्मचारी यांचे वरीष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी फरकाचे देयक

* कोणताही वेतन फरक प्रलंबीत असेल त्या वेतन फरकाचे देयक

* निलंबन काळ सेवाकाळ झालेला असेल त्याचे वेतन फरकाचे देयक.

* Stepping UP मुळे वेतन वाढ झालेली असल्यामुळे वेतन फरकाचे देयक

* वेतनवाढ फरकाचे देयक

* इतरही ज्या देयकांसाठी लागणारा खर्च हा वेतनाचे लेखाशिर्षामधून भागविण्यात येतो असे सर्व प्रकारचे देयके.


सर्वप्रथम ज्या शिक्षकांचे प्रलंबीत देयक आहे ते ज्या शाळेमध्ये कार्यरत आहेत त्यांचे शाळेचे DDO-1 लॉगीन करावे.

सेवानिवृत्त / मयत कर्मचारी यांचे देयक प्रलंबीत असेल, तर त्यांचे शेवटचे वेतन ज्या शाळेचे लॉगीन मधून झालेले आहे. त्या शाळेवरून मागणी नोंदविण्यात यावी.


आपल्याला Pending Bill या Facility चा उपयोग करून कोणतेही प्रलंबीत लाभाचे देयक काढण्यासाठी सर्वप्रथम Supplymentry Bill Group तयार करावा लागतो. त्यासाठी

Worklist > Payroll > Organization/Office Profile > Bill Group Maintenance या Path चा उपयोग करावा.


याठिकाणी लॉगीनमध्ये यापुर्वीच तयार असलेले सर्व Bill Group दिसतील. याठिकाणी जर Regular Paybill साठी उपयोगात असलेला एकच Bill Group असेल तर दुसरा Bill Group तयार करावा. किंवा त्याठिकाणी एकापेक्षा जास्त Bill Group असतील तर त्यापैकी उपलब्ध Bill Group लाच Modify करावे. त्याकरिता Bill Group ID ला Click करावे. त्यानंतर खालीप्रमाणे Screen दिसेल.


याठिकाणी लॉगीनमध्ये जर Regular Paybill साठी उपयोगात असलेला एकच Bill Group असेल तर Scheme Name यामध्ये Drop Down ला Click करून कर्मचारी ज्यालेखाशिर्षामधून वेतन घेतो ती Scheme निवडावी. यावेळी बाजुला Scheme Code बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.


याठिकाणी Description मध्ये Supplymentary bill Group असे type करावे. व त्यानंतर सर्वात खाली असलेले Is this Supplementary Bill Group? यावर Yes यावर Click करावे. व खाली Save ला Click करावे. याठिकाणी Supplementary Bill Group ला Employee Attach करायची आवश्यकता नाही.


प्रथम सेवानिवृत्त झालेले शिक्षकांचे बाबतीत करावयाची कार्यवाही.

याठिकाणी ACHYUT PRALHAD NIKAS (02DEDAPNM6502) हे दिनांक 31 जुलै 2023 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे 2 रा 3 रा व 4 था हप्ता देणे बाकी आहे. त्यांचे बाबतीत करावयाची कार्यवाही खालीलप्रमाणे.


DDO-1 लॉगीन मध्ये SHALARTH_2.0 यावर Click करावे. यासाठी Enternet Explorer वगळता इतर Browsers जसे की, Chrome, Mozila, Edge यांचा उपयोग करावा.


Internet Explorer मध्ये Login करून SHALARTH_2.0 यावर Click केल्यास या करिता Internet Explorer चा उपयोग करू नये याबाबतचा Massage Displayed होईल..


संपूर्ण User Manual PDF Download👇

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.