Pavitra Portal Teacher Recruitment Updates - शिक्षक पदभरतीबाबत प्रसिध्दीपत्र

दिनांक ०२/०२/२०२४


पवित्र पोर्टलवरील ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती प्रलंबित होत्या त्या सर्व व्यवस्थापनांना जाहिराती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे व या सर्व व्यवस्थापनांना आज जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.


काही व्यवस्थापनांकडून दिलेल्या जाहिरातीतील आरक्षणविषयक नोंदीमध्ये तफावत असल्याने अडचणी आल्या आहेत, त्याची योग्य ती तपासणी करणे आवश्यक आहे, त्यावरील कार्यवाही सुरू आहे.


शंका समाधान -


अनुसूचित जमाती या प्रवर्गातील पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची परवानगी यापूर्वीच जिल्हा परिषदांना देण्यात आलेली होती. तथापि, सदर प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका प्रलंबित असल्याने सद्यःस्थितीत पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही. पेसा क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे.


सूचना -

अजूनही समाज माध्यमांवर काही मंडळी विपर्यास्त माहिती प्रसारित करून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करताना दिसून येत आहेत. प्रचलित धोरण, शासन निर्णयानुसार बिनचूकरित्या प्रक्रिया पूर्ण होईल ही बाब अभियोग्यताधारकांनी लक्षात घ्यावी.


केवळ या न्यूज बुलेटीन द्वारे देण्यात येणारी माहिती अधिकृत समजण्यात यावी.


अधिकारी/कर्मचारी यांचे व्यक्तिगत क्रमांकावर अनावश्यक संदेश न पाठवता नेमून दिलेल्या ईमेल पत्यावर पत्रव्यवहार करावा.


➡️पवित्र पोर्टल वरील रिक्त पदांचा तपशील 


➡️अनुसूचित जाती - 3147 पदे 

➡️अनुसूचित जमाती - 3542 पदे 

➡️विमुक्त जाती (अ) - 862 पदे 

➡️भटक्या जमाती (ब)- 404पदे 

➡️भटक्या जमाती (क) - 582 पदे 

➡️विशेष मागास प्रवर्ग - 290 पदे 

➡️इतर मागास प्रवर्ग -4024 पदे 

➡️आर्थिक दुर्बल घटक - 2324 पदे 

➡️खुला - 6170 पदे


➡️इयत्ता १-५ वी - 10240 पदे 

➡️इयत्ता ६-८ वी  - 8127 पदे 

➡️इयत्ता ९-१० वी - 2176 पदे 

➡️इयत्ता ११-१२ वी- 1135 पदे


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.