पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 अपडेट - उमेदवारांना शाळा किंवा जिल्हा परिषदांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर सुविधा उपलब्ध!

 पवित्र पोर्टल वरील शिक्षक भरती बाबत महत्त्वपूर्ण अपडेट पुढीलप्रमाणे. 


पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२२


• महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

• सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,३९.७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले.

"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ८० टक्के पदांसाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित आहे.

या कामी माहे जून, २०२३ ते नोव्हेंबर, २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदुनामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदुनामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेच्या १० टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या ७० टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे.

• सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेतलेल्या आहेत. जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील. तरीही १० टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत त्यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल.

• खाजगी शैक्षणिक संस्थातील रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी Video Conference तसेच लेखी पत्र २७/१०/२०२३,२९/११/२०२३, ९/१/२०२४,१६/०१/२०२४ नुसार जास्तीतजास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.

शासन पत्र दि.२५.०१.२०२४ व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दि.२८.०१.२०२४ नुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आली आहे.

• स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरीता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देशित गेल्याप्रमाणे समिती गठित करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवली आहेत.

एकंदरीतच या भरतीप्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदुनामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. समाज माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण याचे तंतोतंत पालन करून ही भरतीप्रक्रिया राबवली जात आहे.

यादरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षण्यात आले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली आहेत.

• पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांच्या १२५२२,१८ मनपाच्या- २९५१, ८२ नगर पालिका/परिषदाच्या-४७७ व ११२३ खाजगी शैक्षणिक संस्थांच्या-५७२८ अशा एकूण २१६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.


• पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे:

• पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे:


१) आरक्षण निहाय रिक्त पदे- अनुसूचित जाती-३१४७, अनुसूचित जमाती-३५४२, विमुक्त जाती (अ)- ८६२, भटक्या जमाती (ब)-४०४, भटक्या जमाती (क)-५८२, भटक्या जमाती (ड)-४९३, विशेष मागास प्रवर्ग-२९०, इतर मागास प्रवर्ग-४०२४, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-२३२४, खुला-६१७० याप्रमाणे आहेत. तथापि, काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येतात.


२) गट निहाय रिक्त पदे- इ. १ ते ५ वी-१०२४०, इ. ६ ते ८ वी ८१२७, इ. ९ ते १० वी -२१७६, इ. ११ ते १२ वी - ११३५ याप्रमाणे आहेत.


३) माध्यमनिहाय रिक्त पदे- मराठी-१८३७३, इंग्रजी-९३१, उर्दू-१८५०, हिन्दी-४१०, गुजराथी-१२, कन्नड-८८, तामिळ-८, बंगाली-४, तेलुगू-२ याप्रमाणे आहेत.


४) पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे- मुलाखतीशिवाय-१६७९९, मुलाखतीसह-४८७९ याप्रमाणे आहेत.


पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व User Manual देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे.


उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in या संकेत स्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक ०८/०२/२०२४ रोजी दिली जाईल.


उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक ०९/०२/२०२४ पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे.


• सन २०१७ मधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या रिक्त पदांसाठी दिनांक २९/११/२०२३ व ३०/११/२०२३ रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत. दिनांक


२९/११/२०२३ व ३०/११/२०२३ रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाच्या जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासन मान्यतेनंतर कार्यवाही करण्यात येणार आहे.


पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.


पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये. पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी edupavitra2022@gmail.com या ईमेलवर पत्रव्यवहार करावा. या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकाऱ्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवर अनावश्यक ई-मेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर पत्र व्यवहार करावा जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल.


ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्यावर काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करावा.


सर्व अभियोग्यताधारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत.


सूरज मांढरे, भाप्रसे

आयुक्त (शिक्षण)

महाराष्ट्र राज्य


➡️पवित्र पोर्टल वरील रिक्त पदांचा तपशील 


➡️अनुसूचित जाती - 3147 पदे 

➡️अनुसूचित जमाती - 3542 पदे 

➡️विमुक्त जाती (अ) - 862 पदे 

➡️भटक्या जमाती (ब)- 404पदे 

➡️भटक्या जमाती (क) - 582 पदे 

➡️विशेष मागास प्रवर्ग - 290 पदे 

➡️इतर मागास प्रवर्ग -4024 पदे 

➡️आर्थिक दुर्बल घटक - 2324 पदे 

➡️खुला - 6170 पदे


➡️इयत्ता १-५ वी - 10240 पदे 

➡️इयत्ता ६-८ वी  - 8127 पदे 

➡️इयत्ता ९-१० वी - 2176 पदे 

➡️इयत्ता ११-१२ वी- 1135 पदे


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.