पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 बाबत नवीन अद्ययावत अपडेट - उमेदवारांसाठी पोर्टलवर नवीन सूचना.

 पवित्र पोर्टल वर दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी उमेदवारांसाठी नवीन सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर सूचनेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पद भरती करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाचे आदेशानुसार याची किती उमेदवाराकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. 


दरम्यान पवित्र पोर्टल वर विविध जिल्हा परिषद व खाजगी संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध होणे देखील सुरू आहे. 


मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र ८५३४/२०२३ व ११७३२/२०२३ मधील आदेश अनुक्रमे दिनांक १४/०९/२०२३ व दिनांक २०/०९/२०२३ व अन्य याचिकातील व मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ६५३५/२०२३ व इतर तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र १२४२४/२०२३ या याचीकांतील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर न्यायालयाने निश्चित केलेल्या केवळ गैरप्रकारातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना वगळून अन्य उमेदवारांना स्व-प्रमाणन करण्याबाबत सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दिले होते.

मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार याचीकादारांचे email प्राप्त झाले आहेत. सदर प्राप्त email नुसार आवश्यक ती छाननी करून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण असलेल्या किंवा B.Ed. ही अर्हता असल्याचे नमूद केलेल्या उमेदवारांच्या email वरून प्राप्त माहितीच्या आधारे नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे स्तरावर तपासणी करण्यात आली आहे.

शिक्षण आयुक्तालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता, दरम्यानच्या कालावधीत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक ३१/२०२४ व संलग्न अवमान याचिका दाखल झाल्या आहेत. सदर अवमान याचिकेमध्ये दिनांक १२/०१/२०२४ रोजी सुनावणी झाली त्यानुसार शासन पत्र दिनांक १२/०१/२०२४ अन्वये सदर याचिकेतील उमेदवारांना चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

त्यानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण असलेल्या किंवा B.Ed. ही अर्हता धारण केलेल्या याचिकेतील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यास याद्वारे सुविधा देण्यात येत आहे व तसे उमेदवारांना त्यांनी यापूर्वी माहिती पुरविलेल्या email वर कळविण्यात आलेले आहे.

याचिकेतील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्राकरिता नोंदणी करणेसाठी दिनांक १६/०१/२०२४ पर्यंत मुदत राहील. पवित्र पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करून स्व- प्रमाणपत्र पूर्ण करावे.

Link 👇

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx


कसे का होईना या सूचनेनुसार शिक्षक भरती प्रक्रिया कासवगतीने का होईना सुरू आहे यावरून स्पष्ट होते. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.