Service Book IMP - सेवा पुस्तक सर्विस बुक मध्ये कोणकोणत्या नोंदी असाव्यात त्या कशा घ्याव्यात संपूर्ण माहिती

 शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुस्तक हे महत्त्वाचे दस्ताऐवज आहे. सेवा पुस्तकातील नोंदी हा अचूक असाव्या लागतात. अन्यथा नंतर सेवानिवृत्त होताना अनेक अडचणी उद्भवतात. पाहूया सेवा पुस्तकात कोणकोणत्या नोंदी कशा घ्याव्यात? 1 सेवापुस्तकाचे पहिले पान

पूर्ण नाव व आधारकार्ड नंबर

धर्म, जात (प्रवर्गासह)

(अ) सध्याचा पत्ता

(ब) घोषित केलेले स्वग्राम व पत्ता

वडिलांचे नाव व राहण्याचे ठिकाण

जन्मदिनांक नक्की करून तो ख्रिस्ती सणाप्रमाणे लिहिता येईल तेवढा अचूक लिहावा

तंतोतंत उंची

ओळखण्यासाठी अंगावरील खुणा

अ) नियुक्तीच्या वेळची शैक्षणिक अर्हता

ब) नियुक्ती नंतर प्राप्त केलेली शैक्षणिक अर्हता

शासकीय कर्मचार्याची दिनांकित सही

क्रमांक १ ते ९ मधील नोंदी तपासल्याबद्दल

कार्यालय प्रमुखाची अथवा इतर कोणत्याही

साक्षाकन अधिकार्याची दिनांकित सही व

पदनाम

वैदयकीय तपासणीचा अहवाल

(एक) प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक

(दोन) प्रमाणपत्र देणारा अधिकारी व त्याचे पदनाम


जोडावयाची कागदपत्रे व करावयाची नोंद

आधारकार्ड झेरॉक्स PANCARD झेरॉक्स

जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र झेरॉक्स व पुढील नोंद संबधित आस्थापनेकडून करून घेणे

जातपडताळणी ची खात्री मूळ प्रमाणपत्र पाहून केली ती बरोबर दिसून आली

सध्याचा पत्ता नोंदवणे

वडिलाचे पूर्ण नाव व सध्याचा पत्ता नोंदवणे

जन्मदिनांक नोंदवणे ज्या कागदपत्राच्या आधारे नोंदवली आहे त्याची कागदपत्रे झेरॉक्स जोडणे (उदा:शाळा सोडल्याचा दाखला )

तंतोतंत उंची नोंदवणे

ओळखीची खुण नोंदवणे

१० वी, १२ वी, डी.एड., बी.एड. पास झालेले वर्ष व महिना नोंदवणे व पुढील नोंद संबधित आस्थापनेकडून करून घेणे

शैक्षणिक अहर्ता शालेय प्रमाणपत्रा

शासकीय कर्मचार्याची सही व दिनांक लिहिणे खाते प्रमुखाचा सही शिक्का घेणे तसेच

शिक्क्या सोबत संबधित आस्थापनेची काउंटर सही घेणे.

वैद्यकीय दाखला प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक तसेच देणाऱ्या अधिकारी यांचे पदनाम लिहिणे


टीप :-

① अ.क्र. (९ ) व (१०) या ओळीतील सही खाली तारीख घालण्यात यावी तसेच या पृष्ठावरील नोंदी निदान प्रत्येक पाच वर्षानंतर नव्याने करण्यात याव्यात किंवा त्या पुन्हा साक्षांकित करण्यात याव्यात.

① वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्यपडताळणी दाखला या पानाबरोबर समोर गम ने चिटकावा

① जात प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता, जन्मतारखेचा पुरावा, आधार कार्ड, PANCARD यांच्या झेरॉक्स प्रति स्वयंसाक्षांकित करून सेवापुस्तकामध्ये लावणे.

② कर्मचाऱ्याचे अंगठ्याचे व बोटाचे ठसे

या ठिकाणी अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याचे डाव्या हाताचे अंगठ्याचे व बोटाचे ठसे घेणे.

Left hand thumb and finger impressions of (non-gazetted) government servant

ठसे घेतल्यावर करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी, अंगठा यांची नावे लिहिणे.

③ कार्यालय प्रमुखाने किंवा साक्षांकन अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र Certificate by the head of the officer or other attesting officer

प्रमाणित करण्यात येते कि, सेवा- पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील सर्व नोंदी मी रीतसर पुनःसाक्षांकित केल्या आहेत आणि *.. चा अपवाद करता, त्या बरोबर असल्याचे आढळून आले.

दिनांक .

कार्यालय प्रमुखाची सही

टीप :-वरील ठिकाणी दर पाच वर्षांनी नोंदी तपासून बदल असेल तर नोंद घेवून कार्यालय

प्रमुखाचा सही शिक्का करून घेणे. व संबधित आस्थापनेची काउंटर सही घेणे.

उदा:- एखाद्या कर्मचाऱ्याची नो.ला.ता. १/१/२००९ असेल तर त्यांनी १/१/२०१४ हे प्रमाणपत्र कार्यालय प्रमुखांकडून प्रमाणित करून घेणे.

④ नामनिर्देशन नमुना, प्रपत्र क्रमांक -७ नमुना अ, नमुना - इ

या ठिकाणी संबधित कर्मचारी यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याचे नामनिर्देशन करावयाचे आहे. तसेच सर्व फॉर्म भरून दोन साक्षीदाराच्या सह्या घेवून व स्वतःची सही करून दिनांक लिहून कार्यालय प्रमुखाचा सही शिक्का करून घेणे. व संबधित आस्थापनेची काउंटर सही घेणे.

⑤ सेवापुस्ताकातील कर्मचारी यांची सेवाकालावाधीतील नोंदी

१) शिक्षणसेवक पदावर हजर नोंद.

यामध्ये मूळ नेमणूक आदेश याची नोंद घेणे. व मानधन नोंदवणे

जसे :-३,००० /- मानधन, ६,०००/- मानधन, १६,००० /- मानधन

२) वैदकीय दाखला याची नोंद.

३)MS-CIT ची नोंद, पास झालेले वर्ष व प्रमाणपत्र क्रमांक टाकणे

४) जात वैधता प्रमाणपत्राची नोंद व जात पडताळणी समिती, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक नोंदवणे

५) दुय्यम सेवापुस्तक प्रत ठेवण्यात आली आहे हि नोंद.

६) नियमित उपशिक्षक पदावर आदेशाची नोंद व नियमित वेतनश्रेणी नोंदवणे

नियमित वेतन श्रेणी 5200-20200 ग्रेड पे -2800

उदा:-8560 +2800=11360

७) गटविमा 120 /- रुपये याची नोंद घेणे. तसेच जानेवारी २०२० मधील गटविमा ३६०/- नोंद घेणे.

८) स्थायित्व आदेशाची नोंद

९) हिंदी मराठी भाषा सुट आदेशाची नोंद घेणे.

१०) DCPS /NPS नोंद घेणे PRANCARD नंबर याची नोंद.

१९) समूह वैयक्तिक अपघात विमा योजना याची रु.३५४/-व रु.५३१/- नोंद.

१२) सातवा वेतन आयोग फरक नोंद.

१३) सातवा वेतन आयोग याचे विकल्प व PAY-FIXATION शिक्का

१४) वचनपत्र शिक्का व वचनपत्र सेवापुस्तकाला लावणे.

१५) वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंद तसेच इतर प्रशिक्षण नोंद

१६) जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली कार्यमुक्त व हजर आदेशाची नोंद घेणे.

१७) उच्च शिक्षण परवानगी आदेश व पास झाल्यावर प्रमाणपत्र नोंद

१८) नावत बदल असेल तर गॅझेट नोंद.

⑥ सेवाखंड व विनावेतन नोंद

1) ज्या कर्मचाऱ्याचा सेवेत लागल्यापासून सेवेत खंड आहे. त्याचे सेवाखंड क्षमापित केल्याच्या आदेशाची नोंद

2) ज्या कर्मचाऱ्याची विनावेतन झालेली आहे. त्याच्या मंजुरीच्या आदेशाची नोंद

⑦ वार्षिक वेतनवाढ मंजूर नोंद

दर वर्षी जुलै महिन्याच्या 1 तारखेला वार्षिक वेतन वाढ मंजूर करून सबंधित कार्यालय

प्रमुखाचा सही शिक्का करून घेणे. व संबधित आस्थापनेची काउंटर सही घेणे.

8 अर्जित, अर्धवेतनी रजा तसेच वैदयकीय रजा नोंद

दर वर्षी शिल्लक रजा व खर्च रजा याचा हिशोब लिहून संबधित कार्यालय प्रमुखाचा सही शिक्का करून घेणे.व संबधित आस्थापनेची काउंटर सही घेणे.

⑨ सेवा पडताळणी अभिलेखे - वेतन देयके, वेतन प्राप्तपट (आणि खाली विनिर्दिष्ट केलेले तत्सम अभिलेख यावरून पडताळणी केलेली सेवा )

पासून

पर्यंत

सेवा पडताळणी इतर अभिलेखे कोणताही असल्यास कार्यालय प्रमुखाची सही

01/04/......

31/03/......

वरील नोंदी वेतन देयके व वेतन प्राप्तपट याची पडताळणी करून कार्यालय प्रमुखाचा सही शिक्का करून घेणे. व संबधित आस्थापनेची काउंटर सही घेणे.

① महत्त्वाचे :-

सेवापुस्तकाला खालील कागदपत्रे ज्या ठिकाणी नोंद आहे त्या ठिकाणी लावणे

१) मूळ नेमणूक आदेश व हजर रिपोर्ट सत्यप्रत

२) शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र सत्यप्रत (ssc,hsc,ded,bed)

३) वैद्यकीय दाखला मूळ प्रत

४) चारित्र्यपडताळणी मूळ प्रत

५) जन्मतारीख पुरावा सत्यप्रत

६) जातप्रमाणपत्र व जातवैधता (पडताळणी ) प्रमाणपत्र सत्यप्रत

७) कर्मचाऱ्याचे आधारकार्ड व PANCARAD सत्यप्रत

८) संगणक उत्तीर्ण (MS-CIT) प्रमाणपत्र सत्यप्रत

९) उपशिक्षक पदावर नियमित केलेल्या आदेशाची सत्यप्रत

१०) गटविमा ज्या ठिकाणी नवीन बदल झाला आहे त्या महिन्याचे पगारबिल

११) हिंदी मराठी भाषा सुट आदेशाची सत्यप्रत

१२) स्थायित्व आदेशाची सत्यप्रत

१३) नावत बदल केला असेल तर गॅझेट ची सत्यप्रत

१४) समूह अपघात विमा कपात झाली असेल तर त्या महिन्याचे पगारबिल

१५) जिल्हाअंतर्गत बदली झाली असेल तर बदली आदेशाची तसेच कार्यमुक्त व हजर रिपोर्ट साक्षांकित प्रत

१६) आंतरजिल्हा बदली झाली असेल तर बदली आदेशाची तसेच कार्यमुक्त व हजर रिपोर्ट साक्षांकित प्रत

१७) सातवा वेतन आयोग विकल्प व ५ हफ्ताचे विवरणपत्र जोडणे.

१८) सेवाअंतर्गत प्रशिक्षण तसेच वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत 

१९) १ जुलै ला दिलेल्या वेतनवाढ ची पगारबिल

२०) सेवेत लागल्यानंतर सेवेत खंड असलेस त्याचे सेवाखंड क्षमापित केल्याच्या आदेशाची साक्षांकित प्रत

२१) सेवेत लागल्यानंतर विनावेतन झाली असेल तर त्याची मंजुरी च्या आदेशाची साक्षांकित प्रत

२२)NPS PRAN CARD ची साक्षांकित प्रत

२३) सेवेत असताना ज्या गोष्टी लागू असतील व सेवापुस्तकाला नोंद असेल त्या सर्व आदेशाच्या साक्षांकित प्रत.

वरील सर्व कागदपत्रे आपल्या सेवापुस्तकाला असणे गरजेचे आहे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.