मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षण 2024 साठी प्रगनकांना नेमके किती मानधन मिळणार?

या अगोदर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार प्रगनकांना दहा हजार रुपये मानधन व पाचशे रुपये भत्ता असे मानधन दिले जाईल असे नमूद होते परंतु दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी नवीन आदेशानुसार पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.


सदर कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फत ओळखपत्र व सर्वेक्षणांच्या वेळी घरावर चिंन्हाकंन करण्याकरिता प्रगणकांना Permenent Marker Pen देण्यात येणार असून दि. १९/०१/२०२४ रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी Assistant Nodal Officer यांना हे साहित्य पुरविण्यात येईल. Assistant Nodal Officer जिल्हा व महानगरपालिका यांनी हे साहित्य तालुका व वॉर्ड स्तरावर तेथील प्रशिक्षणापूर्वी पोहोचवावे व प्रशिक्षणाच्या वेळी सदर साहित्य प्रगणकांना उपलब्ध करुन द्यावे.

तालुका Nodal Officer यांना तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे वेळापत्रक व प्रगणकांच्या बॅचेस याबाबतची माहिती गोखले इंन्स्टियुट मार्फत दि. १८/०१/२०२४ रोजी Email वर पाठविण्यात येईल. त्या वेळापत्रकानुसार प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये प्रत्येकी ७५ प्रगणक व त्यांचे सुपरवायझर बोलावून प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणाच्या वेळी तालुका Nodal Officer यांनी प्रगणकाचे नाव किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये बदल असल्यास त्याबदलाबाबतचा Report तयार करुन गोखले एन्स्ट्यूिट मार्फत आपल्या जिल्ह्यासाठी / महानगरपालिकेसाठी नियुक्त Master Trainer यांना Whats app वर तातडीने पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्रगणकाच्या नावात व मोबाईल क्रमांकामध्ये तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल.

महानगरपालिकेमध्ये कमी प्रगणक असलेल्या वॉर्ड किंवा पेठा एकत्र करुन ३०० प्रगणकाच्या ग्रुपकरिता १ प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, या वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील प्रशिक्षणासाठी बोलविण्यात यावे.

Users\Admin\Downloads Sauti Bade uplodedсь

प्रशिक्षणाच्या वेळी आयोगाने पुरविलेल्या ओळखपत्रामध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, गाव, तालुका, जिल्हा ही माहिती भरून फोटो चिटकवावा, त्यावर तहसील / महानगरपालिका कार्यालयाचा शिक्का उमटवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे.

तसेच प्रत्येक प्रगणकास चिन्हांकन करण्याकरिता १ Marker पेन उपलब्ध करुन द्यावा. ओळखपत्र व Marker Pen दिल्याची नोंद ठेवण्यात यावी.

सदर सर्वेक्षणाचे काम दि. २३/०१/२०२४ ते दि.३१/०१/२०२४ या कालावधीत पूर्ण करावे.

या कामकाजासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील Nodal Officer व Assistant Nodal Officer यांना विभाग जिल्हा व तालुका स्तरावर १ लिपिकाची सेवा उपलब्ध करुन घेता येईल. या लिपिकांना एका महिन्याच्या मूळ वेतनाच्या ५०% रक्कम मानधन म्हणून देण्यात येईल. तालुका स्तरावरील प्रशिक्षकांना रू. १०,००० इतके मानधन देण्यात येईल. यापूर्वी कळविल्याप्रमाणे मराठा व खुल्या प्रवर्गातील १०० कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी रु.१०,०००/- इतके मानधन देण्यात येईल तर मागासवर्गीय कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुंटुंब रु.१०/- इतके मानधन देण्यात येईल.


(आ.उ.पाटील)

सदस्य सचिव

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग



वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.