राहिलेले प्रशिक्षण पुन्हा सुरू - अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता ६ ते ८ च्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत SCERT संचालक आदेश

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या दिनांक नऊ जानेवारी 2024 च्या आदेशानुसार अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता सहावी ते आठवीच्या तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

Management of Learning Process & CCE Training Starts Again SCERT GR. 

समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना द्यायचे आहें. त्यानुषंगाने विभागस्तर प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५ दिवस होता त्यामध्ये ४ दिवस अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व १ दिवस सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी विभागीय डायट प्राचार्य यांची होती.

उपरोक्तनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असून आयोजनाची जबाबदारी संबंधित डायट प्राचार्य यांची राहील. सदर प्रशिक्षणाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

१. पहिला टप्पा दि. १६ ते २० जानेवारी २०२४

दुसरा टप्पा दि. ३० जानेवारी २०२४ ते ०३ फेब्रुवारी २०२४

२. सदर तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रती व्यक्ती (प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ) प्रती दिन रक्कम रु. १५०/- प्रमाणे निधीच्या मर्यादेत खर्च करावा.


खर्चाच्या बाबी व निकष खालील प्रमाणे

१. मानधन - रु. ४०० प्रती दिन (फक्त तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी)

२. प्रशिक्षण वर्ग/Hall

३. इंटरनेट सुविधा

४. भोजन व्यवस्था (Working Lunch)

५. स्टेशनरी व किरकोळ खर्च

६. तज्ज्ञ मार्गदर्शक TA एकदा (एकदा जाणे व येणे)

टीप- 5 विवसांपैकी । दिवसच्चा भोजन खर्व व तज्ज्ञ मानधन याचा

खर्व CCE प्रति निधीतून करावा.


अमोल येडगे भा.प्र.से.

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. 



वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.