NMMS Scholarship Dec 2023 Hall Ticket Download Link - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २४ डिसेंबर, २०२३ प्रवेश पत्र उपलब्ध!

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २४ डिसेंबर, २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७३० केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३५३१ शाळा व एकूण २६६२१५ विद्याथ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.


परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ११ डिसेंबर २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.


सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २३.१२.२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.


दिनांक : ११/१२/२०२३

 (अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.